Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ३०४६ पदे रिक्त

Shikshan Vibhag Bharti 2022

Department of Education Bharti 2022: As per the news, Out of the total sanctioned posts in the education department in the state A total of 3046 posts of Center Head, Extension Officer, Group Education Officer, Deputy Education Officer, Education Officer, Deputy Director of Education, Joint Director of Education are known to be vacant. There are 14 vacancies for the post of Deputy Director of Education and 15 vacancies for the post of Joint Director of Education. As there are 2925 vacancies for Center Heads in the State, one Center Head has been given additional charge of at least two to three Centers. Read More details

कोरोना महामारीत शिक्षण क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी ठाकली असताना आता राज्यात शिक्षण विभागात एकूण मंजूर पदांपैकी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक पदांची एकूण ३०४६ पदे रिक्त झाल्याची माहिती आहे. यामुळे सद्यस्थितीत कार्यरत अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन काम भागवले जात असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढल्याचे चित्र आहे.

Shikshak Bharti- राज्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

 • कोरोना कालावधीत शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाकडे शिक्षण खात्याकडून वेळोवेळी योजना राबवण्यासाठी सांख्यिकी माहिती मागविली जाते. याशिवाय शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी पर्यवेक्षणीय यंत्रणेसह शाळांवर टाकण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास खाते, महसूल खाते, आरोग्य विभाग, वनखाते अशा कितीतरी खात्याकडून शिक्षण विभागाची यंत्रणा राबविली जाते.
 • त्यामुळे शिक्षण विभागातील कार्यरत अधिकारी वर्गावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात येत आहे. ऑनलाईन तंत्रज्ञानामुळे तात्काळ माहिती उपलब्ध करण्यासाठी यंत्रणेला आदेशित केले जाते. एकावेळी अनेक आदेश, परिपत्रक, शासननिर्णय येत असल्याने त्याची अंमलबजावणी कशी करायची, यामुळे अधिकारी वर्ग त्रस्त झाला आहे. त्यामुळे काही अधिकारी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग स्वीकारत आहेत.
 • राज्यात केंद्र प्रमुखांची २९२५ पदे रिक्त असल्याने एका केंद्र प्रमुखाकडे किमान दोन ते तीन केंद्रांचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. संघटनेकडून पदभरती करा म्हणून शासनाला साकडे घालूनही शासनाकडून पदभरती केली जात नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. शिक्षण विस्तार अधिकारी शैक्षणिक गुणवत्तेसाठी पद निर्माण करण्यात आले आहे. मात्र, विस्तार अधिकारी यांच्याकडून शैक्षणिक कामापेक्षा प्रशासकीय कामे करून घेतली जातात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
 • शिक्षण अधिकार्‍यांच्या ५९ जागा रिक्त आहे. त्यांचा प्रभार कनिष्ठ अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे. काही महत्वाचे निर्णय घेताना प्रभारी अधिकार्‍यांची अडचण होत आहे. शिक्षण उपसंचालक पदाच्या १४ जागा तर शिक्षण सहसंचालक पदाच्या १५ जागा रिक्त आहेत.
 • एकीकडे शाळा स्तरावर गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय पदे रिक्त झाल्याने शिक्षण विभागाचे चांगभलंझालं आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

संगणक ज्ञान नसलेल्यांची कसोटी

गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या राज्यात ४७० जागा रिक्त असल्याने कार्यरत अधिकार्‍यांना अतिरिक्त भार दिला जात आहे. शैक्षणिक व प्रशासकीय कामे करून घेताना अधिकार्‍यांची कसरत होत आहे. टेबल वर्कपेक्षा तंत्रज्ञानावर आधारित कामे करावी लागत असल्याने जे अधिकारी अद्ययावत तंत्रज्ञान करतात त्यांना कामाचा ताण कमी आहे. ज्या अधिकार्‍यांना संगणकाचे ज्ञान नाही त्यांची मात्र कसोटी लागत आहे.


