GMC Bharti – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1058 पदे रिक्त

Govt Medical College Bharti 2023

Govt Medical College Bharti 2023: As per the latest update regarding Govt Medical College & Hospital is that there is a total of 1058 vacancies are vacant.  Medical Education Minister Girish Mahajan informed the Legislative Council that there are 105 vacant posts in the Government Medical Colleges, 156 Associate Professors and 797 Assistant Professors.

नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक संवर्गात १०५, सहयोगी प्राध्यापक १५६, तर सहायक प्राध्यापकांची ७९७ अशी एकूण १०५८ पदे रिक्त असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

एकूण १,२०१ पदांचे मागणीपत्र आयोगास पाठविण्यात आले आहे. त्यापैकी २१५ अध्यापकांना पदस्थापना देण्यात आली आहे. १५९ अध्यापकांना पदस्थापना प्रस्तावित आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदांबाबत प्राध्यापक १३३ व सहयोगी प्राध्यापक १८३ पदांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर केला आहे. विभागाने शिफारस केलेले प्राध्यापक १०५ व सहयोगी प्राध्यापक १५३ जणांना पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात सांगितले.

 


 

Govt Medical College Bharti 2022: As per the latest update regarding Govt Medical College & Hospital is that there is a total of 1200 vacancies are vacant for Teachers. There are vacant posts in Government Medical Colleges from Principals to Professors. Read More details about GMC Bharti 2022 are given below.

राज्यात डझनभर नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे; परंतु सध्या सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षकांची तब्बल १२०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. ही पदे अनेक दिवसांपासून भरली जात नसताना आणि एकूणच वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावत असताना, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्वाचे म्हणजे थेट अधिष्ठातांपासून अगदी सहाय्यक प्राध्यापकांपर्यंतची पदे रिक्त असल्याचेही यानिमित्ताने समोर येत आहे.

Maharashtra GMC Recruitment 2022

 • सध्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांचे पददेखील प्रभारीच आहे. त्याशिवाय मंजूर २३ पैकी ११ अधिष्ठाता, ४९० पैकी १६८ प्राध्यापक, ११२६ पैकी २०६ सहयोगी प्राध्यापक व १७६५ पैकी ८२४ सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे
 • . त्यामुळे ‘एनएमसी’च्या तपासणीवेळी याच वैद्यकीय शिक्षकांची ‘उसनवारी’ करण्याची वेळ अजूनही येत आहे आणि हा उसनवारीचा उद्योग वर्षानुवर्षे सुरुच आहे.
 • अशी एकंदर स्थिती असताना वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती नगण्य होत आहे आणि पुन्हा १२ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालये सुरू केली जात असताना जुन्या महाविद्यालयांच्या रिक्त पदांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 • केवळ शिक्षकांची नव्हे तर परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही पदे लक्षणीय प्रमाणात रिक्त आहेत. या सगळ्याचा फटका वैद्यकीय शिक्षणाला तसेच रुग्णसेवेलाही बसत आहे आणि वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने घटत असल्याचा आरोप होत आहे.

सुपरस्पेशालिटी’त नियुक्ती केव्हा?

मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांर्तगत अतिविशेषोपचार केंद्रांच्या (सुपरस्पेशालिटी ब्लॉक) सुसज्ज इमारती मागेच उभ्या करण्यात आल्या आहेत. या केंद्रांमध्ये विविध प्रकारची उपकरणे व यंत्रसामुग्रीही सज्ज आहे. या केंद्रांतील डॉक्टरांच्या पदांना उशिरा का होईना मंजुरीही मिळाली. मात्र अद्यापही नियुक्ती झालेली नाही. शासकीय विभागीय कर्करुग्णालयाची स्थितीही त्यापेक्षा वेगळी नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चूनही अपेक्षित असलेली अद्ययावत रुग्णसेवा सुपरस्पेशालिटीतून मिळत नसल्याचे चित्र आहे.

