Shikshak Bharti- पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया रखडली

Shikshk Bharti 2022

Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Pavitra Portal Shikshak Bharti is that The teacher recruitment process on the holy portal has been stopped. Candidates Read the complete details given below on this page regarding the Teacheers Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पवित्र पोर्टलवर सुरू असलेली शिक्षक भरती रखडल्याने भावी शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. खासगी व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह पदभरतीची निवड केलेल्या १९६ व्यवस्थापनांच्या ७६९ जागांसाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी नवीन वेबसाइटही विकसित केली आहे. विद्यार्थ्यांना स्व-प्रमाणपत्र अपडेट करण्याच्या सूचना दिल्यानंतर पुढील प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. 

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

Maharashtra Shikshak Bharti 2022

परीक्षेचे कामकाज ठप्प!

२१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ११ महिन्यानंतरही जाहीर केला नाही. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची २० जून २०२२ रोजी प्रसिद्ध केली होती; मात्र निकाल जाहीर केला नाही. घोटाळ्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे.


Mega Shikshak Bharti 2022- There are 700 vacancies for teachers in Gadchiroli district.In Gadchiroli district, the posts of Deputy Education Officer, Group Education Officer, Head of Center and Headmaster are vacant. Read More details as given below.

महत्वाचे- हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त

प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा पाया आहे. मात्र अधिकारी आणि शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे गडचिरोली जिल्ह्यात हा पायाच खिळखिळा झाला आहे. उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक अशा सर्वच पदांचा भार प्रभारींच्या खाद्यांवर आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा डोलारा कमजोर झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या १२ पैकी १० जागा रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांच्या ५८, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या २१, जिल्हा परिषद शाळांमध्ये सद्य:स्थितीत शिक्षकांच्या ६७१ जागा रिक्त आहेत.


Maharashtra Shikshak Bharti 2022 will be started soon. The Minister of State for School Education Bachchu Kadu has promised to take up the Shikshak Recruitment in the education department as soon as possible. Bachchu Kadu Said that in the Corona crisis Schools were closed for more than two years. However, according to a survey conducted by the Central Education Department in 2021, Maharashtra is still leading in terms of educational quality. So their is a need start the Teachers Recruitment 2022 process quickly.

शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर सुरु होणार

शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घेऊ असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू त्यांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर, शैक्षणिक विषमतेबाबत बोलताना शैक्षणिक विषमता अत्यंत घातक असून ती देशाला पोकळ करु शकते, असं बच्चू कडू म्हणाले. कोरोना संकटात शिक्षणात अधोगती आली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ शाळा बंद होत्या. मात्र तरीदेखील केंद्रीय शिक्षण खात्यानं 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

Mega Shikshak Bharti 2022- State government has announced recruitment of 15,000 teachers, various conditions and rules have been imposed for it. Sociology subject has been made compulsory for recruitment and hence there is a shortage of candidates who have passed other elective subjects. Order has been issued for appointment of graduate teachers for sixth to eighth. Candidates, meanwhile, are required to have two elective subjects namely History, Economics, Geography, Political Science. Read More details as given below.

Shikshak Bharti -शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा!! जाणून घ्या

 शिक्षक भरतीसाठी समाज विज्ञान विषय सक्तीचा 

Updated on 20.03.2022  राज्य सरकारने 15 हजार शिक्षक भरतीची घोषणा केली असली तरी त्यासाठी विविध अटी आणि नियम लागू केले आहेत. भरतीसाठी समाज विज्ञान विषय सक्तीचा करण्यात आला असून त्यामुळे इतर ऐच्छिक विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गोची झाली आहे. सरकारने ही सक्ती रद्द करून सर्व विषयाच्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

 सार्वजनिक शिक्षण खात्याने नुकताच आदेश जारी केला आहे. त्यात सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीचा आदेश बजावला आहे. दरम्यान, उमेदवारांचे इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र यापैकी दोन ऐच्छिक विषय असावेत, अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. एकंदर शिक्षक भरतीचा हा फार्सच असल्याचे मानले जात आहे.यापूर्वी सर्व विषयांचे अध्ययन करणाऱया पात्र उमेदवारांना भरतीत मुभा दिली जात होती. परंतु, नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशात अनेक अटी आणि नियम घुसडून सरकारने शिक्षक भरतीलाच हरताळ फासण्याचा प्रयत्न चालविल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे


Updated on 15.03.2022- As per the news of newspaper Various posts are vacant in Zilla Parishad Primary School in Narkhed taluka. While 342 posts of headmaster, assistant and subject teachers have been sanctioned, only 312 teachers are working. 30 posts are vacant. Read More details as given below

कोविडमुळे त दोन शैक्षणिक सत्र शाळा बंद पहिल्या. ऑनलाइनच्या गोंधळात मामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान झाले. आता ऑफलाइन वर्ग सुरू झाले. मात्र शक्षकांची कमतरता असल्याने पुन्हा तिची स्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाइन वर्गामुळे शिक्षण विभागाला तारले असले तरी आता ऑफलाइनमुळे शिक्षण विभागाचे पतळ उघडे पडले आहे.

या तालुक्यातील शिक्षण विभागातील विविध पदे रिक्त

नरखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७८ प्राथमिक शाळा तर ३५ उच्च प्राथमिक शाळा अशा एकूण ११५ शाळा आहेत. त्यामध्ये ४९४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे मुख्याध्यापक, सहाय्यक व विषय शिक्षकांची ३४२ पदे मंजूर असताना ३१२ शिक्षक कार्यरत आहेत. ३० पदे रिक्त आहेत. यात उच्च श्रेणी मुख्याध्यापक १, पदवीधर भाषा शिक्षक ३ तर सहायक शिक्षकांची २६ पदे रिक्त आहेत.  


Mega Shikshak Bharti 2022- The CET will be held in May for teacher recruitment. This will be a great relief to the TET pass holders who are waiting for teacher recruitment. The education department has decided to recruit 15,000 seats for the sixth to eighth grades in the state. However, the education department has decided to take the CET after the 10th and 12th exams and the 12th exam will end in the second week of May. Therefore, the CET is likely to take place by the end of May.

After the CET, teachers will be recruited on merit basis and the CET schedule will be announced soon. Candidates will have to submit online application after the schedule is announced. There are more than 2 lakh TET pass holders in the state. So there is likely to be a huge crowd for the CET.

शिक्षक भरतीसाठी या महिन्यात सीईटी; 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

 शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) मे महिन्यात सीईटी (CET) घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या टीएटी पास धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • शिक्षण खात्याने राज्यात सहावी ते आठवीसाठी 15 हजार जागा भरती करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सीईटी कधी होणार याची उत्सुकता टीईटीत पास झालेल्या परीक्षार्थीना लागून राहिली आहे.
  • मात्र शिक्षण खात्याने दहावी व बारावीची परीक्षा झाल्यानंतर सीईटी घेण्याचा निर्णय घेतला असून बारावीची परीक्षा मेच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सीईटी होण्याची शक्यता आहे.
  • सीईटी झाल्यानंतर गुणवत्तेनुसार शिक्षकांची भरती होणार असून सीईटी चे लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना ऑनलाइन ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. राज्यात 2 लाखांहून अधिक टीईटी पास धारक आहेत. त्यामुळे सीईटीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
  • राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत. मात्र सरकारने 15 हजार जागा भरती करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे जागा कमी असल्याने सर्वच परीक्षार्थींचे सीईटीत गुणवत्ता मिळविण्याचे उद्धिष्ट असणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी अभ्यासाला सुरवात केली आहे.

Shikshak Bharti 2022: In upper primary department 15,000 teachers will be recruited. The date of the Common Entrance Test (CET) is likely to be announced in the coming weeks. This recruitment will be for B.Ed. Degree holders. If the recruitment is done as per the scheduled schedule, the stress on the teachers working in the academic year 2022-23 will be lessened. Read More details as given below.

Professor Bharti -राज्यात प्राध्यापकांची विविध पदे रिक्त 

Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ३०४६ प्रमुख पदे रिक्त

Mega Shikshak Bharti 2022

राज्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच


Shikshak Bharti 2022: As per the news published in the newspaper, there are more than 11,000 vacancies for Professors, Associate Professors and Assistant Professors in national level educational institutions including Kendriya University, IIT, IIM, Indira Gandhi National Open University. Also In Maharashtra, there are about 10,000 vacancies. Read More details as given belw.