Shikshan Vibhag Recruitment 2022: Teachers are likely to get the opportunity to fill the vacancies in the school education department in the state. Many posts in the department have not been filled for years. Therefore, PhD teachers should be appointed in the posts of Class One, Class Two, Education Extension Officer, Head of Center.The Rural Development Department has recently sent a letter to all the Divisional Commissioners in this regard. Information has been sought from the teachers who are eligible to become officers

शिक्षकांसाठी राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय.-जाणून घ्या

Pavitra Portal Bharti 2022-राज्यात शिक्षक भरतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात..

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होणारी शिक्षण भरती रद्द

PhD Teachers Bharti 2022 :राज्यातील शालेय शिक्षण विभागात रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी होण्याची संधी शिक्षकांना  मिळण्याची शक्यता आहे.

Shikshan Vibhag Bharti 2022- राज्यातील शालेय शिक्षण विभागात रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी होण्याची संधी शिक्षकांना मिळण्याची शक्यता आहे. विभागतील अनेक पदं वर्षानुवर्ष भरली गेलेली नाहीत. त्यामुळे क्लास वन, क्लास टू, शिक्षण विस्तार अधिकारी  , केंद्रप्रमुख  या पदांवर पीएचडी  झालेल्या शिक्षकांची नेमणूक केली जावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधले 200 पेक्षा जास्त शिक्षक पीएचडी झालेले आहेत. मात्र त्यांना थोडीफार पगारवाढ मिळण्यापलीकडे फारसा फायदा होत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक नावाच्या आधी डॉक्टर लावणेही टाळतात. त्यामुळे अशा शिक्षकांना अधिकारी होण्याची संधी मिळाली, तर त्याचा फायदा राज्याच्या शिक्षणक्षेत्रालाच होईल, अशी भावना शिक्षक व्यक्त करत आहेत. दरम्यान या दिशेने राज्य सरकारने विचार सुरू केलं आहे.

ग्रामविकास खात्यानं सर्व विभागीय आयुक्तांना याबाबतच एक पत्र नुकतेच पाठवले आहे. अधिकारी होण्यासाठी आर्हतेमध्ये बसणा-या शिक्षकांची माहिती मागवण्यात आली आहे. औरंगाबादच्या शिक्षणाधिका-यांनी माहिती जमवायला सुरूवात केली आहे. शिक्षक संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. एकीकडे विद्यादान करताना स्वतःचाही शैक्षणिक विकास करणारे अनेक शिक्षक आहेत. या शिक्षकांना अधिकारी केल्यास ते अधिक योग्य ठरेल.


Shikshan Vibhag Bharti 2022 latest decision! The TET from 2013 will be verified- Certificates of teachers who have passed TET and have been appointed after 13th February 2013 will be verified. The Department of School Education (Primary) will require those who have been appointed as teachers in private primary schools and Zilla Parishad schools (ZP Schools) to submit their original certificates to the concerned. The report regarding the teachers who will not give the certificate till 2 pm on Thursday (Thu. 6) will be submitted to the headmaster group education officer of the concerned school.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! 2013 पासूनच्या ‘TET’ची होणार पडताळणी

 • शिक्षक पात्रता परीक्षेतील  गैरव्यवहारानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाने ( मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 6 जानेवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्‍त झालेल्या शिक्षकांना व इतर उमेदवारांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे.
 • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे (Maharashtra State Examination Council, Pune) आयुक्‍त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षेतील गैरव्यहार प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
 • टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांनी नियुक्‍ती, पदस्थापना मिळविली, असा शालेय शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळेच 4 जानेवारी रोजी त्यासंबंधीचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षकपदी नियुक्‍त झालेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
 • सर्व गटशिक्षणाधिकारी व खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यासंबंधीचे सक्‍त आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत ते प्रमाणपत्र संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र जमा करायचे आहे. प्रत्येकांनी त्यांच्याकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

टाळाटाळ केल्यास कारवाईची शक्‍यता

शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) खासगी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (ZP School) शिक्षकपदी नियुक्‍त झालेल्यांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधितांकडे जमा करावे लागणार आहे. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत जे शिक्षक प्रमाणपत्र देणार नाहीत, त्यांच्या बाबतीतील अहवाल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तो अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाला पाठविला जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.

