UPSC NDA Bharti-यूपीएससीतर्फे NDA मध्ये महिलांसाठी आणखी जागा वाढल्या

UPSC NDA Bharti 2021

NDA Recruitment: The Central Public Service Commission (UPSC) has announced the vacancies for women candidates. As per the notification issued by the Commission on 13th December 2021, through the second NDA examination of 2021, women candidates will be selected for a total of 19 vacancies in the National Defense Academy. The recruitment has been announced following the Supreme Court order to include women candidates in the NDA (2) examination 2021.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

UPSC Recruitment 2021

UPSC Vacancy 2021

NDA Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांपैकी महिला उमेदवारांच्या जागा घोषित केल्या आहेत. आयोगातर्फे १३ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार २०२१ च्या दुसऱ्या एनडीए (NDA) परीक्षेद्वारे नॅशनल डिफेन्स अॅकेडमी  एकूण १९ रिक्त जागांवर महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एनडीए (२) परीक्षा २०२१ मध्ये महिला उमेदवारांना सहभागी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

  • यापैकी १० पदे आर्मी विंगसाठी, ३ जागा नौदलासाठी आणि एकूण ६ जागा फ्लाइंग, जीडी टेक आणि जीडी नॉन-टेक या महिला उमेदवारांसाठी आहेत. असे असले तरीही यूपीएससीच्या सूचनेनुसार, भारतीय नौदल अॅकेडमी (१०+२ कॅडेट प्रवेश योजना) मध्ये महिला उमेदवारांसाठी अद्याप प्रवेश नाही.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) NDA २ परीक्षा २०२१ द्वारे यापूर्वी जाहीर केलेल्या एकूण ४०० रिक्त पदांपैकी फक्त महिला उमेदवारांच्या रिक्त जागांची माहिती देण्यात आली आहे.
  • आयोगाने ९ जून २०२१ रोजी जाहीर केलेल्या नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (NDA) २ परीक्षा २०२१ च्या नोटिफिकेशनमध्ये एकूण ४०० रिक्त जागांची घोषणा करण्यात आली. यापैकी ३७० जागा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (लष्कर, नौदल आणि हवाई दल) आणि ३० रिक्त पदे नौदलातील (१०+२) कॅडेट प्रवेश योजनेतील आहेत.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत महिला उमेदवारांना एनडीए २ परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी दिली होती. यानंतर १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

निकाल लवकरच जाहीर होणार
यूपीएससीद्वारे एनडीए २ परीक्षा २०२१ आयोजनाला १४ डिसेंबर २०२१ रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. तसेच महिला उमेदवारांच्या रिक्त पदांची संख्या जाहीर झाल्यानंतर, आता परीक्षेचा निकाल देखील लवकरच जाहीर केला जाईल अशी अपेक्षा आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना यूपीएससी एनडीए २ निकाल २०२१ ची अपडेट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येणार आहे.

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी क्लिक करा


UPSC Civil Services DAF (Mains) 2021

The Union Public Service Commission has issued a Detailed Application Form (DAF) for the main examination 2021. This form is available for the candidates on the official website upsconline.nic.in. Candidates who are eligible for UPSC Pre-Examination 2021 are required to fill up DAF online by 6 pm on 1st December 2021.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) मुख्य परीक्षा २०२१ साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म (DAF)जारी करण्यात आला आहे. उमेदवारांसाठी upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर हा फॉर्म उपलब्ध झाला आहे. जे उमेदवार यूपीएससी पूर्व परीक्षा २०२१ मध्ये पात्र ठरले आहेत, त्यांना १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत DAF ऑनलाइन भरायचा आहे. जे उमेदवार यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी DAF भरणार नाहीत, त्यांना जानेवारी महिन्यात होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून वंचित राहावे लागेल.

यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्रासंदर्भात एक महत्त्वाची सूचना आयोगाने १७ नोव्हेंबर रोजी जारी केली होती. यूपीएससी उमेदवारांना एक संधी म्हणून परीक्षा केंद्रात बदल करण्याची संधी देण्यात आली होती. UPSC Civil Services 2021 Mains DAF भरतानाच परीक्षा केंद्राचा पसंतीक्रम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

UPSC Civil Services 2021 Mains DAF च्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


UPSC ESE Exam 2022

The Central Public Service Commission (UPSC) is conducting the Engineering Service Examination 2022 through the Engineering Service Examination (ESE). This exam will be conducted in three levels. First the preliminary exam, then the main exam and then the interview. The Engineering Services Preliminary Examination will be held on 20th February 2022 and the Main Examination will be held on 26th June 2022

UPSC ESE Exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) च्या माध्यमातून इंजिनीअरिंग सेवा परीक्षा २०२२ चे आयोजन करत आहे. ही परीक्षा तीन स्तरांत घेतली जाणार आहे. प्रथम प्राथमिक परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत होणार आहे. इंजिनीअरिंग सेर्व्हिसेस प्राथमिक परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी आणि मुख्य परीक्षा २६ जून २०२२ रोजी घेतली जाणार आहे.देशभरातीललाखो उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहत आहेत. तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. या परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊया.

SE परीक्षा पॅटर्न (ESE Exam Pattern)

  • स्टेप १- याला ESE प्राथमिक परीक्षा असेही म्हणतात. या पेपरमध्ये पहिला पेपर २०० आणि दुसरा पेपर ३०० गुणांचे असे दोन वस्तुनिष्ठ प्रकारचे पेपर असतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना एकूण कटऑफ तसेच दोन्ही पेपर्सचा कटऑफ स्वतंत्रपणे क्लिअर करावा लागेल.
  • स्टेप २- याला ESE मुख्य परीक्षा असेही म्हणतात. केवळ पूर्व परीक्षेमध्ये पात्र ठरलेले उमेदवारच या टप्प्यात उपस्थित राहू शकतात. यात ३००-३०० गुणांचे दोन वर्णनात्मक पेपर असतात.
  • स्टेप ३- वैयक्तिक मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी हा परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. हा टप्पा २०० गुणांचा आहे.
  • ईएसई परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते.
  • ESE प्राथमिक परीक्षेत २ वस्तुनिष्ठ प्रकारचे पेपर असतात तर मुख्य परीक्षेत २ पारंपारिक पेपर असतात.
  • ESE प्रिलिम्स पेपर १ हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सारखा आहे. तर पेपर २ हा सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील उमेदवाराचा इंजिनीअरिंग विषय आहे.

दोन्ही परीक्षांचे माध्यम फक्त इंग्रजी आहे.

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, प्राथमिक परीक्षेत एक तृतीयांश गुण वजा केले जातील.

ईएसई प्राथमिक परीक्षेचा अभ्यासक्रम (ESE Preliminary Exam Syllabus)

पेपर १

  • सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी योग्यता (General Studies and Engineering Aptitude)
    सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या समकालीन समस्या.
    तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, इंजिनीअरिंग मॅथ्स आणि संख्यात्मक विश्लेषण, डिझाइनची सामान्य सिद्धांत, ड्रॉइंग, उत्पादन, सुरक्षेचे महत्व, उत्पादन, देखभाल आणि सेवा, ऊर्जा आणि पर्यावरणाची मूलभूत तत्त्वे: संवर्धन, पर्यावरण आणि प्रदूषण हवामान बदल करण्यासाठी इंजिनीअरिंग योग्यता, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, प्रकल्प व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, जलवायू परिवर्तन, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, इंजिनीअरिंगची मूलभूत तत्त्वे, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आधारित साधने आणि त्यांचे अभियांत्रिकीमधील अनुप्रयोग. उदा.नेटवर्किंग, ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञान-आधारित इंजिनीअरिंगमधील नैतिकता आणि मूल्ये

