स्टेट बँक ऑफ इंडियात भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात
SBI Specialist Cadre Officer Recruitment 2020
There is Good News For Applicants who prepared for SBI. The State Bank Of India has recently announced New Notification. SBI invites online applications for 452 Posts of Specialist Cadre Officer Posts. Applicants apply before the last date. More details are given below.
SBI लिपिक परीक्षेचा अंतिम निकाल 2020 जाहीर
SBI Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer), डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager), स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर, (Specialist Cadre Officers, Engineer Fire), स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officers, Network Specialist), स्पेशलिस्ट कॅडर ऑफिस सिक्युरिटी (Specialist Cadre Officers, Security Analyst), स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officers) सह अन्य पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया मंगळवार २२ डिसेंबर २०२० पासून सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, ते sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे… जाणून घेऊ.
- – रजिस्ट्रेशन प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा अखेरची मुदत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन माध्यमातून शुल्क भरलेले असेल.
- – उमेदवारांनी सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे शैक्षणिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र आदि अपलोड करावे. प्रमाणपत्र नीट अपलोड न झाल्यास उमेदवारांचा ऑनलाइन अर्ज बाद ठरू शकतो.
- – डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनशिवाय ही यादी प्रोव्हिजनल असेल, जेव्हा उमेदवार मुलाखतीसाठी जातात तेव्हा सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करायची असतात.
- – ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते त्यावेळी मूळ प्रमाणपत्रे योग्य नसतील तर उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात नाही.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जांना सुरूवात होण्याची तारीख – २२ डिसेंबर २०२०
- ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अखेरची मुदत – ११ जानेवारी २०२१
- शुल्क भरण्याची अखेरची मुदत – ३१ जानेवारी २०२१
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा
SBI SO Recruitment 2020
स्टेट बँक ऑफ इंडियामधील एसओ पदांच्या भरतीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे….
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. स्पेशालिस्ट केडर ऑफिसर्स पदांच्या भरतीसाही ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ सप्टेंबर २०२० पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवार शॉर्टलिस्ट करून नंतर मुलाखतींद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
शॉर्टलिस्टिंग
किमान पात्रता आणि अनुभव इतक्याच निकषांवर मुलाखतीला बोलावले जाणार नाही. शॉर्टलिस्टिंगसाठी बँकेने स्थापन केलेली समिती छाननीचे निकष ठरवेल आणि त्यानंतर त्यानुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. याबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.
मुलाखत
मुलाखतीसाठी १०० गुण असतील. मुलाखतीसाठी पात्र गुण किती असावेत याचा निर्णय बँक घेईल.
मेरिट लिस्ट
मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असतील तर त्यांच्या वयाच्या आधारे यादीत क्रमवारी ठरेल.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा
State Bank of India (SBI) is all set to recruit 14,000 vacancies in the next three months. SBI had today decided to give VRS to 30,000 old employees. The recruitment will be done against this background.
SBI Recruitment 2020 – Job Vacancies : स्टेंट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मोठी भरती काढणार असून पुढील तीन महिन्यांत 14000 जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. एसबीआय (SBI) ने आजच 30000 जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ही भरती केली जाणार आहे.
SBI Recruitment 2020 – Job Vacancies : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या २.४९ लाख इतकी होती. त्यातील ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी घरी बसावं लागू शकतं. व्हीआरएससाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून तो बोर्डाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. ३० हजारांमध्ये ११ हजार ५६५ अधिकारी आणि १८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याआधी २००१ मध्ये एसबीआयनं व्हीआरएस योजना आणली होती.
यामुळे या कर्मचाऱ्यांच्य़ा रिक्त जागांवर हे ताज्या दमाचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. ‘ऑन टॅप व्हीआरएस’ ही योजना स्टेट बँकेत लागू होण्याची शक्यता आहे. एसबीआयही कर्मचारी फ्रेंडली आणि विस्तार करणार असल्याने पुढील काळात १४००० जागांवर भरती केली जाणार आहे, असे स्टेट बँकेतील सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
MPSC परीक्षेच्या तारखेत बदल ; MPSC’चा मोठा निर्णय!
एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३१ मार्च २०२० रोजी २.४९ लाख इतकी आहे. हाच आकडा मार्च २०१९ मध्ये २.५७ लाख इतका होता. खर्च कमी करण्यासाठी एसबीआयनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील, असा बँकेचा अंदाज आहे.
सोर्स : लोकमत
SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? उद्या शेवटचा दिवस
SBI Recruitment 2020: उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2020 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणानुसार या वयामध्ये 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
भारतीय स्टेट बँकेमध्ये अनेक पदांवर भरती सुरु आहे.
नोकरीसाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. SBI ने या भरतीची जाहिरातही प्रसिद्ध केली असून सरकारी नोकरी(Sarkari Nokari) मिळविण्यास इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.
एसबीआयच्या भरतीची शेवटची तारीख 16 ऑगस्ट आहे. एकूण 3850 जागा भरण्यात येणार आहेत. गुजरात – 750 पदे, कर्नाटक – 750 पदे, मध्यप्रदेश – 296 पदे, छत्तीसगढ़ – 104 पदे, तमिलनाडु – 550 पदे, तेलंगाना – 550 पदे, राजस्थान – 300 पदे, महाराष्ट्र – 517 पदे (मुंबई वगळता) आणि गोवा गोवा – 33 पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 27 जुलैला झाली होती. तर अखेरची मुदत 16 ऑगस्ट होती. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना SBI careers च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. याठिकाणी या भरतीची लिंक स्लाईडमध्ये देण्यात आली आहे.
उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2020 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणानुसार या वयामध्ये 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. सामान्य़, ओबीसीसाठी 750 रुपये अर्ज शुल्क आणि अन्य आरक्षणासाठी शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज केल्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून केवळ मुलाखत घेतली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
अधिक माहितीकरिता इथे क्लीक करा .
SBI CBO Recruitment 2020
SBI CBO Bharti 2020: State Bank of India has announced recruitment for 3,850 posts of Circle Based Officers in nine States and Union Territories in its seven Circles. In this recruitment process, 517 and 33 posts will be recruited for Maharashtra and Goa divisions. The online registration process for this recruitment has started from today.
SBI मध्ये;नोकरीची उत्तम संधी, ३८५० पदांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज
पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या मदतीने नोंदणी करू शकतात.
भारतीय स्टेट बँकेने आपल्या सात सर्कलमधील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्कल बेस्ड ऑफीसर्सच्या ३ हजार ८५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी ५१७ आणि ३३ पदांवर भरती होणार आहे.या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या मदतीने नोंदणी करू शकतात. या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट आहे. तसेच ऑनलाइन शुल्क भरण्याची अखेरची तारीखही १६ ऑगस्ट आहे.;अर्जदार आपल्या ऑनलाइन सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत काढून घेऊ शकतात.
एसबीआय ने आपल्या सात सर्कलमधील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्कल बेस्ड ऑफीसर्सच्या कायम पदांसाठी हे अर्ज मागवले असून,या पदांची सर्कलप्रमाणे विभागणी पुढीलप्रमाणे आहे.
अहमदाबाद (गुजरात) ७५० पदे, बंगळुरू (कर्नाटक) ७५० पदे, भोपाळ (मध्य प्रदेश, छत्तीसगड) २९६ आणि १०४ पदे, चेन्नई (तामिळनाडू) -५५० पदे, हैदराबाद (तेलंगाणा) – ५५० पदे, जयपूर (राजस्थान) – ३०० पदे, महाराष्ट्र ( मुंबईला वगळून महाराष्ट्र, गोवा) ५१७ आणि ३३ पदे
या भरती प्रक्रियेसाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अर्ज करणारा उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. अर्जदाराकडे कुठल्याही व्यावसायिक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारीपदावर काम केल्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. अर्जदार उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी ३० वर्षांहून अधिक नसावे.
[email protected]
Experience compslusary ahe ka