Mega Bharti 2022-राज्यात विविध खात्यांतील २६,४५४ पदांची भरती करण्याचा निर्णय

Mega Recruitment in Punjab

Punjab Mega Bharti 2022: As per the latest news, The Cabinet has decided to recruit 26,454 posts in various departments. There are many vacancies in the corporations, corporations and government offices in the state and they will be filled, said Chief Minister Bhagwant Mann. Ten thousand posts will be filled in the police department. Read more details regarding Punjab Mega Bharti 2022

पंजाबमधील भगवंत मान सरकारने (Punjab CM Bhagwant Mann) आज सोमवारी महत्वाचे पाच निर्णय घेतले. राज्य मंत्रिमंडळाने रेशनच्या होम डिलीवरी योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पंजाबमधील १.५४ कोटी लाभार्थी जनतेला आता गव्हाचा आटा घरपोच मिळणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ६७० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

तसेच राज्य मंत्रिमंडळाने विविध विभागांत २६,४५४ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय. त्याशिवाय शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई, एक आमदार एक पेन्शन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

मुक्तसर जिल्ह्यातील कापूस पीक नुकसानीची ४१.८ कोटी रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छोट्या वाहतूकदारांना शुल्क जमा करण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ राज्य सरकारने दिली आहे. राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या सरकारने माजी आमदारांसाठी एकच पेन्शन योजना यापूर्वीच जाहीर केली होती. या योजनेला आज मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक विषयांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने मोठे निर्णय घेतले असले तरी त्यांना राज्याचा खर्च भागवण्यासाठी सतत कर्ज घ्यावे लागत आहे.

पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Punjab) काही लोकहिताचे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये पहिला निर्णय २५ हजार सरकारी नौकऱ्या देण्याचा घेण्यात आला होता. यातील १० हजार पोलिस विभागाच्या जागा भरण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. तर १५ हजार नौकऱ्या विविध विभागात निघणार असल्याचे सांगण्यात आले होते.


Punjab Mega Bharti 2022: As per the latest news, After the swearing in of the cabinet of Bhagwant Mann government in Punjab, the first cabinet meeting decided to fill 25,000 vacancies in various departments in the state immediately. There are many vacancies in the corporations, corporations and government offices in the state and they will be filled, said Chief Minister Bhagwant Mann. Ten thousand posts will be filled in the police department.

राज्यात विविध खात्यांतील २५ हजार जागा भरण्याचा निर्णय

पंजाबमध्ये भगवंत मान सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आज पहिल्याच कॅबिनेट बैठकीत राज्यात विविध खात्यांतील २५ हजार जागा तातडीने भरण्याचा निर्णय घेतला. राज्यातील महामंडळे, महानगरपालिका आणि सरकारी कार्यालयात अनेक जागा रिक्त असून ते भरण्यात येईल, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. पोलिस विभागात दहा हजार जागा भरण्यात येणार आहेत.

Mega Bharti 2022 – तयारीला लागा ! राज्यात 50 हजार पदांची मेगाभरती

Mega Bharti -राज्यात १७०० पदांसाठी नोकरभरती होणार; लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार

कॅबिनट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, निवडणूक प्रचारात राज्यातील बेरोजगारी दूर करण्याचे जनतेला आश्‍वासन दिले होते. त्यानुसार पंजाब सरकारने २५ हजार जागा लवकरच भरण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये बेरोजगारी वाढत असल्याने तरुण परदेशात जात आहेत. ते थांबवण्यासाठी आम्ही राज्यात रोजगारनिर्मिती करू, असे ते म्हणाले.

पदवीनुसार तरुणांना नोकऱ्या मिळतील आणि त्यात लाचखोरीला थारा राहणार नाही. नोकरी प्रक्रियेत भेदभाव राहणार नाही आणि महिनाभरात जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान सरकारच्या या निर्णयाबद्धल अभिनंदन केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हरपाल सिंग चिमा, डॉ. बलजित कौर, डॉ. हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला आदी मंत्री सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!