आदेशातील ठळक बाबी…

 • 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेले व नियुक्‍ती दिलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
 • संबंधितांनी ‘टीईटी’चे (शिक्षक पात्रता परीक्षा) मूळ प्रमाणपत्र तत्काळ शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश
 • सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी (खासगी प्राथमिक शाळा) त्यांच्या कार्यक्षेत्रातील नियुक्‍त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी
 • वैयक्‍तिक मान्यता, पदस्थापना दिलेल्या शिक्षकांचे टीईटी मूळ प्रमाणपत्र 6 जानेवारीनंतर कार्यालयात सादर करावे
 • 6 जानेवारी रोजी दुपारी दोनपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे; टाळाटाळ करणाऱ्यांचा अहवाल शिक्षण विभागाला होणार सादर

Department of Education Bharti 2022

Shikshak Bharti 2022 There are indications that the recruitment of teachers of Scheduled Tribes category in PESA area will be done before the start of the academic year 2022-23. The timeline in this regard has been published by the Department of Education. The recruitment process for the posts in Zilla Parishad schools will be done through Pavitra Portal.

पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शिक्षकांची पदभरती २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच केली जाण्याचे संकेत आहेत. त्यासंदर्भातील वेळापक्षक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदांकरिताची ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल ३१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठीची भरती राबविली जाणार असल्याची माहिती आहे. शासनाच्या वेळापत्रकानुसार, २८ फेब्रुवारी रोजी टीएआयटी परीक्षा घेण्यात येईल आणि १० मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. मार्च महिन्यापासून राज्याच्या १३ पेसा क्षेत्रातील रिक्त पदभरतीसाठी जाहिरात देण्यात येईल. १६ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची मुदत देण्यात येईल. उमेदवार निवडीची ही प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतील. असे आदेश मिळालेल्या उमेदवारांना नव्या शैक्षणिक सत्राच्या शाळा सुरू होताच रूजू करून घेण्यात येईल, अशी माहिती आहे.

पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शिक्षकांची पदभरती करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री अॅड. वर्षा गायकवाड यांनी नुकतेच दिले होते.As per the news, Eighty percent of the posts in the state education department from director to group education officer are vacant. After the Commissioner of Education, the officers in the school education department in the state include the directors of seven departments, followed by twenty joint directors and deputy directors, education officers, deputy education officers, group education officers.

शिक्षण हे व्यक्ती, समाज घडविण्याचे माध्यम आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील शिक्षण विभागात संचालक ते गटशिक्षणाधिकाऱ्यांपर्यंतचे ८० टक्के पद रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या रिक्त पदामुळे शिक्षण विभागाच्या कामावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 • Shikshak Bharti -राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील – तब्बल २ हजार ८८ पदे भरणार
 • राज्यात शालेय शिक्षण विभागात अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्तानंतर सात विभागांचे संचालक, त्या खालोखाल वीस सहसंचालक आणि उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
 • शिक्षण विभागात यामध्ये जवळपास ८८५ पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी ५९५ पदे रिक्त असून २९० पदांवर अद्याप नियमित अधिकारी आहेत. राज्यात प्राथमिक, माध्यमिक, राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, राज्य परीक्षा परिषद, बालभारती, अल्पसंख्यांक, राज्य शिक्षण मंडळ या सात विभागांवर सात संचालकांची नियुक्ती केली जाते. यापैकी बालभारती आणि प्राथमिक शिक्षण विभाग सोडल्यास उर्वरित पाच विभागांची जबाबदारी अतिरिक्त संचालकांवर देण्यात आलेली आहे.
 • याशिवाय २० पैकी केवळ पाच संचालक कार्यरत असून उपसंचालक व तत्सम अधिकाऱ्यांच्या ३५ पदांपैकी १८ पदे रिक्त आहेत. त्यांचाही प्रभार शिक्षणाधिकाऱ्यांच्या खाद्यांवर आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विभागात १५२ पदांपैकी ८३ पदे रिक्त आहेत. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांचा जागांची परिस्थिती सर्वात वाईट असल्याचे दिसून येते.
 • मंजूर असलेल्या ६६९ पदांपैकी ४८३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठा परिणाम होतो आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांवर उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे.याचा फटका शाळा, शिक्षक व कर्मचाऱ्यांना बसतो आहे.

