मुंबईत अणुशक्ती विभागात नोकरीची संधी
Department Of Atomic Energy Mumbai Recruitment
Department of Atomic Energy, Mumbai is going to recruit eligible applicants to Stenographer Category-II, Stenographer Category-III, Upper Division Clerk, Junior Shopping Assistant / Junior Store Keeper Posts. Applicants to these posts 74 vacancies to be filled under Directorate of Purchase & Stores Mumbai Bharti 2020. Applicants to the posts posses with qualification are eligible to apply. Such eligible applicants can be applied by submission of the applications to the given link.
मुंबईत अणुशक्ती विभागात नोकरीची संधी
Department of Atomic Energy Mumbai Bharti : सरकारी नोकरीची भुरळ आजही अनेकांना आहे. मुळात सरकारी नोकरी (Sarkari Nokri) कशी मिळते? त्यासाठी पात्रता काय असावी लागते? अर्ज कधी निघतात? अर्ज कसे भरायचे? निवडप्रक्रिया कशी होते? स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असतो? असे व याहूनही निरनिराळे प्रश्न उमेदवारांच्या मनात काहूर निर्माण करतात आणि त्याच वेळी म्हणजेच योग्य वेळी, योग्य माहिती मिळाली नाही तर सरकारी नोकरी हे फक्त स्वप्नच उरतं.
स्पर्धा परीक्षांची ओळख आता सर्व विद्यार्थ्यांना झालेली आहे. स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थी आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकतात. त्याचबरोबर राष्ट्र निर्माणासाठी चांगली कामगिरीही करू शकतात. नुकतीच अणुशक्ती विभागात स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, ज्युनिअर स्टोअरकिपर या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. स्टेनोग्राफर पदासाठी दहावी उत्तीर्ण व स्टेनोग्राफी कोर्स तसेच टायपिंग तर वरिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर व ज्युनिअर स्टोअरकिपरसाठी सायन्स पदवीधर (६० टक्के) अथवा कॉमर्स पदवीधर (६० टक्के) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक/ इलेक्ट्रीकल डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आहे.
स्टेनोग्राफर पदासाठी दोन स्तरावर म्हणजे ऑब्जेटिव्ह टाइप टेस्ट आणि त्यानंतर स्टेनोग्राफर स्किल टेस्ट अशी निवडप्रक्रिया असेल. वरिष्ठ लिपिक आणि ज्युनिअर स्टोअरकिपर पदासाठी ऑब्जेटिव्ह टेस्ट व त्यानंतर डिस्क्रीप्टीव्ह टेस्ट अशा दोन स्तरावर निवडप्रक्रिया होईल. ऑब्जेटिव्ह परीक्षेमध्ये जनरल इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, क्वांटिटेटिव्ह अॅप्टीट्यूड असे तीन विषय असून २०० प्रश्नांसाठी २०० गुण आणि त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे.
ज्युनिअर स्टोअरकिपर पदासाठी या विषयांबरोबर जनरल नॉलेज व संगणक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. डिस्क्रीप्टीव्ह टेस्टमध्ये इंग्रजी भाषा आणि कॉम्प्रेहेन्शन यावर १०० गुणांची तीन तासांची परीक्षा असेल. संस्थेचं नाव- अणुशक्ती विभाग पदाचं नाव- स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, ज्युनिअर स्टोअर किपर अंतिम मुदत- २७ डिसेंबर, २०२० वयोमर्यादा- १८ ते २७ वर्षं
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा
सोर्स : म. टा.