Pavitra Portal Bharti 2022-राज्यात शिक्षक भरतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात..

Pavitra Portal Bharti 2022

Pavitra Portal Bharti 2022: The process of publishing the selection list for the post on the portal is underway along with the interview of the private management of the state published on 2nd September 2021. The process of editing the self credentials of the teacher recruitment candidates is currently in the final stage. The facility to finalize the information filled in the self-certificate by the concerned candidates will be made available soon.

राज्यात ३६२ शिक्षण संस्थांनी (Education Organization) ७८९ उमेदवारांची भरती (Recruitment) केल्याची नोंद करण्यात आली. उर्वरित पदांच्या निवडीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यवस्थापनांना आदेश दिल्याची माहिती शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे दिली आहे.

  1. Shikshak Bharti- शिक्षकांची तब्बल 11 हजारांहुन पदे रिक्त
  2. Shikshak Bharti -शिक्षकांसाठी राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय.-जाणून घ्या
  3. Shikshak Bharti -राज्यात १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त
  • राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या २ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी ‘पोर्टल’वर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. शिक्षक पदभरती उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र एडिट करण्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे.
  • संबंधित उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात भरलेली माहिती अंतिम करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या आधारावर १९६ व्यवस्थापनाच्या ७६९ पदांचे पसंतीक्रम/प्राधान्यक्रम घेतले जातील आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
  • न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि शासनस्तरावरील काही धोरणात्मक बाबींविषयी अंतिम निर्णय झाल्यानंतर सद्यःस्थितीत असलेल्या जाहिरातींमधून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही पोर्टलवर स्पष्ट केले आहे.

‘अभियोग्यता चाचणी’ एप्रिलमध्ये

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना २०१७ मध्ये ‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी’ बंधनकारक करण्यात आली. त्याचवर्षी ही परीक्षा झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे. याबाबत पवित्र पोर्टलद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ती रखडत चालली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरतीप्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.


Pavitra Portal Shikshak Bharti 2022 is has been started now. The details & Application process details are given below. The Selection process of the teachers will be as per the Degree specialization. For More updates & Details keep visiting us. We will keep adding latest Updates. For More details please visit given Links on this page:-

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!