रिक्त पदांचा तपशील –

संवर्ग मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे
केंद्रप्रमुख 4860 1835 2925
विस्तार अधिकारी 1717 962 755
गशिअ/उपशिक्षणाधिकारी 608 138 470
शिक्षणाधिकारी 144 85 59
शिक्षण उपसंचालक 35 21 14
शिक्षण सहसंचालक 20 5 15

Shikshak Bharti 2021 Palghar Primary Education Department

Shikshak Bharti 2021 updates for Palghar District : In the Palghar District Primary Education Department have a 2212 vacant posts for Teachers. There are 2212 vacancies in the primary department in Palghar district. It has 1651 teachers. There are 262 vacancies for headmasters. Also 3 out of 4 posts in group A and B are vacant.

Palghar Education Officer Primary informed that recruitment is done in a straightforward and promotion way. The recruitment process was stalled as the point list of teachers, extension officers and headmasters was not prepared. He said his work was now in its final stages. In the recruitment of teachers in PESA, 1651 posts of teachers from Scheduled Tribes are vacant. These posts have remained vacant due to non-meeting of candidates. These posts will be filled if candidates are received.

Shikshak Bharti-सहा हजार शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा

 पालघर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी माहिती दिली की, भरती ही सरळ आणि पदोन्नती मार्गाने केली जाते. त्यात शिक्षक, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांची बिंदू नामावलीच तयार झाली नसल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. पेसा मधील शिक्षक भरती मध्ये अनुसूचित जमाती मधील १६५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. उमेदवार भेटत नसल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत. उमेदवार प्राप्त झाल्यास ही पदे भरली जातील. तर जिल्ह्यात विस्तार अधिकारी श्रेणी २ मधील ३५ पदे तर श्रेणी ३ मधील २० रिक्त आहेत. केंद्र प्रमुखाची ८१ पदे रिक्त आहेत. यातील काहींचे प्रस्ताव शासनाला पाठवले आहेत तर काहींची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रिक्त पदे

पदाचे नाव                              मंजूर पदे       रिक्त जागा    

विस्तार अधिकारी श्रेणी                     २५०          ३५

विस्तार अधिकारी श्रेणी                     ३२१          २०

मुख्याध्यापक                                  ३७१          २६२

शिक्षक : — वर्गानुसार                      —           —

अनुसूचित जाती                               १२२          ७१

अनुसूचित जमाती (पेसा)                 ६१५८         १६५१

अनुसूचित जमाती (नॉन पेसा)           ६६           ७१

वि. जा. अ.                                        २८           ०४

भ. ज. ड.                                          १९           ४३

भ. ज. ब.                                          २३           ०४

भ. ज. क.                                         ३३           ०५

वि. मा. प्र.                                        १९           १५

इतर मागासवर्गीय                           १७८          ७६

  खुला                                            ४५१          १४


In Education Department there is 50% Officer, Deputy Education Officer Posts Vacant. Corona has affected children’s education. vacancies in the education department affect the functioning. The posts of Education Extension Officer and Head of Center are also vacant. Due to vacancies, office work is pending

Shikshak Bharti-सहा हजार शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा

 जालना : एकीकडे कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे शिक्षण विभागातील पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असून, अनेक शिक्षक, पालकांच्या तक्रारींचा निपटाराही वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

shikshak Bharti- पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण सेवकांची ३००० पदे भरणार 

शिक्षण विभागाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, अधीक्षक यासह इतर विविध पदे शासनाने निर्माण केली आहेत. परंतु, जालना जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मंजूर आठ पैकी सहा पदे रिक्त आहेत. हा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकाऱ्यांचेही एक पद रिक्त आहे. शिवाय जिल्ह्यातील शालेय पोषण आहार अधीक्षकांची चार पदे रिक्त आहेत.

ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त

 जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे गटशिक्षणाधिकारी प्रभारी आहेत. शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची पदेही रिक्त आहेत. रिक्तपदे असल्याने कार्यालयातील कामे प्रलंबित राहत आहेत.


शिक्षण विभागात २ हजार ९३ पदांची भरती लवकरच

The state government has decided to recruit 2,093 posts for the primary education department of Pune Municipal Corporation, including 989 teachers and a total of 1,104 non-recognized teachers and other cadres.

