Thane Arogya Vibhag Bharti – ठाणे आरोग्य विभागात ८७८ पदे रिक्त
Arogya vibhag Thane Bharti 2023
Thane Arogya Vibhag Bharti 2023: Latest updates regarding Arogya Vibhag Thane Recruitment 2023 is that The state government has approved the scheme of municipal corporation and sanctioned 878 posts in the month of February; But these posts are still not filled.
ठाणे महापालिकेच्या सेवेत नव्याने ८८० पदे मंजूर झाली असून त्यातील ८७८ पदे ही आरोग्य सेवेतील आहेत. राज्य शासनाने महापालिकेचा आकृतीबंध मंजूर केला असून फेब्रुवारी महिन्यात या पदांना मंजुरी दिली; परंतु ही पदे अद्याप भरलेली नाहीत. या पदांची भरती केल्यास महापालिकेचा आस्थापना खर्च ८ ते १० टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे त्यातील केवळ अत्यावश्यक पदे भरता येतात का, याबाबत पालिका स्तरावर चर्चा सुरू आहे तसेच या भरतीला ‘विशेष बाब ‘ म्हणून मंजुरी घेण्याचा विचार पालिका करत आहे.
नव्या पदांना मंजुरी मिळाली असली तरी त्या पदांची भरती कशी करायची, असा पेच महापालिकेसमोर आहे. महापालिका सेवेतील आजमितीस तीन हजार ८२६ पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने दोन टप्प्यांत आकृतीबंध मंजूर केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये ८८० पदांना मंजुरी दिली. त्यातील दोन पदे ही उपायुक्तांची होती तर उर्वरित ८७८ पदे ही आरोग्य सेवेतील होती