पेपर २

  • सिव्हिल इंजिनीअरिंग (Civil Engineering)
  • बांधकाम साहित्य, घन यांत्रिकी, संरचनात्मक विश्लेषण, स्टील संरचनांचे डिझाइन, काँक्रीट आणि दगडी बांधकाम संरचना, बांधकाम सराव, नियोजन आणि व्यवस्थापन, द्रव प्रवाह, हायड्रोलिक्स मशीन्स आणि जलविद्युत, जलविज्ञान आणि जल संसाधन इंजिनीअरिंग, पर्यावरण इंजिनीअरिंग, भू-इंजिनीअरिंग फाऊंडेशन आणि तंत्रज्ञान. सर्वेक्षण आणि भूविज्ञान, वाहतूक इंजिनीअरिं इ.
  • मॅकेनिकल इंजिनीअरिंग (Mechanical Engineering)
  • फ्लुइड मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स आणि हीट ट्रान्सफर, आयसी इंजिन्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, टर्बो मशिनरी, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी, इंजिनीअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मटेरिअल्स, मेकॅनिझम आणि मशिन्स, मशीन एलिमेंट्सची रचना, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग. मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स
  • इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग (Electric Engineering)
  • इंजिनीअरिंग मॅथ्य, इलेक्ट्रिकल मटेरिअल्स, इलेक्ट्रिक सर्किट्स आणि फील्ड्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट, कॉम्प्युटर फंडामेंटल्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, अॅनालॉग, आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सिस्टम आणि सिग्नल प्रोसेसिंग, कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टम, पॉवर सिस्टम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्राइव्ह इ.
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (Electronics and Communication Engineering)
  • बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स, इलेक्ट्रॉनिक मापन आणि इन्स्ट्रुमेंटेशन, नेटवर्क थिअरी, अॅनालॉग आणि डिजिटल सर्किट्स, अॅनालॉग आणि डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम्स, कंट्रोल सिस्टम्स, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन आणि आर्किटेक्चर, इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स विषय, अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स इ.

UPSC NDA Exam

The Central Public Service Commission (UPSC) has released the list of centers for the National Defense Academy (NDA) and Naval Academy (NA) examinations (2) to be held on November 14. Students can check the names of the cities listed below. The feature of this exam is that this time also women have sat for this exam for the first time.

NDA च्या माध्यमातून प्रथमच महिला सैन्यात होणार भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defense Academy – NDA) आणि नौदल अकादमी (Naval Academy – NA) परीक्षा (2) साठी केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या यादीतील शहरांची नावे तपासू शकतात. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी महिला देखील या परीक्षेला पहिल्यांदाच बसल्या आहेत.

या शहरांमध्ये असतील परीक्षा केंद्रे

आगरतळा, अहमदाबाद, आयजोल, प्रयागराज (अलाहाबाद), बंगळूर, बरेली, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, डेहराडून, दिल्ली, धारवाड, दिसपूर, गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, जोरहाट, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मदुराई, मुंबई, नागपूर, पणजी (गोवा), पाटणा, पोर्ट ब्लेअर, रायपूर, रांची, संबलपूर, शिलॉंग, शिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर आणि विशाखापट्टणम

UPSC ने 14 नोव्हेंबर 2021 रोजी NDA (2) 2021 च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी COVID-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत, खाली UPSC NDA आणि NA II 2021 परीक्षेसाठी जारी केलेल्या सूचना वाचू शकता.

परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी नियमावली

सर्व उमेदवारांसाठी मास्क / फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे. मास्क / फेस कव्हर नसलेल्या उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, परीक्षा अधिकाऱ्यांच्या आवश्‍यकतेनुसार पडताळणीसाठी उमेदवारांना मास्क व फेस कव्हर काढावे लागतील. उमेदवार छोट्याशा बाटलीत स्वतःचे हॅंड सॅनिटायझर घेऊन जाऊ शकतात. उमेदवारांनी कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून परीक्षा हॉल / खोल्यांमध्ये तसेच केंद्राच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग तसेच वैयक्तिक स्वच्छता पाळणे आवश्‍यक आहे.

परीक्षा हॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक सत्रात ई प्रवेशपत्रासोबत (मूळ) फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल. फोटो अस्पष्ट असल्यास किंवा ई-प्रवेशपत्रावर उपलब्ध नसल्यास, उमेदवारांना दोन समान छायाचित्रे (प्रत्येक सत्रासाठी एक छायाचित्र) बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ई-ऍडमिट कार्डमध्ये काही तफावत आढळून आल्यास [email protected] या ई-मेल आयडीवर तत्काळ आयोगाला कळवावे लागेल.


