Mega Bharti – राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार
Mega Bharti 2023 for 75000 posts - Advertisement, Vacancy & Apply Link
Mega Bharti 2023 for 75000 posts
Updates of Mega Bharti 2023 – The recruitment of 75000 posts in the state will be completed before 15th August 2023. Many obstacles are seen in the recruitment of employees. The state government will constitute a committee under the chairmanship of the chief secretary to remove these obstacles and conduct recruitment in a transparent manner. TCS has a capacity of 7500 to 8000 if the online exam is to be conducted in the state. Whereas IBPS can take exam from 10000 to 15000 at a time. If lakhs of candidates come, then the question of how to conduct the examination process has been raised.
राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार आहे. नोकर भरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होताना पाहायला मिळतात. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकर भरती राबविण्यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार आहे.
Mega Bharti in August 2023 – राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार
- राज्यातील 75 हजार पदांची नोकर भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
- राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या 75 हजार जागांसाठी ही नोकर भरती होणार आहे.
- राज्यात ऑनलाईन परीक्षा घ्यायच्या असेल तर टीसीएसचे 7500 ते 8000 पर्यंत क्षमता आहे.
- तर आयबीपीएस 10000 ते 15000 पर्यंत एकावेळी परीक्षा घेऊ शकतात.
- लाखांच्या संख्येने जर उमेदवार आले तर नेमकी परीक्षा प्रक्रिया कशी राबवायची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात ७५ हजार पदांच्या भरती राबविण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना – शंभूराज देसाई
As per the latest update given by Ministry Shambhuraj Desai is that Formation of a committee by the state government to implement the recruitment of 75 thousand posts in the state. The companies TCS and IBPS were appointed to carry out the recruitment process of 75 thousand employees. However, due to the limited number of centers these companies are unable to plan if the number of candidates appearing for the exam increases, there is a possibility that 75 thousand recruitment will be delayed.
- 75 हजार नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित सेंटर असल्यामुळे परीक्षा देणार्या उमेदवारांची संख्या वाढल्यास त्याचे नियोजन करण्यासाठी या कंपन्या असमर्थ ठरत असल्यामुळे 75 हजार भरती रेंगाळण्याची शक्यता दिसून येत आहे.
- राज्य सरकार यावर तोडगा काढण्यासाठी नोकर भरतीबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती दोन दिवसांत निर्णय घेणार आहे. एवढी मोठी नोकरभरती राबविण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती काम करणार असून, नोकर भरतीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. राज्य सरकारने नोकर भरती घेण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मात्र भंडारा जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी या दोन्ही कंपन्यांचे सेंटर नाहीत. त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी राज्यभरातून जवळपास 15 लाख उमेदवार अर्ज करण्याची क्षमता मात्र दोन्हीही कंपन्यांची एवढी क्षमता नाही.
- टीसीएस कंपनी एकावेळी राज्यात 7500 ते 8000 पर्यंत उमेदवारांची परीक्षा घेऊ शकते तर आयबीपीएस कंपनी दहा हजार ते पंधरा हजार एका वेळी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे या कंपन्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदस्य सचिव जिल्हा निवड समिती भंडारा यांनी ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यामुळे 75 हजार नोकर भरती रेंगाळण्याची शक्यता आहे.
- राज्य सरकारच्या 75 हजार नोकर भरती पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे. कारण एकाच वेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या दोन्ही नियुक्त कंपन्या एकाच वेळी परीक्षा घेण्यास असमर्थ असल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार पदांच्या भरतीच्या वेगाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
- ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी केंद्रांची संख्या अपुरी – राज्यात 75 हजार नोकरभरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे यासंदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे. जिल्हा निवड समिती भंडारा यांनी आक्षेप घेतल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने टिसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे.
As per the Latest information received from news source due to the lack of co-ordination in the Mega Recruitment 2023 for 75000 there are signs of a break in the speed of recruitment process. It has been decided to recruit the vacant posts of Group C & Group D in various departments at revenue departmental level. For this, regional appointing officers of each department have been appointed in each revenue department. In some accounts only 1 to 2 similar posts are vacant in each revenue division. For these vacancies, the process of publishing a separate advertisement in each revenue department, entering into separate contracts with the companies for carrying out the recruitment process and conducting a separate examination for the same post in each department are all necessary. For this, the government has appointed TCS and IBPS companies. Carrying out the entire recruitment process for one or two positions is a headache for these companies and is also time consuming.
