Army Bharti – डिसेंबरमध्ये सैन्य भरती

Indian Army Kolhapur Bharti 2021

तयारीला लागा! कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती

Kolhapur State Deputy Chief Minister Ajit Pawar while talking to reporters informed about Army recruitment and filling of vacancies through MPSC (Maharashtra Public Service Commission). Ajit Pawar has said that army recruitment will take place in Kolhapur in December.  Read the more details given below and keep visit on our website for the further updates.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सैन्य भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरण्यासंदर्भात माहिती दिली. कोल्हापूरला डिसेंबर महिन्यात सैन्य भरती होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सैन्य भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरण्यासंदर्भात माहिती दिली. कोल्हापूरला डिसेंबर महिन्यात सैन्य भरती होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. तर, राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्तपदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैनिक भरती आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले आहेत, नियमावलीची अडचण न येता, भरती कशी होईल याचं नियोजन पोलिसांनी करावं, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यात सैनिकांची भरती असेल तिथे मुलींना संधी मिळावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

30 सप्टेंबरपूर्वी MPSC ला माहिती द्या

MPSC बाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत, त्या जागांची माहिती MPSC ला कळवायचं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे, जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत जागा येतील. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केली जाईल, असं अजित पवार म्हणाले.

1 Comment
  1. Omkar tambe says

    SSC GD

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!