Medical Fire Department -महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरतीला हिरवा कंदील

Medical Fire Department Bharti 2022

Medical Fire Department 2022- The urban development department has cleared the way for the recruitment of 706 posts including 348 posts in fire department and 358 posts in health and medical department. The state government had not given instructions regarding the organization through which the recruitment of these posts should be done.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे.

राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक कंपनी महापालिकेकडून अंतिम केली जाणार आहे.

असा आहे मंजुरीचा प्रवास

शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत होती. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली. दुसरीकडे सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.

अखेर नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी यासंदर्भातील निर्देश दिले नव्हते.

परंतु, टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला गेला. यानंतर महापालिकेने या दोन्ही कंपन्यांना मंगळवारी (दि. २९ नोव्हेंबर) पत्र पाठवून त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भातील पदनिहाय सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिल्याने या भरती प्रक्रियेला चालना मिळाली.

राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर प्रस्ताव मागवण्यात आले असून, त्यानंतर एक कंपनीची भरतीसाठी निश्चिती केली जाईल.

महापालिकेत पदांची आकडेवारी…

  • ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदे : ७,०८२
  • सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्तपदे : २,६०० च्या वर
  • सद्य:स्थितीत कार्यरत अधिकारी, कर्मचारी : ४,५००

Medical Fire Department Recruitment 2022:  As per the latest news Recruitment of 248 posts in fire and medical department will be done soon. This recruitment process will be implemented through TCS or IBPS and the recruitment will be done in the month of November. Read More details about Medical Fire Department Recruitment 2022 are given below.

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राबाहेरील पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच अनुषंगाने महापालिकेनेदेखील अग्निशमन व वैद्यकीय विभागातील २४८ पदांच्या भरतीचा निर्णय घेतला असून, ‘टीसीएस’ किंवा ’आयबीपीएस’ मार्फत भरती केली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भरती होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Fire Department – मुंबई अग्निशमन दलात 900 अग्निशामकांची भरती; नोव्हेंबरपासून मेगा भरती प्रक्रिया

  • कोविड काळामध्ये वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात महापालिकांमध्ये महत्त्वाची पदे तातडीने भरण्याचा निर्णय दिला. तातडीची बाब म्हणून मानधनावर पदे भरण्यास मान्यता दिली.
  • कोरोनानंतरदेखील राज्य शासनाने महत्त्वाचे म्हणजेच अग्निशमन व वैद्यकीय विभागात रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचा निर्णय जाहीर केला. नाशिक महापालिकेत वैद्यकीय विभागात ८१ डॉक्टरांसह अग्निशमन विभागातील २४८ पदे रिक्त आहेत.
  • परंतु, सेवा- शर्ती नियमामुळे ती पदे भरता येत नाही. शासनाने सेवा- शर्ती नियमावलीचा तांत्रिक मुद्दा निकाली काढताना महापालिकेकडून तातडीने प्रस्तावदेखील मागविला. त्यानंतर रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली.
  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्र बाहेरील राजपत्रित गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गातील पदांकरिता टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच अनुषंगाने नाशिक महापालिकेमार्फतदेखील नोव्हेंबर महिन्यात भरती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अग्निशमन विभागातील 348 फायरमन भरतीचा मार्ग मोकळा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!