शिक्षण विभागात विविध महत्वाच्या ३०२३ जागा रिक्त – Shikshan Vibhag Bharti 2024

Department of Education Bharti 2024

Department of Education Bharti 2024 | Shikshan Vibhag Bharti 2024 latest updates – As many as 3,023 posts in Groups B and C, ranging from director of education department to joint director, deputy director, assistant director, education officer, deputy education officer, group education officer and superintendent group, are lying vacant till date. This includes 123 group A posts and 689 group B positions. Schools are run by the education department through various managements in the state. These include zilla parishads, municipal corporations, municipalities, Katak Mandal and private educational institutions. These education departments have a large number of important posts lying vacant in rural areas who are responsible for controlling schools, administrators, principals and students.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The Group Education Officer is responsible for and controls the schools of all the managements of the taluka, school nutrition, training of teachers, control over examinations, while the Deputy Education Officer and Education Officer are in charge of the district, deputy director of education is in charge of the department. These officers are responsible for approving education recruitment, online pay teams, providing grants to schools, approving health bills, transferring, all investigative appellate officers, etc. However, all the education departments are lax as these important posts in the education department are lying vacant in the state. As a result, schools in urban and rural areas were no longer controlled.

संचालक, सहसंचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या ३०२३ जागा रिक्त

 • राज्यात शिक्षण विभागातील संचालकापासून सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि अधीक्षक गटासह गट ब आणि क’ मधील ३०२३ पदे आजमितीस रिक्त आहेत. त्यामध्ये गट ‘अ’ १२३, तर ‘ब’ ची ६८९ महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या पदांची कमतरता भासू लागल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ लागला आहे.
 • शिक्षण विभागाकडून राज्यात विविध व्यवस्थापनांमार्फत शाळा चालविल्या जातात. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळ, खासगी शैक्षणिक संस्था यांचा समावेश आहे. या शिक्षण विभागांकडून ग्रामीण भागात शाळांवर, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे, अशी महत्त्वाची पदेच मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने शाळा, संस्थाचालक, जिल्हापरिषद शाळांवर कुणाचाही अंकुश नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अनेकवेळा एकाच अधिकाऱ्याकडे दोन पदांचा भार असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची अनेक कामे प्रलंबित लालफितीत अडकून पडतात. एका फाईलवर स्वाक्षरी घेण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागते.
 • गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची जबाबदारी व नियंत्रण ठेवणे, शालेय पोषण आहार, शिक्षकांचे प्रशिक्षण, परीक्षांवर नियंत्रण, तर उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे जिल्ह्यांची, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे विभागाची जबाबदारी असते. शिक्षण भरतीला मान्यता देणे, ऑनलाईन वेतनपथक, शाळांना अनुदान देणे, आरोग्याची बिले मंजूर करणे, बदली करणे, सर्व चौकशी अपिलीय अधिकारी आदी महत्त्वाची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. मात्र राज्यात शिक्षण खात्यातील ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने सर्वच शिक्षण विभागांत ढिसाळपणा दिसून येतो. यामुळे शहरी, ग्रामीण भागातील शाळांवर नियंत्रण राहिले नाही. पटसंख्या कमी होत आहे. एका शिक्षकाला तीन वर्ग सांभाळण्याची जबाबदारी, अनधिकृत शाळा, संस्था चालकांचे ‘लक्ष्मीदर्शन’ यामुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे.
 • शिक्षण प्रणालीची अंमलबजावणी अनेक संस्थाचालक करत नाहीत. या प्रणालीचा उपयोग शिक्षक पदभरती, समायोजन यासाठी केला जातो. हे कामकाज पाहणाऱ्या सर्व वरिष्ठ लिपिकापासून सांख्यिकी, लॅब टेक्निशीयनपर्यंतची २२११ पदे रिक्त असल्याने प्रणालीची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा चालवणाऱ्या राजकीय संस्थाचालकांचे चांगलेच फावले आहे. याव्यतिरिक्त शिक्षण विभागाकडून आलेल्या योजना, त्याची अंमलबजावणी, पटसंख्या, अनधिकृत शाळा, शिक्षकांचे समायोजन, संस्थांच्या त्रुटी, बेकायदेशीर कारभार यावर नजर ठेवणारी यंत्रणा नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ लागला आहे.

OFFICIAL WEBSITE

Department of Education Bharti 2024 Vacancy details

Department of Education Bharti 2024


Shikshan Vibhag Bharti 2024

Education Department Bharti 2024: New rules have been announced for filling up the posts of education officer and deputy education officer cadre in the school education department.  As per the New rules, 20 percent of the posts in the Education Officer cadre will be filled by nomination, while 80 percent of the posts will be filled by promotion. 50 percent of the posts of Deputy Education Officers will be filled through direct service and the remaining 50 percent through promotion and departmental competitive examination.

