Maha TAIT Exam 2023- टेट’ परीक्षा ऑनलाईन लिंक उपलब्ध ; लगेच अर्ज करा
Maha TAIT Exam 2023 Time Table Declared @ www.ibpsonline.ibps.in/mscepjan23
Maha TAIT Exam 2023 Update
MAHA TAIT Exam 2023- The ‘Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT)-2022’ exam will be conducted online for teacher recruitment. Online Application form started now. Eligible and Interested candidates may apply online through the https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/. Online application start from 31st Jan 2023. The closing date for submission of online application form is 8th Feb 2023. “Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2022” will be conducted online from 22/02/2023. Read More details are given below.
शिक्षक भरती जाहिरात प्रकाशित ; आज पासून अर्ज सुरु
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे.. “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.
- परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
- सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतः चा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
- ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test 2022 Time Table
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 31/01/2023 |
Closure of registration of application | 08/02/2023 |
Closure for editing application details | 08/02/2023 |
Last date for printing your application | 23/02/2023 |
Online Fee Payment | 31/01/2023 to 08/02/2023 |
उमेदवारांची पात्रता- Educational Criteria For Maharashtra TAIT Exam 2023
निवड प्रक्रिया पद्धत : Selection Process for Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) – 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः Maha TAIT Application 2022 Process
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी
X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 200X300 pixels
फाईल साईज 20 kb50kb – - (ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 140X60 pixels
फाईल साईज 10kb 20kb - (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.
आकारमान 240X240 pixels in 200 DPI
फाईल साईज 20 kb 50kb - (ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 800×400 pixels in 200 DPI
फाईल साईज 50kb-100kb – - स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना
- (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी
परीक्षेचे शुल्क : Maha TAIT Exam 2022 Application Fees
१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
२. मागासवर्गीय / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे. ४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२- जाहिरात
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिंक
Maha TAIT Exam 2023- Latest updates Maha TAIT Exam is that As many as 65,000 teacher posts are vacant in primary, secondary and higher secondary schools in the state. For that, ‘Tate’ exam will be organized. 35 thousand teachers will be recruited. Against this backdrop, the ‘TET’ exam will be conducted online in February at centers across the state.
शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरूण-तरूणी परीक्षा देतील असा अंदाज परीक्षा परिषदेचा आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च मध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी ‘टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणत: दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरु आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरूणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दोन टप्प्यात ६५ हजार शिक्षक भरती
सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील २० लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे. त्यामुळे दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांनी त्यासंबंधीचे नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच ३३ ते ३५ हजार पदांची भरती एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.
Maha TAIT Exam : Aptitude and intelligence test required for teacher recruitment will be conducted online soon. The online test will be conducted from February 17 to 28 through one of TCS, IBPS and MKCL. The exam schedule will be announced on 16 December 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha TAIT Exam and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates
पुढील वर्षी १७ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टिचर्स अॅप्टिट्यूट ॲण्ड इन्टेलिजन्स टेस्ट- टीएआयटी) म्हणजेच थेट ही परीक्षा घ्या व त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला दिला.
यासंदर्भात जितेंद्र सोनकुसरे यांच्यासह चार उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व एम. डब्ल्यू.चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी १ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक पात्रता चाचणी (टिचर एलिजिबिलिटी टेस्ट-टीईटी) परीक्षा उत्तीर्ण केली परंतु, कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्रतेसाठी टेट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मागील टेट चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर ही परीक्षाच घेण्यात आली नाही, असे म्हटले होते.
पुणे शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे. निवड झालेल्या संस्थेकडून 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर, प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषांमध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल हे परीक्षा कसे घेणार, याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. निवडलेल्या संस्थेला परीक्षेची तयारीकरिता 4 महिने वेळ लागेल. त्यामुळे 17 फेब—ुवारी 2023 पासून परीक्षेला सुरुवात होईल.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही. संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही. परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन, तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या. त्याचपध्दतीने फेब—ुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे
Maha TAIT Exam 2022: Important updates regarding Maharashtra Teachers Aptitude and Intelligence Test. Aptitude and intelligence test for recruitment of teachers has not been conducted in the state for last four years. Now after four years the teacher aptitude test will be conducted by an external system. Read More details regarding Maharashtra TAIT Exam 2022 are given below.
चार वर्षांनंतर होणार शिक्षक अभियोग्यता चाचणी
- शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांची अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) घेतली जाते. मात्र 2017 नंतर मागील चार वर्षांत ही परीक्षा घेतलेली नाही. यंदा शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे.
- यंदा फेब्रुवारी महिन्यात अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र टीईटी परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर ही परीक्षा लांबणीवर पडली. खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या गुणांआधारे करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले. सहा महिन्यांत एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यानंतर महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत डिसेंबर 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली. यंदा मात्र परीक्षा परिषदेकडे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) चे आयोजन करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या पॅनलमधून निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. जागा रिक्त असूनही आता पंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने पात्र उमेदवारांचे नुकसान होत आहे. तसेच शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत आहे. याचा विचार करून या परीक्षेचे लवकरात लवकर आयोजन करावे, अशी मागणी डीएलएड आणि बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.
I am 12th class completed to gadge baba ,University . my BA first continue to badge baba uniarcity.University I want a job
I an interested to job
I am MSc organic chemistry completed and 75% srtmununiversity
MSc organic chemistry in srtmun University 75 %