पुणे महापालिके च्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी शिक्षके तर संवर्गातील ९८९ आणि संच मान्यता नसलेल्या शिक्षक संवर्ग आणि अन्य संवर्गाच्या एकूण १ हजार १०४ अशा मिळून २ हजार ९३ पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने या आकृतिबंधाला मान्यता दिली असून त्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

shikshak Bharti- पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण सेवकांची ३००० पदे भरणार 

प्राथमिक शिक्षण विभागासाठी शिक्षके तर संवर्गातील ९८९ पदे भरण्यात येणार आहेत. तसेच संच मान्यता नसलेले शिक्षक संवर्ग आणि अन्य संवर्गातील १ हजार १०४ पदे भरण्यात येणार आहेत. वर्ग क्रमांक एक ते वर्ग क्रमांक चार मधील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये शिपाई आणि रखवालदारांची पदे मोठय़ा प्रमाणावर भरली जाणार आहेत. शिपाई ४०० आणि ४६४ रखवालदारांची पदे भरण्यात येणार आहेत.

ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त

लिपीक, टंकलेखक, प्रशासकीय अधिकारी, क्रीडा विभाग प्रमुख, वायरमन, रेकॉर्ड किपर, सुतार, हवालदार, माळी, बिगारी अशी पदांचीही भरती होणार आहे. संच मान्यता नसलेल्या शिक्षक संवर्गातील पदांमध्ये चित्रकला शिक्षक, संगीत शिक्षक, विशेष शिक्षक, संगणक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका या पदांचा समावेश आहे. बालवाडी सेविका आणि शिक्षिकांची प्रत्येकी ५२० पदे भरली जाणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवडय़ात मुंबईमध्ये पुण्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतली होती. त्यामध्ये प्राथमिक विभागाच्या आकृतिबंधाच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती. रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, असे आदेश अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर नगरविकास विभागाने गुरुवारी अधिकृत आदेश काढला.


The Department of General Administration has recently approved the recruitment of education workers, which will fill the posts of about three thousand education workers. The process will be implemented transparently through a ‘sacred’ system for quality candidates. With the initiative of School Education Minister Varsha Gaikwad, the recruitment process will now gain momentum.

पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण सेवकांची ३००० पदे भरणार

सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिल्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी ‘पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रीयेला आता गती मिळणार आहे.

Shikshak Bharti-रखडलेली प्राध्यापक भरती लवकरच सुरु होणार

सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिल्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी ‘पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने मान्यता

वित्त विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोकऱ्यांमधील नियुक्त्या देताना एसईबीसी आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे तीन हजार शिक्षण सेवक पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

Shikshak Bharti-3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती लवकरच…

Shikshak Bharti- सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोणतीही भरती सुरु नसल्याचा खुलासा..

९ हजार ८० शिक्षण सेवक

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण ९ हजार ८० शिक्षण सेवक पदांपैकी ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे. डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे ‘पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

शिक्षण विभागात ६१ शिक्षणाधिकारी पदे रिक्त

Education Department 2021- At present, the management of the education system is on saline, there are 61 vacancies in the rank of education officer and work is underway on those in charge. In rural areas, the education department of the taluka is headed by a group education officer. There are 608 posts of class two, which include Group Education Officer, Lecturer, School Nutrition Superintendent, Salary and Provident Squad Superintendent, Deputy Education Officer.

Shikshak Bharti-रखडलेली प्राध्यापक भरती लवकरच सुरु होणार

राज्यातील शिक्षणाचा पूर्ण डोलारा मुख्यत्वे शिक्षणाधिकारीपदावर अवलंबून असतो. सध्या शिक्षणव्यवस्थेचा कारभार सलाइनवर असून, तब्बल ६१ शिक्षणाधिकारी दर्जाची पदे रिक्त असून, प्रभारींवर कामकाज सुरू आहे. ग्रामीण भागात तालुक्याची शैक्षणिक (education department) धुरा गटशिक्षणाधिकारी सांभाळतात. वर्ग दोनची ६०८ पदे असून, यात गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, शालेय पोषण आहार अधीक्षक, वेतन व भविष्यनिर्वाह पथक अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी आदी पदांचा समावेश होतो. तब्बल ७७ टक्के पदे रिक्त आहेत. परिणामी, या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासह अन्य प्रशासकीय कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Shikshak Bharti-3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती लवकरच…

Shikshak Bharti- सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोणतीही भरती सुरु नसल्याचा खुलासा..