एनआयआरएफ’मध्ये शून्य स्थान

‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क’अंतर्गत (एनआयआरएफ) देशातील ५० उत्तम वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश नाही. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत वेगवेगळ्या निकषांच्या आधारे ही सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयांची यादी जाहीर केली जाते. या यादीत महाष्ट्रातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्थान मिळाले नसल्याचे सलग काही वर्षांपासून दिसून येत आहे.


Govt Medical College Bharti 2022: There are 22 government medical colleges in the state, many of the posts of professors are vacant. The recruitment of these vacancies will be done soon. This recruitment process will be conducted through MPSC soon. Read More details about Govt Medical College Bharti 2022/GMC Bharti 2022 are given below.

राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत (MPSC) लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य नागोराव गाणार यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महाजन बोलत होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यानुसार सद्यस्थितीत भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन म्हणाले. सर्व महाविद्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस कमिशन तयार करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करीत असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

 

 


Govt Medical College Bharti 2022– As per the latest news, About 60 per cent vacancies for medical doctors in government medical colleges and hospitals in the state are vacant. With the exception of the Department of Ophthalmology, Gynecology and Surgery, more than 50 per cent of the vacancies in the remaining 10 departments are vacant.

नागपूर : सामान्य व गरीब रुग्णांचे आशेचे किरण असलेल्या राज्यातील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांच्या तब्बल ६० टक्के जागा रिक्त आहेत. यातही नेत्र, स्त्री रोग व शल्यचिकित्सा विभाग सोडल्यास उर्वरित १० विभागांतील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. 

राज्यात शासकीय डॉक्टरांच्या ६० टक्के जागा रिक्त 

राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार केला असता, या महाविद्यालयांवर तज्ज्ञ व कौशल्यप्राप्त

डॉक्टर घडविण्यासोबत ‘टर्शरी केअर’चीही जबाबदारी आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आधीच मंजूर पदांची संख्या कमी पडत आहे. त्यात रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण पडला आहे.

सहायक प्राध्यापकांच्या ५८६ जागा रिक्त

राज्यात २२ मेडिकल कॉलेजमधील १३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापकांच्या ९४६ जागा मंजूर आहेत. यातील ३७८ जागा भरलेल्या असून, तब्बल ६० टक्के म्हणजे, ५८६ जागा रिक्त आहेत.


राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विविध पदांच्या 884 जागा रिक्त

Govt Medical Assistant Professor Bharti 2022: There are 884 vacancies in 22 government medical colleges and Hospital  in the state. It has posts of Associate Professor, Professor, Assistant Professor. Out of these, 450 assistant professors are currently serving in these medical colleges. Read More details as given below.

GMC औरंगाबाद मध्ये123 पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

Govt Medical College Bharti 2022 राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत 884 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक यांनी वर्षानुवर्षे सेवा दिली, तरीही त्यांची वेळेवर पदोन्नती होत नाही की त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभही दिला जात नाही. यावरून शासकीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सध्या अनागोंदी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

या जिल्ह्यातील GMC मध्ये 56 पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये भरती-नवीन जाहिरात प्रकाशित

Govt Medical College Bharti 2022

 • कोविड काळात पहिली, दुसरी आणि तिसर्‍या लाटेत अविरत काम करणार्‍या डॉक्टरांच्या मागणीची तत्काळ दखल घेण्याची गरज आहे. राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये 884 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.
 • यापैकी सध्या 450 सहायक प्राध्यापक हे या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड सेवा देत असून, ते या जागांवर पात्र आहेत. मात्र, सध्या हे सहायक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने राबत आहेत; परंतु, वारंवार आंदोलन, मोर्चे काढूनही त्यांची ही मागणी पूर्ण केली जात नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे या शिक्षकांचा उत्साह मावळत असून, ते वैद्यकीय शिक्षणाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही.
 • राज्यात दरवर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून पदव्युत्तर पदवी घेऊन साडेतीनशे ते पाचशे डॉक्टर बाहेर पडतात. ज्या डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात सक्रियपणे काम केले आहे, त्यांचे वैद्यकीय सेवेत समावेशन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनने केली आहे.
 • त्यासाठी या संघटनेने जे जे वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच 17 दिवस साखळी उपोषण केले. मात्र, त्याचीही दखल न घेतल्याने शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना भेटायला गेले असताना त्यांनी डॉक्टरांना ‘बास्टर्ड, गेट आउट’ अशी भाषा वापरून त्यांना अपमानित केले होते.

