GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

UPSC 2020

UPSC CSE Prelims 2020 exam date

UPSC CSE Prelims 2020 exam date: The Central Public Service Commission has made a new announcement regarding the pre-examination. The announcement was made today on the Commission’s website regarding the date of the examination.

The exam was scheduled to be held on May 31, 2020. But the test was postponed due to a lockdown caused by the corona virus. The commission had announced on Wednesday, May 20 when the exam would be held. Accordingly, it was announced today that the date of UPSC pre-examination will be announced on June 5, 2020. The date will be announced on the Commission’s website on June 5 after reviewing the situation regarding Corona.

यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० कधी होणार यासंदर्भातली महत्त्वाची घोषणा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. ही परीक्षा तूर्त लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेली आहे.

UPSC CSE Prelims 2020 exam date : केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेसंदर्भात नवी घोषणा केली आहे. परीक्षेच्या तारखेसंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर आज ही घोषणा करण्यात आली.

ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३१ मे २०२० रोजी होणार होती. पण करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा कधी घेतली जाणार याबाबत बुधवारी २० मे रोजी माहिती देणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार आज ही घोषणा करण्यात आली की यूपीएससी पूर्व परीक्षा कधी घेतली जाणार ती तारीख आता ५ जून २०२० रोजी जाहीर केली जाणार आहे. करोनासंदर्भातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ५ जून रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या तारखेची घोषणा करण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी सीएसई – सिव्हिल सर्व्हिस परीक्षा) घेते. ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. देशातील लाखो तरुण यूपीएससी सेवेचे स्वप्न पाहतात. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेस बसतात.या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते.

पूर्व परीक्षेचा पॅटर्न

या परीक्षेत दोन पेपर असतात. दोन्ही पेपर अनिवार्य असतात. प्रत्येक पेपरमध्ये २०० गुण असतात. म्हणजेच पूर्व परीक्षा एकूण ४०० गुणांची आहे.

दोन्ही पेपर्समध्ये (जनरल स्टडीज पेपर -१ आणि जनरल स्टडीज पेपर -२) ऑब्जेक्टिव्ह टाइप (एमसीक्यू) प्रश्न विचारले जातात. उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी दोन तास दिले जातात. म्हणजेच दोन पेपरसाठी एकूण चार तासांचा अवधी असतो.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस पू्र्व परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर -2 पात्रता पेपर असतो. म्हणजेच या पेपरमध्ये यशस्वी होण्यासाठी या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असतात.


UPSC Exam Results 2020

The Central Public Service Commission (UPSC) on Thursday announced the results of several written exams. The posts for which the results have been announced are as follows – Assistant Director, Coordinating Police Wireless Directorate, Deputy Central Intelligence Officer (Technical), IB, Company Advocate in the Ministry of Corporate Affairs, Assistant Legal Adviser in the Enforcement Directorate, Senior Examiner of Trade Marks and Geographical Indications and Examiner. Candidates can check their results on the official website of UPSC upsc.gov.in.

UPSC Exam Result 

यूपीएससीच्या लेखी परीक्षांचे निकाल जाहीर

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या काही लेखी परीक्षांचे निकाल गुरुवारी आयोगाने जाहीर केले आहेत. यूपीएससीच्या वेबसाइटवर कसे पाहाचये हे निकाल …वाचा.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) गुरुवारी अनेक लेखी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. ज्या पदांकरिता निकाल जाहीर करण्यात आले आहेत त्या पुढीलप्रमाणे – सह-सहाय्यक संचालक, समन्वय पोलीस वायरलेस संचालनालय, उप केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी (तांत्रिक), आयबी, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयातील कंपनी वकील, अंमलबजावणी संचालनालयात सहाय्यक कायदेशीर सल्लागार, ट्रेड मार्क्स अँड जॉग्राफिकल इंडिकेशन्सचे वरिष्ठ परीक्षक आणि परीक्षक.

उमेदवार आपला निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तपासू शकतात.

निकाल कसा पाहायचा?

१. यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
२. तुम्ही जी परीक्षा दिली आहे त्या लिंकवर होमपेजवर क्लिक करा.
३. तुम्ही यूपीएससीच्या वेबसाइटच्या नवीन पानावर पोहोचाल.
४. कंट्रोल एफ दाबून आपला रोल नंबर टाईप करा.
५. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
६. भविष्यातील वापरासाठी तुमचा निकाल डाऊनलोड करा व प्रिंट आउट घ्य.,

तुम्ही यूपीएससी वेबसाईटवरही जाऊ शकता आणि तपासू शकता किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन थेट देखील निकाल तपासू शकता.