UPSC NDA & NA (II) 2021 Online Last Date Extended

UPSC Recruitment 2021: The Union Public Service Commission has released a Notification for National Defense Academy & Naval Academy Examination (II) 2021. There is a total of approximately 400 vacancies to be filled under UPSC NDA Recruitment 2021. All Eligible and Interested candidates may apply online through https://upsconline.nic.in before the last date. The closing date for submission of the online application form is 29th June 2021  8th October 2021. More details about UPSC Vacancy 2021 like the application and application link are given below.

UPSC Exam-UPSC ESE & GSE साठी नोटिफिकेशन जाहीर

Union Public Service Commission has decided to open the online portal of application on its website (upsconline.nic.in) for this Examination to enable the unmarried women candidates ONLY,

एनडीए परीक्षेत महिला उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

UPSC NDA II 2021: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)एनडीए परीक्षेत महिला उमेदवारांना याच वर्षीपासून संधी देण्याचा निर्णय अखेर घेतला आहे. या भरती प्रक्रियेसाठी आयोगाने अॅप्लिकेशन विंडोदेखील पुन्हा उघडली आहे. वर्षातून दोन वेळा यूपीएससी एनडीए परीक्षेचे आयोजन करते. यंदा दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी केवळ महिला उमेदवारांसाठी अॅप्लिकेशन विंडो उघडण्याचा इतिहास यूपीएससीने घडवला आहे. शुक्रवार २४ सप्टेंबर २०२१ पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होत असून यासंदर्भातील नोटीस आयोगाने जारी केली आहे. या नोटीसनुसार अविवाहित महिला उमेदवार एनडीए २ परीक्षा २०२१ साठी अॅप्लिकेशन फॉर्म ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत भरू शकतात.

संघ लोक सेवा आयोग (UPSC)

  • अंतिम तारीख : 29 जून 2021 08 अक्टूबर 2021
  • पद नाम : राष्ट्रीय रक्षा अकादमी और नौसेना अकादमी परीक्षा (II) 2021
  • कुल पद्संख्या 400 जगह
  • आवेदन का तरीका : ऑनलाइन
  • अधिकारिक वैबसाइट : www.upsc.gov.in

अर्जांची पात्रता- Eligibility Criteria For UPSC NDA and NA Exam 2021

  • यूपीएससीद्वारे जारी एनडीए २ परीक्षा २०२१ अधिसूचनेनुसार सैन्यदलाच्या कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
  • वायूदल आणि नौदलासाठी उमेदवारांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • या व्यतिरिक्त उमेदवारांचा जन्म २ जानेवारी २००३ पूर्वी किंवा १ जानेवारी २००६ नंतरचा असावा.

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२१ अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या लिंकच्या माध्यमातून करा UPSC NDA II 2021 परीक्षेसाठी अर्ज


UPSC exam 2021

UPSC Exam: The Central Public Service Commission (UPSC) has postponed several examinations in April and May due to an increase in COVID-19 cases in the country. According to a circular issued by the Commission, Employment Provident Fund Organization (EPFO) Exam 2020, Civil Service Examination (CSE) 2020 Interview, and several other recruitment exams have been postponed.

UPSC IES, ISS आणि IAS इंटरव्यूसह अनेक परीक्षा लांबणीवर

UPSC IFS/ISS Exam 2021 

UPSC Recruitment 2021

UPSC Exam: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) देशात COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या अनेक परीक्षा स्थगित केल्या आहेत. आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रोजगार भविष्य निधी संघटना (EPFO) परीक्षा 2020, सिविल सेवा परीक्षा (CSE) 2020 इंटरव्यू, आणि अन्य अनेक भरती परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.

UPSC EPFO परीक्षा स्थगित

नोटिफिकेशन असे म्हटले आहे की UPSC EPFO लेखी परीक्षा 2020 आधी ९ मे रोजी आयोजित होणार होती, पण तूर्त ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

UPSC IES आणि ISS परीक्षा स्थगित

भारतीय आर्थिक सेवा (IES) या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेच्या (ISS) 2020 मुलाखती २० ते २३ एप्रिल रोजी होणार होत्या, त्या पुढील आदेशांपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

UPSC 2020 IAS Interview

UPSC ने IAS परीक्षा 2020 मुलाखत प्रक्रिया लांबणीवर टाकली आहे. UPSC इंटरव्यू २६ एप्रिल ते १८ जून या कालावधीत होणार होते. सुधारित तारखा आयोगन नंतर जारी करणार आहे.

