भरतीनंतरही नाशिक जि. प. शाळांत शिक्षकांची 912 पदे रिक्तच – ZP Nashik Teacher Bharti 2024

ZP Nashik Shikshak Bharti 2024 Jahirat, Notification & Apply Link

ZP Nashik Teacher Bharti 2024 updates – The recruitment process for 12,522 posts in 34 zilla parishads was conducted as there were a large number of vacant posts of teachers in zilla parishad schools in the state. Nashik Zilla Parishad also conducted the recruitment process in March. However, even after the recruitment of teachers, as many as 912 teaching posts in the district will remain vacant. Therefore, even after recruitment, many schools in rural areas are likely to be deprived of teachers or remain single teachers. There are about 3,266 zilla parishad schools in which 2,78,791 students are studying. More than 4,000 teaching posts have been sanctioned for the purpose. Of these, 1,034 posts were vacant. Of these, 222 posts were filled. Many of the two teaching schools have become one teacher as the posts of teachers are vacant. In the recruitment process, 222 posts were filled. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

भरतीनंतरही नाशिक जि. प. शाळांत शिक्षकांची 912 पदे रिक्तच

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने ३४ जिल्हा परिषदेतील १२ हजार ५२२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेतही मार्चमध्ये भरती प्रक्रिया पार पडली. मात्र शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील तब्बल ९१२ शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे भरतीनंतरही ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची अथवा एकच शिक्षक राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या जवळपास तीन हजार २६६ शाळा असून, यात दोन लाख ७८ हजार ७९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी चार हजारांवर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक हजार ३४ पदे रिक्त होती. यातील २२२ पदे भरण्यात आली. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा या एक शिक्षकी झाल्या आहेत. भरती प्रक्रियेत २२२ पदे भरली गेली.

 • यातही ही पदे बिगरआदिवासी तालुक्यांना मिळाल्याने वर्षोनुवर्षे रिक्त पदांचा बॅकलॉग यानिमित्त भरला गेला आहे. यातून शिक्षण विभागाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाची चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता आहे.
 • काही महिन्यांपूर्वी शासनाने निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. परंतु या नियुक्तीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पेसा तालुक्यातील भरतीत ३३० शिक्षक मिळाले असते. परंतु, ही भरती प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे आदिवासी तालुक्यांना शिक्षक मिळू शकलेले नाहीत.
 • पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविताना शासनाचे रिक्त पदांच्या ७० टक्केच्या मयदित शिक्षकांची भरती करण्यास परवानगी दिली. जिल्ह्यात एक हजार ३४ पदे रिक्त असताना २२२ शिक्षकांचीच भरती करण्यात आली. ७० टक्के भरती का करण्यात आली नाही, असा प्रश्न निर्माण झाला
 • जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांची संख्या मात्र कमी आहे. जिल्हा बदलीने नाशिक जिल्ह्याला १२२ शिक्षक येणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ८० शिक्षक जिल्ह्यात येणार आहे. तब्बल ३२ शिक्षक कमी मिळणार आहे.
 • पटसंख्येवर परिणाम – शिक्षकांची एक हजार ३२ पदे रिक्त आहेत. यात बिगरआदिवासी तालुक्यांमधील नांदगाव (१३१), येवला (६७), चांदवड (५५), मालेगाव (८६), बागलाण (४८) या तालुक्यांत रिक्त पदाची संख्या तुलनेने मोठी होती. मात्र शिक्षक भरतीतून या तालुक्यांना शिक्षक भरण्यात आले. त्यानंतरही ९१२ पदे रिक्त आहेत. शिकविणारेच अपुरे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत.

ZP Nashik Teacher Bharti 2024 – More than 1,100 teaching posts are vacant in zilla parishad schools in Nashik district. However, 222 teachers have been appointed in the district in the first phase through the holy portal. Most of the seats were vacant in drought-hit talukas. ‘Pavitra’ has provided Guruji to this taluka. For the first time in 20 years, teachers will be available in government and aided schools in the state. The recruitment process for 21,678 posts is underway in the state. There are 16,799 posts without interviews and 4,879 posts with interviews. As many as 11,085 candidates have been recommended as teachers in primary, secondary and higher secondary schools of municipal corporations, municipal and private managements, including zilla parishads. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

‘पवित्र’ने भरला दुष्काळी तालुक्यांचा गुरुजींचा बॅकलॉग! नांदगावसह अन्य तालुक्यांत शाळांमध्ये 222 शिक्षकांची नियुक्ती

नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ११०० वर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यात २२२ शिक्षकांची पहिल्या टप्प्यात नियुक्ती झाली आहे. दुष्काळी तालुक्यांतच सर्वाधिक जागा रिक्त होत्या. या तालुक्याला ‘पवित्र’ने गुरुजी उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात २० वर्षांत पहिल्यांदाच सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार आहेत. राज्यात २१ हजार ६७८ जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९, तर मुलाखतींसह चार हजार ८७९ पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसह महापालिका, पालिका व खासगी व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून शिफारस केली आहे.