UPSC Civil Service Prelims Exam 2020 Postponed

The Commission held a special meeting on May 4, 2020, to review the situation after the second phase of the nation-wide lockdown due to COVID-19. Taking notice of the extension of restrictions, the Commission decided that it will not be possible to resume examinations and interviews for the present.

The Civil Services (Preliminary) Examination, 2020, scheduled to be held on May 31, 2020, therefore, stands deferred. Since this examination also serves as the screening test for the Indian Forest Service Examination, the schedule for the Indian Forest Service Examination is also deferred. The situation will be reviewed again on May 20, 2020, and fresh dates for these examinations shall be notified on the UPSC website in due course

यूपीएससी पूर्व परीक्षा अखेर लांबणीवर

कोव्हिड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवल्यानंतर अखेर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने ३० मे रोजी होणारी पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची पुढील तारीख घोषित करण्यासाठी २० मे रोजी पुन्हा एकवार परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असं आयोगाने जाहीर केलं आहे.

यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचीही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसार ३० मे रोजी होणार होती. मे अखेर परीक्षा असल्याने देशभरातील लॉकडाऊननंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर आयोगाने ४ मे रोजी हा निर्णय जाहीर केला.

यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चं आयोजन आता ३१ मे रोजी होणार नाही. २० मे रोजी देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यथावकाश पुढील तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवी तारीख जाहीर करताना उमेदवारांना किमान ३० दिवस अगोदर कळवण्यात येईल.<br><br>उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवावी. लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे. यूपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षेसाठी गेली ६ वर्षे विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घ्यावा, उजळणी करावी, असंही आयोगाने सांगितलं आहे.

यापूर्वी नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या काही मुलाखतींसह चार विविध परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. यात आर्थिक सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एनडीए आणि संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा या २०२० च्या परीक्षांचा समावेश आहे.

यूपीएससीचं परीक्षेसंदर्भातील परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सोर्स: मटा


UPSC Civil Service Prelims Exam 2020

Candidates are curious about the pre-examination of civil services. Candidates want to know whether this exam will also be postponed. Although UPSC has fixed the schedule of the Civil Service Interview / Personality Test, no decision has been taken regarding the pre-examination.

The Joint Medical Services Examination, the Indian Financial Service Examination and the Indian Statistical Service Examination 2020 have already been postponed. A circular has also been issued to postpone the examination. The National Defense Academy exams have also been postponed. CAPF exam dates will be announced on the UPSC website. Any decision regarding the NDA-2 exam will be announced on the UPSC website on June 10, 2020.

यूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच? काय म्हणाले मंत्री?

टाळेबंदीमुळे  देशभरात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. स्पर्धा परीक्षांसह बहुतांश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत सिव्हिल सर्व्हिसेसच्या पूर्व परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. ही परीक्षा देखील पुढे ढकलण्यात येईल की नाही हे उमेदवारांना जाणून घ्यायचे आहे. यूपीएससीने नागरी सेवा मुलाखत / व्यक्तिमत्त्व चाचणीचे वेळापत्रक निश्चित केले असले तरी पूर्वपरीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याबाबतच्या गोंधळासंबंधी ते बोलत होते. त्याचबरोबर त्यांनी नागरी सेवा पूर्व परीक्षा ३ मे नंतर घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.

कोणत्या परीक्षा लांबणीवर

संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा, भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० यापूर्वीच स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा पुढे ढकलल्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आली आहे. यूपीएससीच्या संकेतस्थळावर सीएपीएफ परीक्षेच्या तारखांची घोषणा केली जाईल. एनडीए – २ च्या परीक्षेसंदर्भातील कोणत्याही निर्णयाबाबतची माहिती १० जून २०२० रोजी यूपीएससीच्या संकेतस्थळावर दिली जाणार आहे.

नागरी सेवा पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार आहेत. १६ एप्रिल रोजी यूपीएससीने हे स्पष्ट केले होते की पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. असा कोणताही निर्णय झाल्यास, त्याबाबतची माहिती यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल.