यूपीएससी आपल्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर रिवाइज्ड शेड्यूल जारी करणार आहे. आयोगाने हे स्पष्ट केलं आहे की उमेदवारांना परीक्षेच्या किमान १५ दिवस आधी नवं वेळापत्रक दिलं जाईल.


The deteriorating situation due to corona virus infection has also affected some recruitments of the Central Public Service Commission (UPSC). UPSC has postponed interviews and personal tests for some recruits. The Commission has informed about this on its website upsc.gov.in.

UPSC मुलाखती आणि वैयक्तिक चाचणी स्थगित

UPSC Interviews Postponed: करोना व्हायरस संक्रमणामुळे बिघडलेल्या परिस्थितीचा परिणाम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) काही भरतींवर देखील झाला आहे. यूपीएससी ने काही भरतींसाठी होणाऱ्या मुलाखती आणि वैयक्तिक चाचण्या लांबणीवर टाकल्या आहेत. आयोगाने आपली वेबसाइट upsc.gov.in वर यासंबंधीची माहिती दिली आहे.

सोमवार, १९ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार यूपीएससीने कळवले आहे की २० एप्रिल २०२१ पासून नियोजित सर्व थेट भरतीच्या मुलाखती आणि वैयक्तिक चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा आयोग लवकरच जारी करणार आहे.

आयोगामार्फत आयईएस (UPSC IES) आणि आयएसएस (UPSC ISS) परीक्षा २०२० च्या मुलाखती २० एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत होणार होत्या. पण आता पुढील आदेश येईपर्यंत त्या स्थगित करण्यात आल्या आहेत.


The Supreme Court has refused to grant relief to students who failed the UPSC exam in 2020 due to corona. A petition was filed in the Supreme Court last year seeking another chance for failing the exam. However, the court rejected the petition.

सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गेल्यावर्षी परीक्षा न देऊ शकल्यामुळे आणखी एक संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली.

ज्या विद्यार्थ्यांना 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी शेवटची संधी होती, मात्र त्यांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा देता आली नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर, इंदू मल्होत्रा आणि अजय रस्तोगी यांच्या खंठपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. 9 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय आजच्या सुनावणीत देण्यात आला. केंद्राने हे देखील स्पष्ट केलं होतं की उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात येईल मात्र वयामध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही.

लवकरच सिव्हिल सर्व्हिस 2021 चं नोटिफिकेशन निघणार

UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग येत्या 27 जून रोजी प्रिलिम्स परीक्षा (पूर्व परीक्षा) घेणार आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटलं, “CSE-2021आणि IFoSE-2021 यासाठी लवकरच पुढील अधिसूचना काढली आहे. तसंच सिव्हिल सेवा परीक्षा 2021 (CSE 2021) आणि भारतीय वन सेवा परीक्षा (IFoSE 2021) या दोन्ही परिक्षांचं एकसाथ आयोजन केलं जाईल. यावर्षी UPSC ने सिव्हिल सेवा परीक्षेसाठी लेहमध्ये एका नव्या परीक्षा केंद्राचं ओपनिंग केलं आहे.


UPSC Pre Exam 2021 TIPS: The UPSC pre-examination will be held on June 27 by the Central Public Service Commission. If you are preparing for this exam, here are some special pre-exam tips for you. Read More details are given below.

 UPSC Prelims 2021:  पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या २७ जूनला होणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पूर्व परीक्षेच्या काही खास टिप्स या ठिकाणी देत आहोत.

 यूपीएससीच्या परीक्षेत देशात आठवी आलेल्या वैशाली सिंगने पूर्व परीक्षेसाठी खास टिप्स दिल्या आहेत. पूर्वपरीक्षेसाठी तिने कशी तयारी केली होती, त्यासाठी कोणती खास तयारी केली होती का? याबाबत वैशालीनं माहिती दिली आहे.

 NCERT पुस्तकांपासून तयारी करा

UPSC २०१८च्या परीक्षेत देशात ८वी आलेली वैशाली सिंग म्हणाली, यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून सुरवात केली पाहिजे. पूर्वपरीक्षेला एनसीआरटीच्या पुस्तकातील प्रश्न विचारतात असं नाही, पण यामुळे तुमचा पाया पक्का होतो. यूपीएससीची तयारी करणारे बरेचसे उमेदवार एनसीईआरटीची पुस्तके वाचण्याकडे दुर्लक्ष करतात, पण एनसीईआरटीची पुस्तके वाचल्यानंतर एप्लीकेशन बेस अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवू शकता.

