Govt Hospital Jobs: सरकारी रुग्णालयांमधील 5 हजार रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय

Maha Govt Hospital Bharti 2023

Maha Govt Hospital Bharti 2023 : As per the news It has been decided to fill 5 thousand  vacancies in government medical colleges. 5000 posts in 27 Medical, Ayurveda and Homeopathic Colleges and affiliated hospitals of the state have been approved to be filled through external sources. It includes important technical positions related to health care. Read More details are given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्य शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्याच्या हेतूने आरोग्य सेवेसारख्या महत्त्वाच्या सेवेतील गट क व गट ड संवर्गातील पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद व होमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांतील ५ हजार पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यात आरोग्य सेवेशी संबंधित महत्त्वाच्या तांत्रिक पदांचा समावेश आहे.

Government Hospital Recruitment 2023

  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी ज्या दिवशी बेमुदत संप पुकारला त्याच दिवशी म्हणजे १४ मार्चला राज्य शासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालयांत बाह्यस्रोतांमार्फत नोकरभरती करण्याचा आदेश जारी केला.
  • त्यासाठी नऊ कंपन्यांच्या नियुक्तीस मान्यता दिली. त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांनी शासकीय सेवेतील नोकऱ्यांच्या खासगीकरणास विरोध केला, तर हा निर्णय आधीच्या महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा दावा करीत सत्ताधारी पक्षाकडून कंत्राटी नोकरभरतीचे समर्थन करण्यात आले.
  • राज्य शासनाने कर्मचारी संघटनांनी संप पुकारला त्याच दिवशी नऊ खासगी कंपन्यांना मनुष्यबळ पुरवठा करण्यास मान्यता दिली असली, तरी त्या आधी दीड महिन्यांपूर्वी राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद, हौमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णांलयातील गट क व गट ड संवर्गातील ५ हजार ५६ पदे बाह्यस्रोतांमार्फत भरण्यास संमती दिली आहे.
  • त्यासाठी येणाऱ्या १०९ कोटी ५२ लाख रुपये खर्चसही मंजुरी देण्यात आली आहे.


Maha Govt Hospital Bharti 2022 : As per the news It has been decided to fill 4 thousand 445 vacancies in government medical colleges and their affiliated hospitals through external system. It includes more than 40 posts including nurses. The posts to be filled on contract basis include Nurse, Dietitian, ECG Technician, MIR Technician, Pharmacist, X-ray Technician and Assistant, Librarian, Dialysis Technician. The Directorate of Medical Education and Research has directed to fill the vacancies in all government medical colleges and hospitals in the state through external system.

सरकारी रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय

  • राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात परिचारिकांसह ४० हून अधिक पदांचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व दंत महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आधिपत्याखालील तसेच आयुष्य संचालनालयाच्या आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील वर्ग तीन व वर्ग चार या संवर्गातील रिक्त पदे नियमितरीत्या भरेपर्यंत बाह्ययंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्यास परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
  • सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने त्यास मान्यता दिली. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना तसे पत्र पाठवून त्यासंबंधीची कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहे.
  • कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांमध्ये परिचारिका, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एमआयआर तंत्रज्ञ, औषधनिर्माता, क्ष किरण तंत्रज्ञ व साहाय्यक, ग्रंथपाल, डायलेसिस तंत्रज्ञ आदी पदांचा समावेश आहे.

  • सरकारी रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, चिकित्सक व अन्य पदांच्या विविध जागा रिक्त
  • Govt Hospital Bharti 2022– As per the news, As many as 75 per cent vacancies for gynecologists, pediatricians and ophthalmologists are vacant in hospitals across the state. This percentage shows that only 170 experts have been appointed instead of 5700 posts.This information was released from the Director of Health in February 2022, and it has been revealed that this is just an announcement of the action to be taken to fill these posts. More details regarding Maha Govt Hospital Bharti 2022 are given below.
  • राज्यभरातील रुग्णालयांत तब्बल ७५ टक्के स्त्रीरोग, बालरोग, नेत्र शल्य चिकित्सकांच्या जागा रिक्त आहेत. ही टक्केवारी पाहता पावणेसातशे पदांऐवजी जेमतेम १७० तज्ज्ञांची नेमणूक झाल्याचे उघड होत आहे. त्यातील काहीजण तर महिनोंमहिने रुग्णालयात फिरकत नाहीत. त्यामुळे गर्भवती आणि लहान मुलांचे उपचाराविना हाल होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
  • आरोग्य संचालकांकडील ही माहिती फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर झाली असून, ही पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीच्या घोषणाच असल्याचेही दिसून आले आहे.
  • महिला, लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष ठेवून, योग्य उपचार, सल्ला देण्याच्या उद्देशाने सरकारी रुग्णालयांत स्त्रीरोग, बालरोग नेत्र शल्य चिकित्सकांची नेमणूक आवश्यक असते. त्यानुसार गेल्या काही वर्षांत ६७६ तज्ज्ञांची जागा निश्चित झाल्या. मात्र , त्यापैकी ५०६ जागा भरण्यासाठी आरोय खात्याला सवड मिळाली नसल्याचे दिसत आहे. 

  • Government And Private Hospitals Mumbai Bharti 2022
  • Jobs Opportunity in Government Hospital Details Read there – Online Apply link is given below. Opportunity for on-the-job training on Arogya Vibhag in government and private hospitals in Mumbai. Trained manpower is being imparted to the youth in the age group of 18 to 45 years who want to work in the health sector by imparting free training in selected courses in the health sector in government and reputed private hospitals in Mumbai city district. Read the more details given below and keep visit on this page for the further updates.
  • शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी
  • आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार असून या कालावधीत विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजगता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.
  • सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना विशेष प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु केली आहे.
  • प्रशिक्षण योजनेत प्रवेश घेण्याकरिता इच्छुकांनी https://docs.google.com/forms/d/1TaeY0k_DLf_VWbYkpag4XK6ffngk-QolUogJgeiL3OU/edit या लिंकवरुन नोंदणी करावी.
  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीकरीता इच्छुक उमेदवारांनी दुरध्वनी क्रमांक (०२२) २२६२६३०३ किंवा ९०२९५६६३९३ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • Jobs Opportunity in Government Hospital Apply Link
  • Online Apply Here

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Maha Govt Hospital Bharti Details are given here.

  2. Akash hake says

    New job

  3. priyanka says

    how to apply online or offline n where

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!