यात नाशिक जिल्हा परिषदेलाही रिक्त जागांचा बॅकलॉग भरण्यास मोठा फायदा झाला आहे. जिल्हा परिषदेत शिक्षकांची ११ हजार २५१ पदे मंजूर असून, त्यापैकी १० हजार ६५ पदे भरली आहेत. १,१८६ रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेने आवश्यकतेनुसार जिल्ह्यात ३२० शिक्षकांच्या जागा भरण्याबाबत पवित्र पोर्टलद्वारे शासनाला कळविले होते. पहिल्या टप्प्यात २३० शिक्षक पदे भरली आहेत.

कागदपत्रांची पडताळणी पूर्ण – जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी (ता. ११) २२२ प्राथमिक शिक्षकांची समुपदेशनाद्वारे पदस्थापना झाली. पात्र उमेदवारांनी प्रक्रियेद्वारे कागदपत्रांची पडताळणी केली. मराठी माध्यमच्या १७०, इंग्लिश मीडियमसाठी चार, मॅथ-सायन्सच्या ४५. अशा २१९, तर तीन उमेदवारांनी उशीरा कागदपत्रे सादर केल्याने एकूण २२२ प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना झाली. यातील बहुतांश शिक्षक रूजू होण्यास रवाना झाले.

नाशिक लगतच्या तालुक्यांना पसंती – प्राथमिक शिक्षकांची पसंती नाशिकलगतच्या तालुक्यांना असते. नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव व सिन्नर आदी तालुक्यांतच शिक्षकांची नियुक्ती झाल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला. अजूनही रिक्त जागांची संख्या मोठ्या संख्येने असल्याने त्या जागा भराव्यात, अशी अपेक्षा पालक व्यक्त करीत आहेत.

“जिल्ह्यात पवित्र पोर्टलद्वारे २२२ शिक्षकांच्या जागा भरल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. शिक्षकांच्या नियुक्तीमुळे सहाव्या राऊंडमधील बदली झालेल्या शिक्षकांना न्याय मिळाला, तसेच आंतरजिल्हा (स्वगृही) जाणाऱ्या शिक्षकांनाही प्रशासनाने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. विद्यार्थी व शाळाहिताच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे आभार. उर्वरित रिक्त शिक्षकांच्या जागाही लवकर भराव्यात.”-प्रकाश अहिरे, जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, नाशिक

तालुकानिहाय नियुक्त शिक्षकसंख्या

 • नांदगाव- ६९
 • येवला- ३६
 • चांदवड- २७
 • मालेगाव- ३७
 • बागलाण- १०
 • सिन्नर- २०
 • निफाड- १३
 • इगतपुरी- ७
 • दिंडोरी- २
 • देवळा- २

जिल्ह्यातील जि.प.च्या शाळा

 • देवळा- ११८
 • नाशिक- १०८
 • नांदगाव- २११
 • त्रंबकेश्वर- २४५
 • सिन्नर- २०९
 • पेठ- १८९
 • येवला- २३६
 • इगतपुरी- २२२
 • निफाड- २२४
 • बागलाण- २९७
 • चांदवड- १८०
 • सुरगाणा- ३१६
 • मालेगाव- २९७
 • दिंडोरी- २१२
 • कळवण- २०३
 • एकूण- ३२६७

ZP Nashik Teacher Bharti 2024 updates – In the first phase, nashik district received the entire process of teacher recruitment through the pavitra portal and the teachers in the teacher list were posted through counselling method on Saturday (March 9). A total of 222 teachers, including 173 in Marathi medium, 45 in mathematics and science and four in English medium, were posted and distributed orders to them. Priority was given to non-tribal talukas while giving posting. Schools in Nandgaon, Malegaon, Yeola and Chandwad talukas, which are crying out for lack of teachers, have got teachers. A total of 21,678 vacancies, including 16,799 without interview and 4,879 with interview, are being recruited through the pavitra portal.