७५ हजार पदांच्या भरतीला ब्रेक? सुसूत्रता नसल्याने ३ आणि ४ वर्गांच्या पदांची विभागीय भरती खोळंबली
- भरती प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७५ हजार पदांच्या भरतीच्या वेगाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती महसूल विभागीय स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक महसूल विभागात प्रत्येक खात्याचे प्रादेशिक नियुक्ती अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
- काही खात्यांमध्ये प्रत्येक महसूल विभागात केवळ १ ते २ समान पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी प्रत्येक महसूल विभागात स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करणे, भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कंपन्यांबरोबर स्वतंत्र करार करणे आणि प्रत्येक विभागात समान पदासाठी वेगळी परीक्षा घेणे ही सर्व प्रक्रिया राबवावी लागत आहे. त्यासाठी सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. एक-दोन पदांसाठी संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणे या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, ती वेळखाऊही आहे.
- उदाहरण द्यायचे झाले तर कोकण महसूल विभागात पशुसंवर्धन खात्यात एका पदाची भरती करायची आहे, तर पशुसंवर्धन विभागात त्याच पदासाठी कोल्हापूर महसूल विभागात भरती करायची आहे. यासाठी कोकण आणि कोल्हापूर विभागांत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्या विभागाच्या प्रादेशिक नियुक्ती अधिकाऱ्याला भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीबरोबर वेगवेगळे करार करावे लागणार, त्यानंतर संबंधित कंपनी त्या एका पदासाठी कोकण विभागात वेगळी आणि कोल्हापूर विभागात वेगळी परीक्षा घेणार, त्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असे चित्र असून यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.
७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला वेग कसा येणार?
- महसूल विभागीय स्तरावर विविध खात्यांतील पदे भरण्यापेक्षा प्रत्येक खात्यातील विभागीय स्तरावरील रिक्त पदांची माहिती मुख्यालयाकडून मागवण्यात यावी आणि सर्व राज्यांसाठी एकत्रित भरती प्रक्रिया राबविण्यासाठी या कंपन्यांबरोबर एकत्रित करार करावा, असा पर्याय एका प्रादेशिक अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.
- लिपिक, टंकलेखक यांच्या विविध महसूल विभागातील भरतीसाठीही रिक्त जागांची माहिती मुख्यालयातून मागवण्यात येते. प्रत्येक महसूल विभागाकडून आलेली रिक्त पदांची माहिती एकत्रित करून या पदांच्या भरतीसाठी कंपन्यांबरोबर मुख्यालयातून एकत्रित करार जातो आणि या कंपन्या एकत्रित परीक्षा घेतात आणि वेगाने भरती प्रक्रिया पूर्ण होते.
- अशाच पद्धतीने रखडलेल्या ३ आणि ४ वर्गच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी सर्व महसूल विभागांतून मुख्यालयांनी रिक्त पदांची एकत्रित माहिती मागवली आणि मुख्यालयातूनच कंपन्यांबरोबर एकत्रित करार करून भरती प्रक्रिया राबवली तर भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल
राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
Latest Mega Bharti 2023 updates is here. Chief Minister Eknath Shinde directed to speed up the recruitment process for 75 thousand posts in the Maharashtra state on Tuesday meeting. Official Advertisement in this regard will be released in the first week of January 2023. 14 various important government departments were presented regarding recruitment. In order to speed up the process of filling up the vacant posts, the Cabinet took a thorough review of 14 departments and gave instructions. Maharashtra Public Service Commission will be recruiting for the post of Clerk Typist across the state. For more information visit www.govnokri.in.
Coming Recruitment GR in January 2023 :
जानेवारी २०२३ मध्ये येणाऱ्या भरतीचे GR येथे पहा..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी भरती होणार आहे. या संदर्भातील जाहिरात जानेवारी २०२३मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.
Mega Bharti 2023 For 75000 Posts– An important decision has been taken for lakhs of candidates who are waiting for recruitment in the state. Now the competitive exams for recruitment in the state will be conducted by TCS-ION and IBPS companies. Read More details about Mega Bharti 2022 are given below.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यात राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली.
संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायचा आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळं 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- राज्य सरकारकडून नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केल्यानंतर आज आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
- मागील काळात सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. यात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडून देखील मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाल्याचं पाहायला मिळाला होता. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकलेली नाही.
- त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील.