Shikshak Bharti – राज्यात 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती

शालेय शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संवर्गातील पदे भरण्याबाबत नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी संवर्गातील २० टक्के पदे नामनिर्देशाने, तर ८० टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे ५० टक्के सरळसेवेने व उर्वरित ५० टक्के पदे पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.

Shikshan Vibhag Bharti 2023

शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र शिक्षण सेवेतील शिक्षणाधिकारी गट अ ( प्रशासन शाखा) पदाचे सेवा प्रवेश नियम जाहीर केले आहेत. शिक्षणाधिकारी पदासाठी सांविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलली अन्य कोणतीही शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी व तत्सम पदांमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षण निरीक्षक (बृहन्मुंबई), साहाय्यक संचालक, साहाय्यक आयुक्त, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, साहाय्यक संचालक ( राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद), संचालक, प्रशासन अधिकारी, इत्यादी पदांचा समावेश आहे. तसेच प्रशासन अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी , महानगरापालिका शिक्षण मंडळ, प्रशिक्षण प्रमुख, समन्वयक, प्रकल्प समन्वयक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, वरिष्ठ प्रकल्प संचालक ( शिक्षण) सारथी, ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत.

शिक्षणाधिकारी संवर्गातील पदांपैकी २० टक्के पदे नामनिर्देशाने तर, ८० टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. त्यामुळे सध्या शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीद्वारे शिक्षणाधिकारी पदावर नियुक्तीची अधिकची संधी मिळणार आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी संवर्गातील पदांवरील नियुक्तीसंबंधीचे सेवाप्रवेश नियमही जाहीर केले आहेत. या पदासाठीही कोणत्याही शाखेचे पदवीधारक पात्र ठरणार आहेत. उपशिक्षणाधिकारी संवर्गातील ५० टक्के पदे नामिनिर्देशनाने भरण्यात येणार आहेत. तर, ३० टक्के पदे पदोन्नतीने आणि २० टक्के पदे विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने २८ डिसेंबर २०२२ रोजी दोन स्वतंत्र अधिसूचना काढून शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संवर्गातील अधिकारी पदांचे नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर केले आहेत.


Department of Education Bharti 2024: There are 31 thousand vacant posts of Teachers in the education department. Among the total vacancies, there are more than 19 thousand posts in Zilla Parishad schools and 11 thousand posts in municipal schools. Read More details about Shikshan Vibhag Bharti 2022 are given below.

मुंबई : शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार शाळांमध्ये शिक्षकांचा फोटो लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण वर्गावर शिक्षकच नसतील तर फोटो लावायचा कुणाचा आणि फोटोकडे पाहूनच विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील सर्वाधिक १९ हजार, तर महापालिका शाळांमधील ११ हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

शिक्षक भरतीला लागलेल्या’ ब्रेकमुळे ही परिस्थिती ओढवली असल्याची टीका डीटीएड, बीएड पात्रताधारक शिक्षकांमधून होत आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर, आरटीई अंतर्गत नियमाप्रमाणे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य असताना नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षकाविना शिक्षण घेत असतील तर राज्य सरकारला कोणता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवायचा आहे, असा प्रश्न एमपीएससी विद्यार्थ्यासाठी कार्यात राज्य समन्वय समिती कडून उपस्थित करण्यात आला आहे. 

Department of Education Bharti 2024- Vacancy Details


Shikshan Vibhag Bharti 2024: The posts of Primary Teacher, Center Head, Extension Officer and Group Education Officer are vacant in the Education Department of Nanded district. There are 17 thousand 543 vacant posts of primary teachers in the education department of the local self-government bodies in the state. The vacancy is having a big impact on the academic work. Read More details about Shikshan Vibhag Bharti 2022 is given below.

शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांची १७ हजार ५४३ पदे रिक्त

राज्यात प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही शिक्षण विभागातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्याचा शैक्षणिक कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यासाठी ही पदे तत्काळ भरावीत तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे व पदोन्नती प्रक्रिया पार पाडावी, या विषयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले.