बिगरआदिवासी तालुक्यांनाही मिळाले गुरुजी; 222 शिक्षकांना मिळाली पदस्थापना

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडून पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याला प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांना शनिवारी (ता. ९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. मराठी माध्यम १७३, गणित व विज्ञान ४५ तर, इंग्रजी माध्यमातील चार अशा एकूण २२२ शिक्षकांना पदस्थापना देत त्यांना आदेशाचे वितरण करण्यात आले. पदस्थापना देताना प्रामुख्याने बिगरआदिवासी तालुक्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे शिक्षक नसल्याची ओरड असलेल्या नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड तालुक्यातील शाळांना शिक्षक मिळाले आहेत. पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह चार हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही सुरू आहे.

 • त्यानुसार गुणवत्तेसह सर्व प्रकारच्या आरक्षणानुसार ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध करत, शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. पोर्टलवर एकूण २३० उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. मूळ कागदपत्राच्या पडताळणीनंतर यादीतील १ ते २३० पात्र उमेदवारांची शनिवारी पदस्थापना देण्यासाठी प्रक्रिया राबविली गेली.
 • गंगापूर रोडवरील होरायझन ॲकॅडमीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. शिक्षकास समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देत लागलीच नियुक्तीचे आदेश देण्यात आले.
 • उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, प्रभारी उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, अधिक्षक श्रीधर देवरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, लिपिक सरोज बागूल, जयवंत शिंदे, सूर शिंदे, अनिकेत गरुड, सलीम पटेल, अरुण भदाणे, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते.
 • अवघड क्षेत्रात ४९ बदल्या – ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नियमित बदली प्रक्रियेतील सहाव्या टप्प्यातील अवघड क्षेत्रातील बदली झालेल्या शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार बदलीत अवघड क्षेत्रात हजर झालेल्या ४९ शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या.
 • रिक्त पदांचा भार झाला कमी – जिल्ह्यात शिक्षकांची एक हजार ३४ पदे रिक्त आहेत. यात बिगरआदिवासी तालुक्यांमधील नांदगाव (१३१), येवला (६७), चांदवड (५५), मालेगाव (८६), बागलाण (४८) या तालुक्यात रिक्त पदाची संख्या तुलनेने मोठी होती. त्यामुळे या भागाला शिक्षक मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींची होती. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रामुख्याने या भागातील तालुक्यांना प्राधान्य देत रिक्त पदे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
 • या तालुक्यांना मिळाले शिक्षक – नांदगाव (६९), येवला (३६), चांदवड (२७), इगतपुरी (७), मालेगाव (३७), बागलाण (१०), सिन्नर (२०), निफा़ड (१३), दिंडोरी व देवळा प्रत्येकी २ या प्रमाणे एकूण २२२ शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली.

ZP Nashik Teacher Bharti 2024 -More than 4,500 Shikshak posts in north Maharashtra are lying vacant, causing huge academic losses to students. Therefore, these vacancies will be filled due to the green signal received from the Office of the Education Commissioner for the recruitment process of future teachers waiting for recruitment through the Pavitra Portal website.  Education Commissioner Suraj Mandhare has directed the chief executive officers of all zilla parishads in the state to take immediate action to give advertisements on the Pavitra Portal website in the teacher recruitment process.

In order to prevent academic loss to students due to teacher vacancies, the Education Commissioner has planned a recruitment process and teachers will join new schools in the new academic year. Separate advertisements will be published on the Pavitra Portal website of government and private institutions. The recruitment of teachers in local bodies will be done on merit. Candidates will get a chance on the basis of merit list of TET and Aptitude and Intelligence Test.

उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे; शिक्षण आयुक्तांकडून हिरवा कंदील

उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुमारे साडेचार हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांच्या भरती प्रक्रियेस शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या हिरव्या कंदिलामुळे या जागा भरल्या जातील. 

 • राज्यात बोगस पटपडताळणीच्या निर्णयानंतर अनेक वर्षे शिक्षक भरती प्रक्रिया ठप्प होती. गेल्या काही वर्षांत शिक्षणमंत्र्यांनी अनेकदा शिक्षकभरतीचे ‘गाजर’ दाखवून भावी शिक्षकांचा हिरमोड केला. त्यामुळे संतप्त झालेल्या डी.एड., बीएड. पदविकाधारकांनी सोशल मीडियातून भरतीबाबत मोहीम सुरू केली होती.
 • राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या हजारो उमेदवारांना शिक्षण आयुक्तालयाने आनंदाची बातमी दिली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळावर तत्काळ जाहिराती देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
 • शिक्षकांच्या तीस हजार जागांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, बिंदूनामावली तपासणी, शिक्षक समायोजन अशी तांत्रिक प्रक्रिया लांबली आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर मात्र अद्याप जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने, उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर होता.
 • संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्तपदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, विषयनिहाय रिक्तपदांची माहिती संकेतस्थ‌ळावर नोंदणी करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या ‘लॉगिन’वर देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करीत योग्य असल्यास बिंदूनामावली, विषयनिहाय रिक्तपदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ‘लॉगिन’द्वारे मान्य करतील.
 • प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या ‘लॉगिन’वर जाहिरात तयार करणे यावर ‘क्लिक’ केल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्तपदांची जाहिरात तयार होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षणनिहाय रिक्तपदे, गट, विषयनिहाय रिक्तपदांच्या माहितीची पडताळणी करीत जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र संकेतस्थळावरील सूचनांनुसार तत्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
 • गुणवत्तेवर होणार शिक्षकांची निवड. – शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी भरती प्रक्रियेचे नियोजन केले असून नव्या शैक्षणिक वर्षात नवीन शाळांमध्ये शिक्षक रुजू होतील. सरकारी व खासगी संस्थानिहाय पवित्र संकेतस्थळावर स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती गुणवत्तेनुसार होणार आहे. टीईटी व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची गुणवत्तायादीनुसार उमेदवारांना संधी मिळणार आहे.