सोर्स: मटा


यूपीएससी 2020: पाहा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका

UPSC Exam Paper : If you practice the previous year’s question papers while preparing for the UPSC Pre-Examination, you will also notice the pattern of questions and will also try towards solving the paper in time. You will also have practice. Often old questions are asked again. We are providing you with the UPSC Civil Services Pre-Exam Questionnaire in 2019.

The UPSC exams will be held on May 31. The candidates who have filled out the application for this exam will now be ready for the final phase. The exam is still for about two months. Here are the pre-exam pattern and last year’s paper we are giving you.

UPSC पूर्व परीक्षेची तयारी करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव कराल तर तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्नही लक्षात येईल आणि पेपर वेळेत सोडवण्याच्या दिशेनेही तुम्ही प्रयत्न कराल. शिवाय तुमची प्रॅक्टीसही होईल. अनेकदा जुने प्रश्न पुन्हा विचारले जातात. आम्ही तुम्हाला २०१९ मधील यूपीएससी सिव्हिल सेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिका येथे देत आहोत.

यूपीएससी पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार आहे. या परीक्षेला ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांची आता अखेरच्या टप्प्यातली तयारी सुरू असेल. अजून परीक्षेला जवळपास दोन महिन्यांचा अवधी आहे. पूर्व परीक्षेचा पॅटर्न आणि मागील वर्षीचे पेपर आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत…

MPSC सराव परीक्षा पेपर

पाहूया कसा असतो पूर्व परीक्षेचा पॅटर्न

यूपीएससी सिव्हील सर्व्हिसेस मार्किंग स्कीम –

 • १) सर्वसाधारण अभ्यासाचे सर्व प्रश्न २ गुणांचे असतात.
 • सीसॅट म्हणजेच सिव्हील सर्व्हिस अॅप्टिट्युड टेस्ट पेपरचे सर्व प्रश्न २.५ गुणांचे असतात.
 • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा होतात.
 • उत्तराचे एकापेक्षा अधिक पर्याय निवडले तर त्यापैकी एक बरोबर जरी असलं तरी ते उत्तर चुकीचं मानण्यात येईल.
 •  उत्तरांचे पर्याय भरले नाहीत तर गुण वजा होत नाहीत.
 •  पात्र होण्यास ३३ टक्के गुणांची आवश्यकता असते.

सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस

परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला पेपर सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट (सीसॅट) आणि दुसरा पेपर जनरल अॅबिलिटी टेस्ट (जीएटी) चा असतो.

जनरल अॅबिलिटी

या पेपरमध्ये देशासंदर्भातील विविध प्रकारच्या ज्ञानाचे परीक्षण होते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आदि विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात. राष्ट्रहिताच्या घटना, देशाची भौगोलिक स्थिती, घटनात्मक चौकट, आर्थिक सामाजिक विकास, वैज्ञानिक विकास अशा विविध क्षेत्रांतील प्रश्न विचारले जातात.

MPSC सराव परीक्षा पेपर

सीसॅट (इंग्लिश आणि जनरल अॅप्टिट्यूड)

कॉम्प्रिहेंशन, कम्युनिकेशन स्कील्स, लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मेंटल अॅबिलिटी, गणित (१० वीपर्यंतच्या स्तराचे) , इंग्रजी कॉम्प्रिहेंशन स्कील्स (१० वीपर्यंतच्या स्तराचे)

पेपर पॅटर्न

 • परीक्षा पद्धती – ऑफलाइन
 • पेपरची संख्या – २
 • प्रश्न – पहिल्या पेपरमध्ये ८०, दुसऱ्या पेपरमध्ये १००
 • एकूण गुण – ४००
 • परीक्षेची भाषा – हिंदी आणि इंग्रजी

मागील वर्षीचे पेपरमागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव कराल तर तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्नही लक्षात येईल आणि पेपर वेळेत सोडवण्याच्या दिशेनेही तुम्ही प्रयत्न कराल. शिवाय तुमची प्रॅक्टीसही होईल. अनेकदा जुने प्रश्न पुन्हा विचारले जातात. आम्ही तुम्हाला २०१९ मधील यूपीएससी सिव्हिल सेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिका येथे देत आहोत. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या डाऊनलोडदेखील करू शकता..

UPSC Civil Services Prelims 2019 Question Paper – 1
UPSC Civil Services Prelims 2019 Question Paper – 2

Leave A Reply

Your email address will not be published.