Gondia ZP Teacher Bharti – जिल्हा परिषदेमार्फत 210 स्वयंसेवक शिक्षकांची होणार नियुक्ती
Gondia ZP Teacher Recruitment 2023
Gondia ZP Teacher Bharti 2023- As per the news, 210 teacher posts will be recruited for the schools of Morgaon Arjuni in Gondia district. A total of 210 volunteer teachers will be recruited in Zilla Parishad schools in coordination with the Local School Management Committee on the basis of the number of students on salary basis in the current academic session. This information was given by Yashwant Ganavir, Vice President, Education, Sports and Health.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्हयात एकूण 1038 प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा चालविण्यात येत आहेत. या शाळांत शिक्षकांच्या (Teachers) 590 पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त बोझा पडतो. तसेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. यावर तोडगा म्हणून मानधन तत्वावर स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समेत ठराव घेवून सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यातंर्गत या शाळांसाठी 210 शिक्षक शाळेला उपलब्ध होणार असल्याची माहिती जिप उपाध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती यशवंत गणविर यांनी दिली.
ZP Teacher Bharti – खुशखबर! जि.प. शाळांमधील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणार
Gondia ZP Teacher Bharti – जिल्हा परिषदेमार्फत 210 स्वयंसेवक शिक्षकांची होणार नियुक्ती
ZP Teacher Gondia Bharti 2023
- शिक्षक भरती, शिक्षकांची (Teachers) रिक्त पदे यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा व विद्यार्थी पटसंख्या कमी झाली. यावर तोडगा निघावा व जिल्हा परिषदेच्या शाळांना पूर्वीचे वैभव प्राप्त होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिप उपाध्यक्ष गणवीर यांनी जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वयंयसेवक शिक्षक भरतीचा मुद्दा मांडला होता. त्यांच्या या मुद्दाला सर्वानुमती मंजुरी मिळाली.
- त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत चालू शैक्षणिक सत्रात एकूण 210 मानधन तत्वावर विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या समन्वयाने स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्ती केली जाईल.
- तसेच त्यांना मानधन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येईल. दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी दिली.
Comments are closed.