महत्वाचे! पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते? जाणून घ्या.

Police Bharti Mahiti Syllabus GR

Police Bharti Mahiti Syllabus GR: Maharashtra State Police Recruitment Board issues notification for the recruitment of vacancies every year. The recruitment process is carried out for the posts of Police Constable, Assistant Sub Inspector (ASI), Fireman, Driver, Female Head Constable, etc. Official notification of the police recruitment process is available at www.mahapolice.gov.in. Interested candidates should visit the official website from time to time so that you can get the right and complete information.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती बोर्ड तर्फे दरवर्षी रिक्त जागांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन काढले जाते. पोलीस कॉन्स्टेबल , असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI) , फायरमन , ड्राइव्हर , महिला हेड कॉन्स्टेबल इत्यादी पदांच्या भरती साठी भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलीस भरती प्रक्रियेचे ऑफिसिअल नोटिफिकेशन www.mahapolice.gov.in ह्या संकेत स्थळावर उपलब्ध होते. इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी ऑफिसिअल संकेतस्थळा ला देत रहावे जेणे करून योग्य व परिपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील. पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष आपण थोडक्यात जाणूण घेऊया.तसेच पोलीस भरती संदर्भातील नवीन माहिती साठी येथे क्लिक करा.

वयाची अट

पोलिस भरती होण्यासाठी खुल्या वर्गासाठी : १८ ते २८
कास्ट : १८ ते३३
मराठा Esbc : १८ ते ३३

SRPF वयोमर्यादा किती…

खुल्या वर्गासाठी फक्त मुले : १८ ते २५
कास्ट : १८ ते ३०
मराठा : १८ ते ३०

ड्रायव्हर पदासाठी …

खुल्या वर्गात : १९ ते २८
कास्ट : १९ ते ३३
मराठा Esbc : १९ ते ३३
बॅन्ड्समन पदासाठी …
फक्त मुले खुल्या वर्गात : १८ ते २८
कास्ट : १८ ते ३३
मराठा Esbc : १८ ते ३३

शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)

उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी, SRPF : फक्त मुले १६८ सेमी, ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी, बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी

आवश्‍यक कागदपत्रे

– दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
– महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
– शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
– आधार कार्ड
– कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
– नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
– लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
– ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.

लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण …

– मराठी २५, गणित २५, बुद्धिमत्ता २५, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २५
– (फक्त ड्राइव्हर)- मराठी २०, गणित २०, बुद्धिमत्ता २०, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २०, वाहतूक २०)

मैदानी परीक्षेसाठी दुसरा टप्प्यात लागणारे ५० गुण …

मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी. १० सेकंद – ३० गुण)
१०० मी = (११.५० सेकंद – १० गुण)
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

मुली…
८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
१०० मी =(१४ सेकंद – १० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

SRPF मैदानी १०० गुण…

फक्त मुले
छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
५ किमी = (२५ मी – ५० गुण )
१०० मी = (११.५० सेकंद- २५ गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – २५ गुण)

ड्रायव्हर मैदानी ५० गुण…

मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी १० सेकंद – ३० गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १२ गुण)

मुली : ८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – २० गुण)
(ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे ५० गुण)

2 Comments
  1. Ravi waghalkar says

    Yes

  2. Rajendra ramesh pawar says

    Am ready to practicals

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!