विद्यापीठाच्या ऑनलाइन शिक्षणाचे ‘पुणे मॉडेल’ आता राज्यभरात
The ‘Pune model’ of university online education is now available across the state
विद्यापीठाच्या ऑनलाइन शिक्षणाचे ‘पुणे मॉडेल’ आता राज्यभरात
कोरोना संसर्गामुळे नुकसान झाले असले, तरी नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. राज्यभरातील विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाच्या दृष्टीने सक्षम करण्याची आवश्यकता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षणासाठी उभी केलेली यंत्रणा राज्यात वेगळी ठरली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे ऑनलाइन शिक्षणाचे पुणे मॉडेल आता राज्यभर नेण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध!
टिचर्स ट्रेनींग अॅकडमीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी सामंत गुरूवारी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना संसर्गामुळे सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. या पाश्र्?वभूमीवर बदलत्या काळानुसार विद्यापीठांतील ऑनलाइन शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास या बाबत राज्य शासनाचे काय धोरण आहे, सुविधांचा विकास करण्यासाठी करावा लागणारा खर्च, याबाबत त्यांना विचारण्यात आले होते.
सामंत म्हणाले, की कोरोना संसर्गामुळे झालेले नुकसान मोठे आहे. मात्र आपल्याला बदलण्यासाठी नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत. येत्या काळात ऑनलाइन शिक्षण हा महत्वाचा भाग होणार आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यापीठाची यंत्रणा समोर ठेवून राज्यातील बाकी सर्वच विद्यापीठांमध्येही अशा सुविधा निर्माण करण्यात येतील.
गोंडवाना विद्यापीठात डेटा सेंटर
आजपर्यंत मोठ्या शहरांमधील विद्यापीठांशिवाय अन्य विद्यापीठांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. मात्र, या विद्यापीठांमध्येही सुविधा निर्माण व्हायला हव्यात. त्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठात डेटा सेंटर उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली असून, दीड कोटींचा निधीही दिला जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.