ZP Nashik Shikshak Bharti 2023

As of you know the Shikshak Bharti process has conducted by Pavitra Portal. The Director of Primary and Secondary Education has issued a circular for the recruitment of teachers in primary, secondary and higher secondary schools through the Pavitra Portal. So, this recruitment has got the green signal. Nashik Zilla Parishad’s Secondary Education Officer Pravin Patil has issued a letter to private educational institutions in the district, giving instructions and the work of registration on the Pavitra Portal has started.

The government had conducted the TAIT 2023 – Teacher Aptitude and Intelligence Test in February to fill up the vacant posts of teachers in the state. The candidates who appeared for the exam have completed the self-certificate required for recruitment to the post on the holy portal. All managements, including local bodies, are required to get the point names of the teacher category certified by the Assistant Commissioner Backward Class Cell.
As per the set approval for 2022-23, the demand for subject-wise vacant teacher posts should be made on the portal. Instructions have been given in the circular to advertise on the Pavitra Portal. Accordingly, it will be the responsibility of the private educational room management to advertise on the Pavitra Portal. Registration has been done in the district of institutions to fill vacant posts in schools of private educational institutions. The concerned education officer of that district should allow the advertisement on the portal.


ZP नाशिक शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू

पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरतीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांना पत्र काढत सूचना दिल्या असून, पवित्र पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू झाले आहे.

 • राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारीत घेतली होती. या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदू नामावली सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
 • २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्त शिक्षक पदांची मागणी पोर्टलवर करण्यात यावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत परिपत्रकामध्ये सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खासगी शैक्षणिक कक्ष व्यवस्थापनाची असेल. खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी संस्थांच्या जिल्ह्यामध्ये नोंदणी झाली आहे. त्या जिल्ह्याचे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी पोर्टलवरील जाहिरातीला परवानगी द्यावी.
 • संबंधित विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्यास संबंधित व्यवस्थापनाने भरलेली विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कारणासह संबंधित शिक्षणाधिकारी यांनी अमान्य करावी. खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती, असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. खासगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील.
  मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांना मुलाखतीशिवाय पदभरती हा एकच पर्याय निवडणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील खासगी अनुदानित बिगरअल्पसंख्याक संस्थांच्या पवित्र पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू झालेले आहे.
 • त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील संस्थांनी तत्काळ मागासवर्ग कक्ष यांचे कडून २०२२-२३ च्या संच मान्यतेच्या आधारे अद्ययावत तपासलेले बिंदू नामावली अपलोड करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
 • “ज्या संस्थांनी अद्याप या कार्यालयाकडून बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी केलेली नाही, त्यांनी तत्काळ २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदांची बिंदू नामावली तयार करून मागासवर्ग कक्ष नाशिककडून अंतिम तपासणी करून पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी. रोस्टरची पवित्र पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर मग विषयनिहाय जागा नोंदवाव्या लागतात. त्या वेळी जिल्ह्यात त्या विषयाचे उपलब्ध असलेले अतिरिक्त शिक्षक यांचा विचार करून विषयनिहाय रिक्त जागा अप्रूव्ह करण्यात येतील.” – प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद

Latest updates of Zilha Parishad Nashik Bharti is given here – As many posts are vacant in the education department of Nashik Zilla Parishad, students are facing difficulties. In this background, the state government will soon recruit the vacant posts. For that, Nashik Zilla Parishad’s primary education department is finalizing the point list for 1186 vacant posts. The report of these statistics will be sent to the state government in the next 2 to 3 days. The government is trying its best to ensure that municipal and Zilla Parishad schools should also be of good quality in competition with private schools. Various activities are being implemented in these schools. 11251 posts of teachers have been sanctioned in Zilla Parishad and out of them 10 thousand 65 posts have been filled. So there are 1186 vacancies. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नाशिक जिल्ह्यातील ३,३३२ शाळांसाठी शिक्षकांची १० हजार ६५ पदे मंजूर, ११८६ रिक्त पदांसाठी बिंदुनामावली पूर्ण

 • नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच रिक्त पदांची भरती करणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून रिक्त ११८६ पदांसाठीची बिंदू नामावली करण्याच्या कामावर अखेरचा हात फिरवला जात आहे. येत्या २ ते ३ दिवसांत या आकडेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
 • खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा देखील तेवढेच चांगल्या दर्जाच्या झाल्या पाहिजे, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अनेकविध उपक्रम या शाळांमध्ये राबविले जात आहेत. जिल्हा परिषदेत शिक्षकांची ११२५१ पदे मंजूर असून त्यापैकी १० हजार ६५ पदे भरली गेलेली आहेत. तर ११८६ रिक्त पदे आहेत.
  राज्य शासनाच्या १ फेब्रुवारी २०२३ च्या अध्यदेशाद्वारे जिल्हा परिषदेत जिल्हानिहाय बिंदू नामावली करण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यापासून त्यात पेसा, नॉनपेसा, २५, ५० आणि १०० टक्के संवर्गानुसार आकडेवारी घेण्यात येत आहे. येत्या २ ते ३ दिवसांत या आकडेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले. त्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढे कार्यवाही होणार आहे.
 • मॉडेल स्कूलचे कामही अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणदेखील दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांचे शिक्षण विभागावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या संकल्पनेतून मॉडेल स्कूल जिल्ह्यात १०० मॉडेल स्कूल लवकरच साकारण्यात येत आहे. त्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले असल्याचे बच्छाव यांनी नमूद केले.

ZP Nashik Teachers Recruitment 2023: As per the latest updates regarding ZP Nashik Shikshak Bharti is that the large number of teachers in the Zilla Parishad Primary School in Nashik state are vacant. 3012 posts of Urdu Primary teachers are vacant in ZP Nashik. Maha TAIT required for teacher recruitment in the state has been successfully conducted from 22nd February to 3rd March under the control of Maharashtra State Examination Council. After the announcement of the result of the examination, the advertisement will be released for the recruitment of teacher vacancies through this computerized system Pavitra Portal. It has been demanded that these posts be filled soon. Read the complete details given below & Keep Visit us Thanks…!

नाशिक जिल्हातील ZP शाळांमध्ये उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त

नाशिक राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक (ZP) शाळेतील मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.  दरम्यान विधानपरिषदेत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. उर्दू प्राथमिक शिक्षकांची तीन हजार बारा पदे रिक्त असून या भरतीत उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली आहे.

Shikshak Bharti: एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे

ZP Teacher Bharti-मार्चअखेरपर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये करणार भरती

ZP Nashik Shikshak Recruitment 2023

 • राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली २२ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.
 • त्या करिता राज्यात प्रस्तावित ३० हजार शिक्षक भरतीत अल्पसंख्याक समाजातील डीएड- बीएड धारक बेरोजगारांना न्याय मिळवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक शाळेत रिक्त पदे असल्याने दोन- तीन वर्गाचे अध्यापन कार्यरत शिक्षक यांना करावे लागत आहे.
 • पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या भरतीत उर्दू माध्यमाच्या एकूण जागांमध्ये इतर घटकाप्रमाणे ईवीएस व खुला या दोन्ही प्रवर्गाला जागा उपलब्ध करून द्याव्यात. राज्यात अनेक वर्षानंतर शिक्षक भरती प्रस्तावित आहे म्हणून उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असणारे सर्व पदे भरण्याची गरज आहे. संघटनेतर्फे या भरती व अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी राज्यभरात अनेकवेळा आंदोलन केले होते.
 • उर्दू शिक्षक भरती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व परिक्षा आयुक्त महेश फालक यांना देण्यात आली असल्याची माहिती श्री साजिद यांनी दिली.

ZP Nashik Urdu Shikshak Bharti 2023- Vacancy Details 

राज्यात उर्दू माध्यम शाळांचे रिक्त पदे-

 • सर्व संवर्ग निहाय जिल्हा परिषद: १३०१
 • खुले प्रवर्ग जिल्हा परिषद:४०८
 • सर्व महानगरपालिका:८८१
 • नगरपालिका: ४२२
 • एकूण : ३०१२

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  ZP Nashik Shikshak Bharti 2023 Jahirat, Notification & Apply Link

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!