 मॉक टेस्ट ठरतात फायदेशीर

वैशाली पुढे म्हणाली की, ‘पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर मॉक टेस्ट सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. मी परीक्षेच्या आधी २ महिने दररोज १ मॉक टेस्ट देत होती, ज्याचा मला परीक्षेमध्ये फायदा झाला होता.’

नोट्स स्वत: तयार करा

तसेच तिने आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. वैशाली म्हणाली की, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना नोट्स तयार करायला विसरू नका. कारण मी स्वत: नोट्स तयार करण्याला प्राधान्य दिले होते, यामुळे लिहता लिहता ते लक्षात राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही एखाद्याकडून नोट्सदेखील घेऊ शकता.


कोरोनामुळे UPSC परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी

UPSC Exam 2021: This is important news for UPSC candidates. Candidates who failed the UPSC Civil Service exam in 2020 during the Corona Crisis will be given another chance. This decision has been taken by the Central Public Service Commission. However, this test can only be given to those for whom 2020 was the last chance.

कोरोनामुळे UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी

UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोना संकटाच्या काळात 2020 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी दिली जाणार आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतला आहे. मात्र ही परीक्षा त्यांनाच देता येणार आहे, ज्यांच्यासाठी 2020 ही अंतिम संधी होती. मात्र, ते कोरोना विषाणूच्या संकटामुळे परीक्षा देऊ शकले नाहीत. केंद्र सरकारने ही संधी काही अटींवर देऊ केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.(Another chance for the candidates who could not appear for the UPSC exam due to the Corona)

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या वर्षी ज्या उमेदवारांसाठी UPSC परीक्षा देण्याची अंतिम संधी होती. पण कोरोना विषाणूच्या संकटामुळे ते परी%5्षा देऊ शकले नाहीत. तसंच वयोमर्यादेनुसार ते या वर्षीच्या परीक्षेला बसू शकणार नव्हत, अशा उमेदवारांना एक अतिरिक्त संधी देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

IFS Mains परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCने भारतीय वन सेवा अर्थात IFS मुख्य परीक्षा 2020चे अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. IFS mains परीक्षेचे अॅडमिट कार्ड त्यांची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जारी करण्यात आले आहेत. उमेदवार या वेबसाईटवर जाऊन आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात.

कोणतीही परीक्षा न देता नोकरीची संधी

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमीशन (UPSC) तुम्हाला कुठलीही परीक्षा न देता केंद्र सरकारसोबत नोकरी करण्याची संधी देत आहे. यूपीएससीने अनेक पदांवर भरती (UPSC recruitment 2021) सुरू केली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या नोकरभरतीसंदर्भात UPSC च्या अधिकृत वेबसाईटवरून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या जागांवर अर्ज करण्यासाठी 11 फेब्रुवारी ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.

UPSC कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 296 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये डेटा डेटा प्रोसेसिंग असिस्टेंट, असिस्टेंट पब्लिक प्रॉसिक्युटर, जूनिअर टेक्निकल ऑफिसर, स्पेशलिस्ट ग्रेड 3 असिस्टेंट प्रोफेसर, लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) आणि असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) या पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


UPSC Vacancies 2021

UPSC Recruitment 2021: The Union Public Service Commission (UPSC) is giving you the opportunity to get a job with the Central Government without any written test. UPSC has started the recruitment process for several vacancies. These vacancies have been notified on the official website of the Commission at upsc.gov.in. Read the details of this government job (Sarkari Naukri) and apply

UPSC मध्ये विनापरीक्षा नोकरीची संधी; आजच करा अर्ज

UPSC मध्ये विनापरीक्षा नोकरीची संधी चालून आली आहे. केवळ मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे. या भरतीसंदर्भातील माहिती, पदांची संख्या, पात्रता, निवड प्रक्रिया आदी सर्व माहितीसाठी क्लिक करा..