Shikshak Bharti -महत्वाचे- राज्यात तब्बल 18 हजार शिक्षकांची पदे रिक्त

 • नांदेडला जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेऊन पुरोगामी शिक्षक संघटनेने निवेदन दिले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांची १७ हजार ५४३ पदे रिक्त आहेत.
 • त्यामुळे विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मंजूर असलेली सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत.
 • तसेच आजकाल शिक्षकांना शैक्षणिक सोडून अन्य अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणावर दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचे शिकवण्याचे मुख्य काम मागे पडत आहे.
 • राज्यातील प्राथमिक शाळेत शिपाई व लिपिक नसल्यामुळे शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करुन शिक्षकांना बीएलओसह सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करावे.
 • विद्यार्थी हितासाठी वरील मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन लवकरात लवकर त्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Department of Education Bharti 2024: As per the news, Out of the total sanctioned posts in the education department in the state A total of 3046 posts of Center Head, Extension Officer, Group Education Officer, Deputy Education Officer, Education Officer, Deputy Director of Education, Joint Director of Education are known to be vacant. There are 14 vacancies for the post of Deputy Director of Education and 15 vacancies for the post of Joint Director of Education. As there are 2925 vacancies for Center Heads in the State, one Center Head has been given additional charge of at least two to three Centers. Read More details

राज्यात शिक्षण विभागात ३०४६ पदे रिक्त

कोरोना महामारीत शिक्षण क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी ठाकली असताना आता राज्यात शिक्षण विभागात एकूण मंजूर पदांपैकी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक पदांची एकूण ३०४६ पदे रिक्त झाल्याची माहिती आहे. यामुळे सद्यस्थितीत कार्यरत अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन काम भागवले जात असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढल्याचे चित्र आहे.

Shikshak Bharti- राज्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

 • कोरोना कालावधीत शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाकडे शिक्षण खात्याकडून वेळोवेळी योजना राबवण्यासाठी सांख्यिकी माहिती मागविली जाते. याशिवाय शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी पर्यवेक्षणीय यंत्रणेसह शाळांवर टाकण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास खाते, महसूल खाते, आरोग्य विभाग, वनखाते अशा कितीतरी खात्याकडून शिक्षण विभागाची यंत्रणा राबविली जाते.
 • त्यामुळे शिक्षण विभागातील कार्यरत अधिकारी वर्गावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात येत आहे. ऑनलाईन तंत्रज्ञानामुळे तात्काळ माहिती उपलब्ध करण्यासाठी यंत्रणेला आदेशित केले जाते. एकावेळी अनेक आदेश, परिपत्रक, शासननिर्णय येत असल्याने त्याची अंमलबजावणी कशी करायची, यामुळे अधिकारी वर्ग त्रस्त झाला आहे. त्यामुळे काही अधिकारी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग स्वीकारत आहेत.
 • राज्यात केंद्र प्रमुखांची २९२५ पदे रिक्त असल्याने एका केंद्र प्रमुखाकडे किमान दोन ते तीन केंद्रांचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. संघटनेकडून पदभरती करा म्हणून शासनाला साकडे घालूनही शासनाकडून पदभरती केली जात नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. शिक्षण विस्तार अधिकारी शैक्षणिक गुणवत्तेसाठी पद निर्माण करण्यात आले आहे. मात्र, विस्तार अधिकारी यांच्याकडून शैक्षणिक कामापेक्षा प्रशासकीय कामे करून घेतली जातात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
 • शिक्षण अधिकार्‍यांच्या ५९ जागा रिक्त आहे. त्यांचा प्रभार कनिष्ठ अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे. काही महत्वाचे निर्णय घेताना प्रभारी अधिकार्‍यांची अडचण होत आहे. शिक्षण उपसंचालक पदाच्या १४ जागा तर शिक्षण सहसंचालक पदाच्या १५ जागा रिक्त आहेत.
 • एकीकडे शाळा स्तरावर गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय पदे रिक्त झाल्याने शिक्षण विभागाचे चांगभलंझालं आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

संगणक ज्ञान नसलेल्यांची कसोटी

गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या राज्यात ४७० जागा रिक्त असल्याने कार्यरत अधिकार्‍यांना अतिरिक्त भार दिला जात आहे. शैक्षणिक व प्रशासकीय कामे करून घेताना अधिकार्‍यांची कसरत होत आहे. टेबल वर्कपेक्षा तंत्रज्ञानावर आधारित कामे करावी लागत असल्याने जे अधिकारी अद्ययावत तंत्रज्ञान करतात त्यांना कामाचा ताण कमी आहे. ज्या अधिकार्‍यांना संगणकाचे ज्ञान नाही त्यांची मात्र कसोटी लागत आहे.


Shikshan Vibhag Recruitment 2022: Teachers are likely to get the opportunity to fill the vacancies in the school education department in the state. Many posts in the department have not been filled for years. Therefore, PhD teachers should be appointed in the posts of Class One, Class Two, Education Extension Officer, Head of Center.The Rural Development Department has recently sent a letter to all the Divisional Commissioners in this regard. Information has been sought from the teachers who are eligible to become officers

शिक्षकांसाठी राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय.-जाणून घ्या

Pavitra Portal- शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलद्वारे होणार; शिक्षक पदभरती नियमांत सुधारणा

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!