UPSC NDA I प्रवेशासाठी अर्ज सुरु ; राज्‍यात मुंबई, नागपूर केंद्रांवर होणार परीक्षा 

UPSC NDA and NA Exam 2021

 एनडीए व नेव्‍हल ॲकॅडमी प्रवेशासाठी अर्ज सुरु ; राज्‍यात मुंबई, नागपूर केंद्रांवर होणार परीक्षा

 केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत नॅशनल डिफेन्‍स अकॅडमी ॲण्ड नेव्‍हल अकॅडमी एक्‍झामिनेशन (एक), २०२१ चे वेळापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्‍वरूपात नोंदणी करण्यासाठी येत्‍या १९ जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. राज्‍यात मुंबई व नागपूर केंद्रावर १८ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे.

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मध्ये इयत्ता बारावीनंतर बी. टेक. या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह सैन्‍यदलात अधिकारीपदाची संधी उपलब्‍ध करून दिली जाते. तसेच केरळ येथील नेव्‍हल ॲकॅडमीमध्येही पदवी शिक्षणासोबत नौदलातील अधिकरी होण्याची संधी असते. या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी युपीएससीमार्फत प्रवेश परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. त्‍यानुसार यंदाच्या परीक्षेबाबत दिशानिर्देश नुकतेच जाहीर झाले आहेत. इच्‍छुक पात्र उमेदवारांना १९ जानेवारीच्‍या सायंकाळी सहापर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. तर १८ एप्रिलला देशभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. तत्‍पूर्वी काही कारणास्‍तव विद्यार्थ्यांना आपला अर्ज मागे घ्यायचा असल्‍यास त्‍यासाठी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्‍यान मुदत दिली जाणार आहे.

 जागा, वय व पात्रतेच्या अटी 

 एनडीएमध्ये ३७० जागांसाठी प्रवेश दिला जाणार असून, यापैकी २०८ आर्मी, ४२ नेव्‍ही आणि १२० एअर फोर्ससाठी असतील. नेव्‍हल ॲकॅडमी येथे तीस जागांसाठी अशा एकूण चारशे जागांसाठी या परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. केवळ पुरूष उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करता येणार असून, २ जुलै २००२ नंतर व १ जुलै २००५ पूर्वी जन्‍मलेले उमेदवार या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र असतील. आर्मीकरीता बारावीपर्यंत शिक्षण आवश्‍यक असून, वायुदल किंवा नेव्‍हल शाखांसाठी इयत्ता बारावीत भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित या विषयांतून उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे

 नऊशे गुणांचे दोन पेपर 

 नऊशे गुणांसाठी होणाऱ्या या परीक्षेत गणित विषयाचा पेपर तीनशे गुणांसाठी असेल. या पेपरसाठी अडीच तासाचा वेळ असेल. सामान्‍य आकलन क्षमतेवर आधारीत सहाशे गुणांच्‍या पेपरसाठी अडीच तासांची वेळ असेल. या पेपरमध्ये भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, सामान्‍य विज्ञान व सामान्‍य ज्ञानावर आधारीत प्रश्‍न असतील. प्रत्‍येक चुकीच्‍या प्रश्‍नासाठी निगेटीव्‍ह मार्कींग असणार आहे.

UPSC NDA NA परीक्षा (I), 2021


UPSC NDA and NA Exam Notification: The Union Public Service Commission will hold the examination for National Defence Academy and Naval Academy Examination (I) 2021, on 18th April 2021, for admission to Army, Navy and Air Force Wings of NDA for 147th Course and for the 109th Indian Naval Academy Course & NA (I), will be available on the Commission’s website https://upsc.gvo.in on 30th September 2020 Last date for submission of application is 19.01.2021

UPSC NDA NA परीक्षा (I), 2021

UPSC NDA I परीक्षेसाठी नोंदणी कधीपासून? जाणून घ्या

यूपीएससी एनडीए १ परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या प्रक्रियेविषयी वाचा सविस्तर….

UPSC NDA I 2021: केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससी एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे.

जे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

कशी होणार उमदेवारांची निवड?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल.

Eligibility Criteria- पात्रता

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी – उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी – बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.

UPSC NDA NA 1 Recruitment 2021 चे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!