विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइनच

Maharashtra University Exams 2021

Maharashtra University Exams 2021- Due to the increasing prevalence of corona, various boards canceled the Class X examinations and postponed the Class XII examinations. After that, all the examinations of 13 non-agricultural universities in the state will now be conducted online, Higher and Technical Education Minister Uday Samant announced on Thursday.

विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइनच

राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने. राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केले स्पष्ट.

राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जाहीर केले. कॉलेजांच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सामंत यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी, ‘राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन होणार.

विद्यार्थांना नुकसान होणार नाही यांची काळजी विद्यापीठ आणि कॉलेजांकडून घेतली जाईल, परीक्षांपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सामंत यांनी विद्यापीठांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागावा यासाठी विद्यापीठातील कुलगुरूंनी उच्च शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि प्राध्यापकांचा अत्यावश्यक सेवामध्ये समावेश करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्य सचिव यांना करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!