- मात्र गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत. आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे
नोकरीची संधी : महाराष्ट्रात 75000 पदांची भरती; कोणत्या खात्यात जागा किती?
Latest updates announce Yesterday (3rd Nov. 2022) for mega bharti 2022 for 75000 posts. In the online presence of Prime Minister Narendra Modi, out of 75000 posts, 2000 people were given job certificates across Maharashtra. Programs were held in all the divisional offices in Maharashtra. Now the recruitment for the posts of Home Department, Public Health Department, Water Resources Department, Revenue and Forest Department, Medical Education Department, Public Works Department, Tribal Department, Social Justice Department will be released soon for 75000 posts. Due to this decision taken by the government, the way has been cleared for 75000 posts in 29 departments of the government. The state government has issued a government order in this regard. Read the department wise vacant posts details below on this page.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75,000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल (3rd Nov. 2022) या 75,000 पदांपैकी 2,000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले. आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75,000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.
Mega Bharti 2022 vacancy Details
कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.
कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?
- आरोग्य खाते : १० हजार ५६८
- गृह खाते : १४ हजार ९५६
- ग्रामविकास खाते : ११ हजार
- कृषी खाते : २ हजार ५००
- सार्वजनिक बांधकाम खाते : ८ हजार ३३७
- नगरविकास खाते : १ हजार ५००
- जलसंपदा खाते : ८ हजार २२७
- जलसंधारण खाते : २ हजार ४२३
- पशुसंवर्धन खाते : १ हजार ४७
किती जागा रिक्त ?
- गृहविभाग : ४९ हजार ८५१
- सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
- जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
- महसूल आणि वनविभाग : १३ हजार ५५७
- वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
- सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
- आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
- सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१
Maharashtra Mega Bharti 2022-Important announcement regarding the Mega Bharti 2022 in Maharashtra is given here. The way for the recruitment of 75 thousand government posts has been cleared on the occasion of the Amrit Jubilee year of Indian Independence . TCS, IBPS will conduct the exam for Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D posts outside Maharashtra Public Service Commission. Through this, the way to fill 75 thousand posts has been cleared. (General Administration Department) will publish advertisement soon. For more information visit our website www.govnokri.in.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार सरकारी पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नोकर भरतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याची सरकारची योजना आहे. त्यादृष्टीने आज वित्त विभागाने जीआर जारी केला आहे. त्यानुसार, शासनाच्या ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.
- तर, ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून या भरतीची मुभा देण्यात आली आहे.
- नोकरभरतीवरील निर्बंधांतून देण्यात आलेली ही सूट फक्त स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.
- त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तर, ३० सप्टेंबरच्या जीआरनुसार सुधारित आकृतिबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली होती. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची मुभा होती. अन्य संवर्गातीलही पूर्ण पदभरतीचा मार्ग आजच्या जीआरने मोकळा झाला आहे.
संपूर्ण GR येथे वाचा
Today’s important announcement regarding the Mega bharti 2022 in Maharashtra is given here. Important decisions were taken in the cabinet meeting held today (i.e. 20th October 2022). In this meeting, instructions were given regarding mega recruitment for 75000 posts. Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis today directed to recruit 75 thousand mega bharti will be started as soon as possible. TCS, IBPS will conduct the exam for Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D posts outside Maharashtra Public Service Commission. Through this, the way to fill 75 thousand posts has been cleared. (General Administration Department) will publish advertisement soon. For more information visit our website www.govnokri.in.
दिवाळी रोजगाराची! पंतप्रधान मोदी तरुणांना देणार 75000 नोकऱ्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत नामनिर्देशनाद्वारे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
Mega Bharti 2022 for 75000 posts
मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.
Maharashtra Mega Bharti 2022 – Government Recruitment Exam will be conducted though the reputed company like IBPS & TCS. Now government recruitment will be given priority through TCS, IBPS companies only. Candidates Read the complete details given below on this page regarding the MegaRecruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परिक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील.
[email protected]
Rakesh sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास S, T,. महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार 9960328372
Rakesh Sanjeev Natekar 10 pass 12 pass टायपिंग ऐमेसियाटी पास शिक्षण B, S, C, आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास ऐस टी महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार S, T, 9960328372 9860933681
Mega Bharti 2022 For 75000 posts will be held soon
Mega Bharti 2022 – राज्यात शासकीय मेगाभरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार सरकाची घोषणा