रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 2 हजार 673 पदे रिक्त आहेत- ZP Ratnagiri Bharti 2023
ZP Ratnagiri Recruitment 2023 Notification Jahirat & Online Apply Link
ZP Ratnagiri Bharti 2023 updates – According to recently received information, about 23% posts are vacant in ZP Ratnagiri. As many as 2 thousand 673 posts are vacant in Ratnagiri Zilla Parishad. The number of employee vacancies has increased tremendously. Due to vacancies, one employee is in charge of two or three departments. Due to this, the work of common citizens is getting spoiled. For many years, employees have been demanding that these vacancies be filled quickly. Many posts of officers are also vacant in Zilla Parishad. Read the full article for more information…
रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 2 हजार 673 पदे रिक्त आहेत. कर्मचारी रिक्त पदांची संख्या प्रचंड वाढली आहे. रिक्त पदांमुळे एकाच कर्मचाऱ्यावर दोनतीन विभागांचा पदभार पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या कामाचा खेळखंडोबा होत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये मंजूर 11 हजार 266 पदांपैकी आतापर्यंत फक्त 8 हजार 593 पदे भरलेली आहेत. तब्बल 2 हजार 673 पदे रिक्त आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सुमारे 23 टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे एकाच कर्मचाऱ्यावर दोनतीन विभागांचा पदभार पडत आहे. त्यामुळे नागरीकांच्या कामाचा खेळखंडोबा होत आहे. ही रिक्त पदे त्वरीत भरा अशी कर्मचाऱ्यांची गेली अनेक वर्षे मागणी आहे. जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत.
Ratnagiri ZP Vacancy Details
- गेली अनेक वर्षे भरती प्रक्रीया न राबवल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे वाढली आहेत.
- क प्रवर्गात सरळसेवेतील 9 हजार 483 पदे आणि पदोन्नतीची 1 हजार 026 पदे अशी एकूण 10 हजार 509 पदे मंजूर आहेत.
- त्यापैकी सरळसेवेतील 7 हजार 462 पदे भरण्यात आली आहे.
- पदोन्नतीमधील 745 पदे भरण्यात आली आहेत.
- एकूण 10 हजार 509 पैकी 8 हजार 207 पदे भरण्यात आली आहेत.
- सरळसेवेतील तब्बल 2 हजार 021 पदे रिक्त आहेत. आणि पदोन्नतीची 281 पदे रिक्त आहेत.
- अशी एकूण क प्रवर्गातील 2 हजार 302 पदे रिक्त आहेत.
- ड प्रवर्गातील सरळसेवेची 679 पदे पदोन्नतीची 78 पदे अशी एकूण 757 पदे मंजूर आहेत.
- त्यापैकी सरळसेवेची 334 पदे भरली आहेत.
- तर पदोन्नतीची 52 पदे भरली आहेत.
- एकूण 757 पैकी 386 पदे भरलेली आहेत.
- सरळसेवेची 345 पदे आणि पदोन्नतीची 26 पदे रिक्त आहेत.
- ड प्रवर्गातील एकूण 757 पैकी 371 पदे रिक्त आहेत.
- क आणि ड प्रवर्गाचा एकत्रीत विचार केला असता एकूण सरळसेवेतील 10 हजार 162 पदे आणि पदोन्नतीची 1 हजार 104 पदे अशी एकूण 11 हजार 266 पदे मंजूर आहेत.
- त्यापैकी सरळसेवेने 7 हजार 796 पदे भरली आहेत.
- पदोन्नतीची 797 पदे भरली आहेत.
- अशी एकूण 8 हजार 593 पदे भरण्यात आली आहेत.
- सरळसेवेची 2 हजार 366 पदे रिक्त आहेत. पदोन्नतीची 307 पदे रिक्त आहेत.
- एकूण 11 हजार 266 पदांपैकी 2 हजार 673 पदे रिक्त आहेत.
ZP Ratnagiri Bharti 2023– Teacher posts are vacant in Ratnagiri Zilla Parishad Primary School. 848 Marathi teacher posts are vacant in Ratnagiri district and there are also large number of teacher posts vacant in Urdu medium schools. 84 Urdu medium teacher posts are vacant in Ratnagiri. The sacred portal of teacher recruitment has been closed for the last two years. As a result, the posts of teachers remain vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Ratnagiri Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
शिक्षक भरतीकडे झालेले दुर्लक्ष, सेवानिवृत्तांची वाढलेली संख्या, आंतरजिल्हा बदल्यामुळे कोकणातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे दिवसेंदिवस वाढतच आहेत. जिल्हानिहाय रिक्त पदांचे रोस्टर जाहीर झाले असून जिल्ह्यात ८४८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. कोकणातील पाच जिल्ह्यांत मराठी माध्यमाची ५ हजार पदे रिक्त आहेत.