शिक्षकांची तब्बल 11 हजारांहुन पदे रिक्त

केंद्रीय विद्यापीठ, आयआयटी , आयआयएम, इंदिरा गांधी राशीतरी मुक्त विद्यापीठ सह राष्ट्रीय स्तरावरील  शैक्षणिक संस्थापामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची ११ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. तर महाराष्ट्रात तब्ब्ल १० हजार पदे रिक्त आहेत.

राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी शिक्षकांची पदे रिक्त होत आहेत. मात्र  भरती प्रक्रिया तितक्या वेगाने होत नाही. महाराष्ट्रात २०१२ मध्ये विद्यापिठांमधील शिक्षकांची पदे शेवटच्या वेळी भरण्यात आली होती.

  1. राज्यात शिक्षक भरतीसाठी दुसरी अभियोग्यता चाचणी परीक्षा एप्रिल मध्ये
  2. Pavitra Portal Bharti 2022-राज्यात शिक्षक भरतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात..
  3. Shikshak Bharti -शिक्षकांसाठी राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय.-जाणून घ्या
  4. Shikshak Bharti -राज्यात १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

Shikshak Bharti 2022

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्येही कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. एका अहवालानुसार, देशातील पाच केंद्रीय विद्यापीठांमध्ये अशा 442 कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


Mega Shikshak Bharti 2022- There are many vacancies for primary teachers in Ratnagiri district. Out of total 7363 sanctioned posts in the district, 1088 posts are vacant. The vacancy is adversely affecting the functioning of the primary education department. Out of total 7363 sanctioned posts in the district, 6295 teachers are working. There are 1088 vacancies in the district. The vacancy is adversely affecting the functioning of the primary education department and there is a growing demand from parents and teachers for the recruitment of teachers.

या जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल 1088 पदे रिक्त

 रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण 7363 मंजूर पदापैकी 1088 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर परिणाम होताना दिसून येत आहे.

 रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागातील मराठी माध्यमामध्ये शिक्षकाची 6869 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 5903 शिक्षक कार्यरत असून 184 पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमामध्ये 494 मंजूर पदांपैकी 392 शिक्षक कार्यरत आहेत. एकूण 104 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण मंजूर 7363 पदांपैकी 6295 शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात तब्बल 1088 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून शिक्षकांची भरती होणे गरजेचे असल्याची मागणी पालकवर्ग आणि शिक्षकामधून होत आहे.

 सेवानिवृत्तांमुळे रिक्त पदांची संख्या वाढतेय

गेली काही वर्षे प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची भरती झालेली नाही. दर महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. सेवानिवृत्त शिक्षकामुळे रिक्त पदाचा आकडा दर महिन्याला वाढत आहे. ही रिक्त पदांची संख्या वाढतच राहिली तर भविष्यात प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणे अवघड होणार आहे.


In Nagpur rural schools there are 551 teachers post vacant. According to Zilla Parishad, there are 1,530 schools from 1st to 8th standard. More than 71,505 students from rural areas are studying there. A total of 4,552 teacher posts are sanctioned here, But at present only 4 thousand 1 teachers are working in this place. There are 551 vacancies for teachers.

  1. PCMC Teacher Bharti- या महापालिकेत शिक्षण विभागासाठी नव्याने पदनिर्मिती
  2. Shikshak Bharti -राज्यात १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त
  3. शिक्षकांसाठी राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय.-जाणून घ्या

जिह्यातील ग्रामीण भागांतील शाळांमधील ५५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. नरखेड आणि पारशिवनी तालुक्यांतील ४ शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नाही. परिणामी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाकडून शेजारील केंद्रातील शाळेतील शिक्षकांना प्रतिदिन पाठवण्यात येत आहे. अशा पद्धतीने या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कारभार चालू आहे, तसेच दिवसेंदिवस या जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय अशी होत आहे. गुणवत्तेसमवेत शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्याही घटत चालली आहे.

  • जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या अनुमाने १ सहस्र ५३० शाळा आहेत. त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जवळपास ७१ सहस्र ५०५ हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे एकूण ४ सहस्र ५५२ शिक्षकांची पदे संमत आहेत; मात्र सध्या या ठिकाणी ४ सहस्र १ शिक्षकच कार्यरत आहेत. ५५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
  • शिक्षकसंख्या अल्प असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतात. याविषयी राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे म्हणाले की, भावी काळात शाळांच्या पटसंख्येवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने सर्व साहाय्यक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तसेच विषय पदवीधर शिक्षक आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
  • गेल्या काही वर्षांमध्ये गुणवत्तेअभावी आणि ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या प्रतिवर्षी घसरत आहे. ही पटसंख्या रोखण्यासाठी शासनाने यापूर्वी सर्व शिक्षा आणि आता समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेश, पाठ्यपुस्तके आणि मध्यान्ह भोजन अशा विविध योजनांचा लाभ देणे चालू केले;
  • परंतु शाळांमध्ये आवश्यक तितके आणि अपेक्षित असे शिक्षक नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे पाल्यांना इंग्रजी किंवा इतर खासगी शाळांमध्ये शिकवण्याकडे ग्रामीण पालकांचाही कल वाढत आहे. ही पटसंख्या रोखण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाकडून कुठलीही उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही.

Shikshak Bharti 2022 -In schools in the Palghar district, there is a total of 2166 posts vacant. A total of 7,801 posts have been sanctioned for teaching students including primary teachers, graduate teachers, head of the center, and headmaster. (Teachers Recruitment 2022) Demands are being made at the administrative level to fill the vacancies, but the lack of approval from the ministry is having a major impact on students’ education.

  1. CTET परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड
  2. Shikshak Bharti -राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील – तब्बल २ हजार ८८ पदे भरणार
  3. Shikshak Bharti -पेसांतर्गत होणार शिक्षकांची भरती-जाणून घ्या सविस्तर…

Shikshak Bharti 2022

या जिल्हात २,१६६ शिक्षकांची पदे रिक्त

पालघर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या तीन हजार २८७ शाळा आहेत. या शाळांमध्ये तीन लाख ९५ हजार ७२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक असे मिळून सात हजार ८०१ पदांना मंजुरी असताना प्रत्यक्षात दोन हजार १६६ शिक्षकांची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. जवळपास चार लाख विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कसे शिकवायचे, असा मोठा प्रश्न शिक्षण विभागासमोर उभा राहिला आहे. या जागा भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मागणी करण्यात येत आहे, परंतु त्याला मंत्रालयातून मंजुरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे.

Shikshak Reruitment 2022 जिल्हा निर्मितीनंतर आदिवासी मुले शाळेमध्ये शिक्षणासाठी येऊ लागली आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची रिक्त पदे भरलेली नाहीत, अशी अवस्था आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ५ हजार ७१२ पदांना मंजुरी आहे. त्यापैकी ४ हजार ८७५ शिक्षक कार्यरत आहेत. ८३५ रिक्त आहेत, तसेच पदवीधर शिक्षकांचा १ हजार ५६८ जागा मंजूर असून त्यापैकी ६४० कार्यरत आहेत. ९५० जागा रिक्तच आहे.

Teachers Bharti 2022

  • जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १५० जागा मंजूर असून ५७ जागा कार्यरत आहेत, ९३ जागा रिक्त आहेत.
  • मुख्याध्यापकांच्या ३७१ जागा मंजूर आहेत. ८३ जागांवर शिक्षक कार्यरत आहे, तर २८८ जागा रिक्त आहेत.
  • जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी श्रेणी दोनमध्ये ५० मंजूर पदे असून १६ कार्यरत आहेत. ३५ पदे रिक्त आहेत.
  • विस्ताराधिकारी श्रेणी क्रमांक ३मध्ये २१ मंजूर पदे आहेत. त्यापैकी एकही पद भरण्यात न आल्याने सर्व पदे रिक्त राहिली आहेत.