UPSC Vacancy 2021:  केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) तुम्हाला कोणत्याही लेखी परीक्षेविना केंद्र सरकारची नोकरी मिळवून देण्याची संधी देत आहे. यूपीएससीने अनेक रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त पदांची अधिसूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in वर देण्यात आली आहे. या सरकारी नोकरी ( Sarkari Naukri ) चा तपशील वाचा आणि लवकर अर्ज करा.

पदांची माहिती- Vacancy Details 

  • डेटा प्रोसेसिंग असिस्टंट – ११६ पदे (पे स्केल – लेवल ०७)
  • असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर – ८० पदे (पे स्केल – लेवल ०८)
  • ज्युनियर टेक्निकल ऑफिसर – ०६ पदे (पे स्केल – लेवल ०७)
  • स्पेशलिस्ट ग्रेड ३ असिस्टेंट प्रोफेसर – ४५ पदे (पे स्केल – लेवल ११)
  • लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) – ०१ पद (पे स्केल – लेवल १०)
  • असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) – ०१ पद (पे स्केल – लेवल १०)
  • कुल पदों की संख्या – २४९

शैक्षणिक पात्रता- Eligibility Criteria

पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. आवश्यक वयोमर्यादाही वेगवेगळी आहे. कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए), आयटी ते अभियांत्रिकी, बीई (बीटी / बीटेक), वैद्यकीय (एमबीबीएस), कायद्याची (एलएलबी / एलएलएम) पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा- Age Limit

डेटा प्रोसेसिंग सहाय्यक, सहाय्यक सरकारी वकील, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. व्याख्याता आणि सहायक संचालकांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. ४० वर्षापर्यंतचे उमेदवार विशेषज्ञ सहाय्यक प्रोफेसरसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय ओबीसी प्रवर्गात सर्व पदांसाठी ३ वर्षे आणि एससी, एसटीला प्रवर्गातील सर्व पदांसाठी ५ वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज कसा कराल? – How to apply

अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२१ आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर जाऊन किंवा पुढील दिलेल्या अप्लिकेशन लिंकवर क्लिक करुन अर्ज करता येईल. जनरल, ओबीसी, आर्थिक दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ रुपये अर्ज शुल्क आहे. इतर प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रियाया पदांवर पात्र उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्ट करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मात्र यूपीएससीने म्हटले आहे की अर्जांची संख्या जास्त असल्यास शॉर्टलिस्टिंगसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते. म्हणून, अर्ज करताना संबंधित सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

UPSC Job Notification 2021 साठी येथे क्लिक करा.


UPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी…वाचा

UPSC Recruitment 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ने अधीक्षक (प्रिंटिंग) च्या एका पदासह स्टॅटेस्टिकल ऑफिसर (प्लानिंग / स्टॅटेस्टिक्स) च्या ३५ रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsconline.nic.in वर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

UPSC CISF Recruitment 2020

या पदांसाठी यूपीएससीने वेगवेगळे नोटिफिकेशन जारी केले आहेत. नोटिफिकेशनच्या माध्यमातून रिक्त पदांची जागा, शैक्षणिक योग्यता, वयोमर्यादा आणि संबंधित अन्य पात्रता आदी माहिती पाहू शकाल.

UPSC Bharti 2020

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होणार आहे. उमदेवारांना त्यांनी केलेल्या ऑनलाइन अर्जांच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. निवड प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन नोटिफिकेशन तपशीलवार वाचा.

UPSC Recruitment 2020


ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन अर्जासाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsconline.nic.in वर जा. होमपेजवर वर उपलब्ध विविध पदांवर ऑनलाइन भरतीच्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. आता एक नवं पेज उघडेल. तेथे अधीक्षक (प्रिंटिंग) आणि स्टॅटेस्टिकल ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्याच्या वेगवेगळ्या लिंक दिल्या आहेत. उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या अप्लाय नाऊ लिंकवर क्लिक करा. आता पुन्हा एक नवं पेज उघडेल. येथे महत्त्वाच्या सूचना वाचा आणि पुढे जा. यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. आता रजिस्ट्रेशन पेज उघडेल. तेथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि सेव्ह करा. तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल. आता रजिस्ट्रेशन पेजवर पुन्हा या. येथे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करा. आता तुम्ही पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!