रिक्त पदांचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर

शिक्षण विभागाची पुरेशी माहिती नसलेल्यांनाही पदाचा प्रभार दिला असून, केंद्रप्रमुखांकडेही एक-दोन तालुक्यांची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ३३ जिल्हा परिषदेत, चार महापालिकेत वर्ग एकचे शिक्षणाधिकारीपद आहे. यातील निम्मे पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे या ८३ पदांतील २० पदे समकक्ष असली तरी सहाय्यक संचालक, शिक्षण मंडळातील सहसचिव, परीक्षा परिषद, प्राथमिक, माध्यमिक संचालनालय व शिक्षण आयुक्त कार्यालयातील पदांपेक्षा शिक्षणाधिकारीपदासाठी चढाओढ असते

दृष्टिक्षेपात राज्य शिक्षण विभाग

 • शिक्षणाधिकारी व समकक्ष पदे : १४४
 • कार्यरत पदे : ८३
 • रिक्त पदे : ६१
 • उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पदे : ६०८
 • कार्यरत पदे : १४५
 • रिक्त पदे : ४६३
 • विस्ताराधिकारी मंजूर पदे : १,७९३
 • कार्यरत पदे : ९६३
 • रिक्त पदे : ८३०
 • केंद्रप्रमुख मंजूर पदे : ४,८६०
 • कार्यरत पदे : १,७००
 • रिक्त पदे : ३,१६०

Education Department Bharti 2021

In Education Department More than 65% of the important posts like Group Education Officer, Deputy Education Officer are vacant in the state. A total of 885 posts of Director, Deputy Director, Joint Director, Education Officer have been sanctioned in the state. Out of which 300 officers are working in this post at present. As many as 585 posts are vacant.

राज्यातील शाळांनी केलेल्या शुल्कवाढीबाबत याचबरोबर शाळांतील विविध गैरप्रकारांबाबत अनेक तक्रारी शिक्षक, पालक यांच्याकडून होत आहे. मात्र त्या सोडविण्यासाठी अधिकारीच नसल्याचे उघड झाले आहे. शिक्षण विभागात राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. तर मुंबईत तब्बल ८५ टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे.

Shikshak Bharti-रखडलेली प्राध्यापक भरती लवकरच सुरु होणार

राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. राज्यात गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आदी महत्त्वाची राज्यभरातील पदे तब्बल ६५ टक्क्यांहून अधिक रिक्त आहेत.

Shikshak Bharti- सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोणतीही भरती सुरु नसल्याचा खुलासा..

राज्यातील शैक्षणिक प्रशासनातील संचालक, उपसंचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी अशी राज्यभरात एकूण ८८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी या पदावर सद्यस्थितीत ३०० अधिकारी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. तर तब्बल ५८५ पदे रिक्त आहेत. याशिवाय गटशिक्षणाधिकारी यांची ६६९ पदे आहेत. त्यापैकी केवळ २२७ पदे भरली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. उप शिक्षणाधिकारी (वर्ग २) पदोन्नतीसाठी पात्र व्यक्तींच्या ३ वर्षांपासून शोध सुरू आहे.

वारंवार मागणी करुनही हा शोध संपलेला नसल्याचे आयुक्त कार्यालय सांगते अशी माहिती पदांची भरती करावी या मागणीचा पाठपुरावा करत असलेल्या मुंबई राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. शिक्षण आयुक्तालय केवळ माहिती मागवते. मात्र पदेच भरली जात नाहीत असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ हे पद पदोन्नतीसाठी पात्र असूनही हे पद भरण्यासाठी वेळ काढला जात आहे. मुंबईतही अजब कारभार सुरू आहे. पदे भरलेली नसल्याने पालकांचे प्रश्न सुटत नाहीत पालकांच्या शुल्कासंदर्भातील तक्रारी, शिक्षकांच्या तक्रारींवर निर्णय होत नाहीत आणि प्रश्न प्रलंबित राहण्याचे प्रमाण वर्षानुवर्ष वाढत आहे.

