MPSC Exam – टंकलेखक परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू

MPSC Exam 2021 updates

Application of Typing Skills Test for the examinations requiring Typing Certificate as per the Recruitment Rules. Independent typewriting skills based on computer system will be tested for the posts of Clerk-Typist (Marathi), Clerk-Typist (English) and Tax Assistant. Read More details as given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या दोन संवर्गाच्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) लागू करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात संबंधित संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगाकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

  • १) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
  • (२) टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
  • (३) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.
  • (४) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखन (इंग्रजी) व कर सहायक संवर्गाकरीता स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येतील. कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल.

 


Significant changes in MPSC Tax Assistant, Clerk Typist Exam: Significant changes have been made in the Tax Assistant and Clerk Typist examinations. It has been decided to conduct computer based typing skills test after the main examination for the upcoming posts of Clerical Typist and Tax Assistant. This test will be in Qualifying format. The detailed procedure will be announced separately. Read More details as given below.

MPSC कर सहायक, लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्वाचा बदल

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कर सहायक आणि लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

MPSC Exam: MPSC परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निर्णयांचा धडाका सुरुच आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कर सहायक आणि लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

आयोगाच्या निर्णयाचं स्वागत

कर सहायक आणि लिपिक टंकलेखक परीक्षेतील टायपिंग म्हणजेच टंकलेखनाची परीक्षा संगणक आधारित प्रणालीत घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाचं उमदेवारांकडून स्वागत करण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसेल, अशा प्रतिक्रिया उमेदवारांकडू व्यक्त करण्यात आल्या आहेत.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याची संधी मिळणार

आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. आयोगाच्या या निर्णयाचं देखील विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे

1 Comment
  1. Anjali gaikwad says

    Yes

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!