Parbhani Teacher Bharti -परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागात 93 पदे रिक्त
Parbhani Teacher Bharti 2023
Parbhani Teacher Recruitment 2023- There are 93 vacancies in education department of Parbhani district. It is seen that due to these vacancies, the work of teachers is greatly affected. Read More details are given below.
ZP Teacher Bharti – खुशखबर! जि.प. शाळांमधील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणार
Parbhani Teacher Bharti 2023: सेलू शिक्षण हे व्यक्ती, समाज घडविण्याचे माध्यम आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ९३ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या रिक्त पदांमुळे शिक्षकांच्या कामावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अवलंबून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील रिक्त पदांचा आकडा वाढत चालला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १११ शाळा आहेत. या शाळेत ११ हजार ८६९ विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र, अराजपत्रीत मुख्याध्यापकांची मान्य पदे दोन असून दोन्ही रिक्त आहेत. यात गुगळी धामणगाव व देऊळगाव गात येथील शाळेत ही पदे रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षकांची मान्य पदे ११ असून कार्यरत सहा आहेत. पाच पदे रिक्त आहेत.
Shikshak Bharti – राज्यात 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती
केंद्र प्रमुखांची ९ पदे मान्य असून केवळ एकच कार्यरत आहेत. त्यामुळे ८ रिक्त पदे आहेत. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची ३४ मान्य पदे असून कार्यरत २४ आहेत. तर १० पदे रिक्त आहेत. प्राथमिक पदवीधर शिक्षकांची ११४ पदे मान्य असून कार्यरत केवळ ७५ आहेत. तब्बल ४० पदे रिक्त असू यापैकी एक अतिरिक्त पद रिक्त आहे.
Comments are closed.