मुंबईतील रिक्त पदे

मुंबई पश्चिम विभागात १ शिक्षण निरीक्षक पद, ६ उपशिक्षण अधिकाऱ्यांपैकी ५ पदे, सहायक उपनिरीक्षकांच्या ८ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. उत्तर विभागात ६ उपशिक्षण निरीक्षक, ७ सहायक शिक्षण उपनिरीक्षकपदे रिक्त आहेत. दक्षिण विभागात ४ उप शिक्षणाधिकारी, ३ सहायक शिक्षण उपनिरीक्षकपदे रिक्त आहेत. एकूणच उपशिक्षणाधिकारी व सहायक उपशिक्षणाधिकारी यांची ३७ पदे मंजूर असली तरी तब्बल ३१ पदे रिक्त आहेत.


In Education Department there is Thousands of vacancies  from the head of the center to the post of joint director of education. The education department in the state has the highest manpower. There are around one thousand state government and over six thousand supervisory administrative bodies in the local authority to look after this department which has millions of students and lakhs of employees. On the one hand, there is a new educational policy in the country. It is rumored that there will be a radical change in the field of education, on the other hand, the supervisory system on which progress is based on this new change. She is already frustrated by the vacancies. Group Education Officer posts have been assigned to those who have not studied the education department in some places.

Shikshak Bharti- पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती पुढील महिन्यात होणार !

शिक्षण विभागात हजारो जागा रिक्त

करोडो विद्यार्थी व लाखो कर्मचारी असलेल्या या विभागाचा सांभाळ करण्यासाठी हजारच्या आसपास राज्य शासनाचे व सहा हजारांवर स्थानिक प्राधिकरणातील पर्यवेक्षकीय प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. एकीकडे देशात नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असल्याचा गाजावाजा केला जात आहे, तर दुसरीकडे ज्या पर्यवेक्षकीय यंत्रणेवर या नवीन बदलासह प्रगतीची धुरा अवलंबून आहे.

शिक्षणक्षेत्रात आघाडीवर राहणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. परंतु, राज्याच्या विद्यालयाचे व्यवस्थापन करणारी 60 टक्‍के पर्यवेक्षकीय यंत्रणा सध्या प्रभारी आहे. केंद्रप्रमुखांपासून ते थेट संचालक पदापर्यंत बहुतांश ठिकाणी प्रभारी अधिकारी असल्याने राज्यातील विद्यामंदिरांची नौका पाण्यात बुडत असल्याचे चित्र आहे.

रिक्त पदांचा तपशील –

 राज्यातील केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षकीय पदे भरली तर निश्‍चितपणे कामांची गती सुधारेल. शिवाय प्रशासनातील कामासोबत शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधार होईल, असा आशावाद शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण मडके यांनी व्यक्त केला.

संवर्ग मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे
केंद्रप्रमुख 4860 1835 2925
विस्तार अधिकारी 1717 962 755
गशिअ/उपशिक्षणाधिकारी 608 138 470
शिक्षणाधिकारी 144 85 59
शिक्षण उपसंचालक 35 21 14
शिक्षण सहसंचालक 20 5 15

Department of Education Bharti 2020: Department of Education has issued the notification for the recruitment of Member Posts. There is a total of 04 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 19th August 2020. More details about the Department of Education Bharti 2020 like application and application address are given below.

शैक्षणिक विभाग अंतर्गत  प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सदस्य पदाच्या 04 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 ऑगस्ट 2020 पर्यत दिलेल्या पत्यावर अर्ज सदर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 • अंतिम तारीख:19 ऑगस्ट 2020
 • पदाचे नाव: सदस्य
 • रिक्त 04 पदे:
 • अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन
 • ईमेल पत्ता : [email protected]
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, शिक्षण, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे – 411001

Department of Education Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Department of Education
⚠️ Recruitment Name
Department of Education Pune Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms

शैक्षणिक विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Member  04 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Member 
Retired Officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  30th July 2020
⏰ शेवटची तारीख  19th August 2020

Important Link of Education Department Recruitment  

 ? PDF ADVERTISEMENT
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!