Kannada Teacher Bharti – या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८६ शिक्षकांची पदे रिक्त 

Kannada Teacher Bharti 2022

Kannada Teacher Bharti 2022: There are total 132 Kannada schools in Jat taluka. There are a total of 86 vacancies in Kannada Secondary Zilla Parishad School with 63 posts of Deputy Teacher and 23 of Subject Teacher. There are 86 vacancies for Kannada teachers in Kannada primary schools of Jat taluka. This is affecting the quality of education. Due to this, there is a demand from the parents that these posts should be filled immediately. Read More details as given below.

या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८६ शिक्षकांची पदे रिक्त

जत तालुक्यातील परिषेदच्या कन्नड प्राथमिक शाळांमध्ये ८६ कन्नड शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यामुळे ही पदे त्वरित भरावीत, अशी मागणी अशी मागणी पालकांमधून होत आहे. जत तालुक्यात एकूण १३२ कन्नड शाळा आहेत. कन्नड माध्यमिक जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक ६३ व विषय शिक्षक २३ अशी एकूण ८६ पदे रिक्त आहेत. बरीच शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. मोठ्या शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहेत. २०२२ ते २००२४ पर्यंत बहुतांश कन्नड शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. 

 

जत तालुक्यातील जिल्हा मा परिषदेच्या कन्नड प्राथमिक शाळांमध्ये कन्नड शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने पालक वर्गात प्रचंड असंतोष निर्माण  झाला आहे. भविष्यात कन्नड शाळा टिकणार की नाही, अशी अवस्था आहे.  जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी लक्ष घालून कन्नड शाळेतील  शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा,अशी मागणी पालकांमधून होत आहे. अन्यथा एकाच दिवशी तालुक्यातील सर्व प्राथमिक कन्नड शाळांना कुलूप घालून तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!