या जिल्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत अध्यापकांची पदे भरणार

Govt Medical College Bharti 2022-GMC Bharti 2022- Under the Center of Excellence scheme, teaching posts will be filled in medical colleges in Nagpur, Pune, and Akola. It has been approved to create a total of 9 posts of 1 Professor, 3 Associate Professors, and 5 Assistant Professors. Read More details as given below.

GMC Recruitment 2022– सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत नागपूर, पुणे तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळात वाढ करून ९ अध्यापकीय पदांची निर्मिती करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

त्यानुसार वै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या तीन संस्थांकरिता १ प्राध्यापक, ३ सहयोगी प्राध्यापक व ५ सहायक प्राध्यापक अशी एकूण ९ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी वार्षिक रु.१.७५,१०,६५२/- (रु. एक कोटी पंच्चाहत्तर लाख दहा हजार सहाशे बावन्न फक्त ) खर्च होईल. तसेच सद्याच्या एकूण २७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त ५९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढ होईल.


Government Medical College Recuritment 2021 for Professor posts will be held soon. As per the latest news there were 790 posts of associate professors are vacant in government medical colleges across the Maharashtra state. The government has started the process through the Maharashtra Public Service Commission (MPSC) to fill that posts. Currently, professors are being appointed on a three-month contract basis across the state. The MPSC recruitment process has received a great response. The majority of applicants are currently working on honorarium. Eligibility such as MD or MS after MBBS and at least one year of experience as a resident doctor.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद मध्ये123 पदांची भरती

MPSC वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागामध्ये 228 पदांची भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्राध्यापकांची ७९० पदे रिक्त

 राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची तब्बल ७९० पदे रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे; पण आयोगाच्या कामकाजाची मंद गती पाहता ही पदे केव्हा भरली जातील याबाबत वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी साशंक आहेत.

राज्यात काही नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मंजूर झाल्याने रिक्त जागांचा प्रश्न चर्चेत आला आहे. सातारा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या शैक्षणिक वर्षापासून १०० जागांवर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने गुरुवारी (दि. १६) मंजुरी दिली. पण तेथे कामासाठी प्राध्यापकच उपलब्ध नाहीत. परिषदेच्या पाहणीवेळी मिरज, सांगली, पुणे व सोलापुरातून प्राध्यापक तात्पुरते नियुक्त केले होते. अलिबाग, सिंधुदुर्ग व उस्मानाबादेतही नव्या महाविद्यालयांचे काम सुरू आहे; पण तेथेही प्राध्यापक नाहीत.

 सध्या राज्यभरात तीन-तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्तीस आहेत. एमपीएससीच्या भरतीप्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये सध्या मानधनावर काम करणारेच बहुसंख्येने आहेत. एमबीबीएसनंतर एमडी किंवा एमएस आणि किमान एक वर्षाचा निवासी डॉक्टर म्हणून सेवेचा अनुभव अशी पात्रता अपेक्षित आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, गरजेनुसार चाळणी परीक्षा होईल. मुलाखती मात्र होणार आहेत. ही प्रक्रिया कितपत गतीने पूर्ण होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नव्या महाविद्यालयांना यातूनच प्राध्यापक मिळणार आहेत.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Krushna Baburao Darunte says

  X-Ray technician
  1 years experience

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!