प्राथमिक शिक्षकांची पालघर तालुक्यात १६० पदे रिक्त आहेत. डहाणू तालुक्यात १७४, तलासरी तालुक्यात ८०, वसई तालुका ११७, वाडा ८९, विक्रमगड ७१, जव्हार ८६, मोखाड्यात ३८, अशी ८३५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांमध्ये पालघर ९६, डहाणू २२०, तलासरी १३३, वसई १४४, वाडा ९२, विक्रमगड ७९, जव्हार १२४ आणि मोखाड्यात १६५ अशा ९५० जागा रिक्त आहेत. जिल्ह्यातील केंद्र शाळांमध्ये केंद्रप्रमुख यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये पालघर तालुक्यात १९ जागा, डहाणू १९, तलासरी ६, वसई ८, वाडा १२, विक्रमगड ९, जव्हार १२ आणि मोखाड्यात ८ अशा ९३ जागा रिक्त आहेत. पालघर तालुक्यातील शाळांमध्ये ३७ मुख्याध्यापक पदे रिक्त आहेत. डहाणू ७२, तलासरी ४४, वसई ५०, वाडा ३०, विक्रमगड २२, जव्हार २१ आणि मोखाड्यात १२ अशा मुख्याध्यापकपदाच्या २८८ जागा रिक्त आहेत.


Teacher Recruitment 2022 The education department has announced new rules for teacher recruitment. Accordingly, the candidate for teacher recruitment will have passed the TET Exam. Candidates will have to appear for the CET Exam after passing the TET. After the recruitment of teachers, a competitive examination will be held for the recruitment of teachers for the sixth to eighth classes. Preference will be given to the teachers who have passed the examination.

शिक्षकांना (Teacher) बढतीसाठी यापुढे स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धा परीक्षा घेऊन यापुढे शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

शिक्षण खात्यातर्फे लवकरच राज्यातील रिक्त असलेल्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. शिक्षक भरती ( Teacher Recruitment) बाबत सरकारकडून हिरवा कंदील मिळतात भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात येईल अशी माहिती काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्यांनी दिली होती. त्याच बरोबर आता सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धा परीक्षा (Competitive Exam)घेतली जाणार आहे.

शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठीचे नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवार टीईटी परीक्षा (TET Exam)पास झालेला असेल. टीईटी पास झाल्यानंतर उमेदवारांना सीईटी (CET Exam) परीक्षा द्यावी लागेल सीईटी परीक्षेत पास झाल्यानंतर गुणवत्तेनुसार भरतीसाठी यादी जाहीर केली जाणार आहे. शिक्षकांची भरती झाल्यानंतर सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेत पास झालेल्या शिक्षकांना भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे.

शिक्षण खात्याने सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला तरी प्राथमिक शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांना अगोदर बढती द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांकडून केली जात आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची नेमणूक करताना ६७ टक्के शिक्षकांची नव्याने भरती तर त्यात ३३ टक्के शिक्षकांना सेवा बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असून राज्यात सहावी ते आठवीच्या वर्गांमध्ये ५२६३० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा वेळेत भरती करणे गरजेचे असून रिक्त शिक्षकांच्या जागांवर सध्या अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू होत असल्याने अनेक नव्या नियमांची भर पडत असून सहावी ते आठवीसाठी शिक्षक भरती करताना स्पर्धा परीक्षेचे नवा नियम लागू होणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळण्यास मदत मिळणार आहे.

शिक्षक भरती अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा या महिन्यात होणार

Candidates are required to pass TET and Aptitude and Intelligence Test for Teacher Recruitment. Maharashtra State Examination Council will conduct aptitude and intelligence test for teacher recruitment in February. The online application process for this exam will be started soon.

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक भरतीसाठी येत्या फेब्रुवारीमध्ये अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
  • राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षकभरती करण्यासाठी पवित्र पोर्टल प्रणाली विकसित केली आहे. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी “टीईटी’ व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. महाआयटी मार्फत पहिली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आली होती.
  •  या परीक्षेला 1 लाख 90 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. राज्य शासनाचे अवर सचिव प्रवीण मुंढे यांनी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्याबाबत संबंधित यंत्रणाचा समन्वय साधून नियोजन करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना बजाविले आहेत.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Harshada Shankar Talape says

    Hello sir/mam
    Hindi medium teachers vacancy kewha nighanar? Ani jar nighnarxh nasel tr tumhi hindi medium D. T. Ed hindi medium college ka chalu thevlet?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!