बारावी निकाल: काय आहे श्रेणीसुधार योजना? जाणून घ्या

HSC 12th result  2020

12th Class Improvement Scheme: The result of 12th class of State Board is 90.66 percent. Students of Arts, Commerce and Science have got a lot of marks. However, for those students who have got low marks and want an opportunity to increase their marks, the State Board gives them a chance to sit for two examinations instead of one. Let’s learn more about this Class Improvement Scheme …

The grading or grading scheme is applicable to the same students who have passed all the subjects. Under the Class Improvement Scheme, they are given the opportunity to re-sit in only two adjacent examinations

बारावी निकालात ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण पुन्हा परीक्षा देऊन वाढवायचे आहेत त्यांना श्रेणीसुधार योजनेसाठी मंडळाने काय नियम सांगितले आहेत…वाचा.

12th Class Improvement Scheme: राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुण वाढवण्याची संधी हवी आहे, त्यांना राज्य मंडळ एक नव्हे तर दोन परीक्षांमध्ये पुन्हा बसण्याची संधी देते. या Class Improvement Scheme बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजना त्याच विद्यार्थ्यांना लागू आहे, जे सर्व विषयांत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना Class Improvement Scheme अंतर्गत केवळ लगतच्या दोनच परीक्षांमध्ये पुन्हा बसण्याची संधी दिली जाते.

‘श्रेणीसुधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या गुणपत्रिका वितरित केल्याच्या दिनांकापासून एक महिन्यापर्यंत विकल्प देणे अनिवार्य आहे. त्यानंतर विकल्पासह जादा शुल्क आकारून सहा महिन्यापर्यंत गुणपत्रिका देण्यात येईल. सहा महिन्यांपर्यंत विकल्प न दिल्यास श्रेणीसुधारची संपादणूक रद्द करून पूर्वीचीच संपादणूक ग्राह्य धरण्यात येईल. तरी याबाबत विभागीय मंडळाशी त्वरित संपर्क साधावा,’ अशी सूचना बारावी परीक्षेच्या ऑनलाइन निकालात देण्यात येते.

बारावी परीक्षेत यंदा किती विद्यार्थ्यांना कोणत्या श्रेणी मिळाल्या पाहा –

राज्याचा एकूण निकाल ९०.६६

राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. ९३.८८ टक्के विद्यार्थिनी तर ८८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

एनसीसी, स्काउट/गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण

मागील दोन वर्षांपासून म्हणजेच २०१८-१९ पासून एन.सी.सी. व स्काउट / गाइडच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी तसेच १०० टक्के गुणांच्या अधीन राहून शासन निर्णयानुसार गुण देण्यात आले आहेत. यासोबतच खेळाडू विद्यार्थ्यांनाही सवलतीचे गुण देण्यात येतात. खेळाडू विद्यार्थ्यांना हे गुण २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून देण्यात येतात.

महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२० – ग्रेडिंग सिस्टम
गुण — श्रेणी
७५% आणि पुढे — डिस्टिंक्शन
६०% आणि पुढे — प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास)

४५% ते ५९% — द्वितीय श्रेणी (फर्स्ट क्लास)

३५% ते ४४% — उत्तीर्ण श्रेणी (पास क्लास)

३५% पेक्षा कमी — अनुत्तीर्ण


HSC 12th result 2020

Learn step by step how to view the results of Class XII on the website provided by the State Board …

HSC 12th result 2020: After many days of waiting, the results of Class XII of State Board of Secondary and Higher Secondary Education is now announced today. The results will be available online. The board has given students the addresses of three websites. Students will be able to view the results on these websites. But learn how to watch it .

राज्य मंडळाने दिलेल्या वेबसाइटवर बारावीचा निकाल कसा पाहायचा ते स्टेप बाय स्टेप जाणून घ्या…

HSC Results 2020 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. जरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोणक विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?

> www.mahresult.nic.in

> www.hscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल?  • विद्यार्थी आपला बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट पाहू शकतात. पुढील स्टेप्सद्वारे निकाल पाहता येईल.
  • – निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  • – त्यानंतर Maharashtra HSC result 2020 क्लिक करा
  • – त्यानंतर एक विंडो सुरु होईल.
  • – इथे आपला बैठक क्रमांक म्हणजेच सीट नंबर आणि आईचं नाव टाकून सबमीट करा.
  • – त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • – माहितीसाठी तुम्ही या निकालाचं प्रिंटही घेऊ शकाल.

बारावीचा आज निकाल; ‘या’ तीन वेबसाइटवर पाहा

बारावीच्या परीक्षेसाठी निकाल जाहीर करताना राज्य मंडळाची श्रेणी पद्धती पुढीलप्रमाणे असते –

महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२० – ग्रेडिंग सिस्टम
गुण श्रेणी
७५% आणि पुढे– डिस्टिंक्शन
६०% आणि पुढे — प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास)
४५% ते ५९% — द्वितीय श्रेणी (फर्स्ट क्लास)
३५% ते ४४% — उत्तीर्ण श्रेणी (पास क्लास)
३५% पेक्षा कमी –अनुत्तीर्ण

दहावी-बारावी निकालानंतर गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन ऑनलाइनच

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल हा मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना महामारीचं संकट आणि त्यामुळे केलेला लॉकडाऊन यामुळे निकालास उशीर झाला आहे. राज्यातील बारावीची संपूर्ण परीक्षा लॉकडाऊन पुकारण्याआधी संपली होती. केवळ दहावीचा भूगोल विषयाचा पेपर शिल्लक राहिला होता. त्यामुळे हा राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे.

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी –

विज्ञान – ५,८५,७३६

कला – ४,७५,१३४
वाणिज्य – ३,८६, ७८४
व्होकेशनल – ५७,३७३
एकूण – १५,०५, ०२

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!