ZP Ratnagiri Bharti 2023
- शालेय शिक्षणात ही भीषण परिस्थिती असतानाच विविध ठिकाणी शिक्षकांना ई-पीक पाहणी करणे, वाहतूक नियोजन करणे, चहापान व्यवस्था आदी कामे करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कोकणात इंग्रजी, गणितासारख्या महत्त्वाच्या विषयांना शिक्षक नसल्याने शिक्षणमंत्र्यांच्या विभागातच शिक्षणाची पाटी कोरी राहण्याची भीती आहे. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्येही शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. रत्नागिरीत ८४ उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नुकत्याच आंतरजिल्हा बदल्या पार पडल्या. त्यासाठी शिक्षकांचे जिल्हानिहाय रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले होते. शिक्षक भरतीला लागलेल्या ब्रेकमुळे ही परिस्थिती ओढवली असल्याची टीका डीटीएड्, बीएड् पात्रताधारक शिक्षकांमधून होत आहे.
- आरटीईअंतर्गत नियमाप्रमाणे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य असताना विद्यर्थी शिक्षकाविना शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. शिक्षक भरतीचे शिक्षणसंस्थांचे अधिकार काढून घेत तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आजही कायम आहे; मात्र, शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टलच गेली दोन वर्षे बंद आहे. परिणामी, शिक्षकांची पदे रिक्तच राहिली आहेत. एका बाजूला टीईटी घोटाळा प्रकरणामुळे शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत तर दुसरीकडे पोर्टल बंद असल्याने शिक्षक भरती बंद आहे. याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील शाळांना सहन करावा लागत आहे. अलीकडेच राज्य सरकारने एमपीएससीमार्फत शिक्षक भरती होणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, याबाबतही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी सरकारच्या धरसोड धोरणामुळे शिक्षक भरती प्रक्रिया पेचात पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण शिक्षकांविना सुरू आहेत.
- पावणेतीनशे शिक्षक रखडले – रिक्त पदांची संख्या वाढत असल्यामुळे बदलीने परजिल्ह्यात जाणार्यांची मोठीच गैरसोय झालेली आहे. नुकत्याच झालेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पावणेतीनशे शिक्षक पात्र ठरले होते; मात्र रिक्त पदाचा टक्का चौदापर्यंत असल्यामुळे त्यांना सोडण्यात आलेले नाही.
ZP Ratnagiri Bharti 2023- 2844 Posts : Good news for job seekers. There will be bumper recruitment in Zilla Parishad in Ratnagiri in next few days. There are as many as two thousand 844 vacant posts of Class I to Class IV in Zilla Parishad All these vacancies will be filled. Read more details regarding ZP Ratnagiri Bharti 2022 are given below.
रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल दोन हजार 844 पदांची भरती लवकरच
- ZP Ratnagiri Recruitment 2023: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) पुढील काही दिवसांमध्ये बंंपर भरती होणार आहे. वर्ग एक ते वर्ग चार पादांसाठी ही संधी असणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल दोन हजार 844 पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- त्यामुळे बेरोजगारांना सरकारी नोकरींची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागातील सर्वाधिक जागा रिक्त आहेत. कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- त्यामुळे बेरोजगारांना रत्नागिरी जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान दुसरीकडे येत्या दीड वर्षात मोठ्याप्रमाणात तरुणांना रोजगार उलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केंद्राच्या वतीने देखील करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रकडून करण्यात येणाऱ्या नोकरभरतीमध्ये देखील तरुण आपले नशीब अजमावू शकतात.
कोरोनामुळे वाढली बेरोजगारी
- देशासह राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. कंपन्या बंद होत्या. त्यामुळे अनेकांनी आपले रोजगार गमावले. हातात नोकरी नसल्याने पैसा देखील नव्हता. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. बाजार सुस्तावला. या काळात नोकरीच्या संधी देखील कमी झाल्या होत्या. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले असून, सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेकांना पुन्हा रोजगार भेटल्याने अर्थचक्र गतिमान झाले आहे
ZP Ratnagiri Bharti 2023 Details are here..