MPSC पूर्व परीक्षेच्या तीन उपकेंद्रांत बदल!

MPSC Exam 2021

Three examination sub-centers in Pune have been shifted for the MPSC Secondary Service Joint Pre-Examination organized by the Maharashtra Public Service Commission. The Commission informed through a press release that it is providing examination papers to the candidates as per the changed examination centers.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा उपकेंद्रे बदलण्यात आली आहे. बदललेल्या परीक्षा केंद्रानुसार उमेदवारांना परीक्षापत्र उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. एमपीएससीने पुणे जिल्हा केंद्रावरील तीन परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आले.

वाघोलीतील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये होणारी परीक्षा आता बुधवार पेठेतील एच. व्ही. देसाई महाविद्यालयात होणार आहे. तसेच अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे होणारी परीक्षा नºहे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे होणार आहे.

 


The MPSC competition examination will be held as per the schedule. As per the decision of Maharashtra Commission, MPSC competitive examination will be held as per schedule.

MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. महाराष्ट्र आयोगाच्या निर्णयानुसार MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं.

MPSC Exam- Scribe अनुमत दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर

राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.


MPSC Exam 2021: The Agricultural Service, Forest and Engineering Services examinations conducted through the Maharashtra Public Service Commission were conducted separately. However, now these three exams will be combined and it has been prepared by the Maharashtra Public Service Commission

MPSC च्या वन, कृषी, अभियांत्रिकीची होणार एकत्रित परीक्षा !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कृषी सेवा, वन आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. मात्र, आता या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार असून त्याची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. 2021 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्‍तपदांची भरती करताना त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेअंतर्गत 27 प्रकारची पदे भरली जातात. या पार्श्‍वभूमीवर कृषी, वन आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत.

“एमपीएससी’च्या एकत्रित परीक्षेचे स्वरूप

शंभर प्रश्‍नांसाठी 200 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे. या तिन्ही विभागांच्या मुख्य परीक्षा मात्र, स्वतंत्रपणे होतील. आयोगाने त्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. दोन गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास 0.5 टक्के तर एक गुणाचे उत्तर चुकल्यास 0.25 टक्‍के गुण कपात केले जाणार असल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.


 

 Guidelines for MPSC Exam

The Maharashtra Public Service Commission has issued guidelines for pre-service examinations conducted by the commission. The exam will be held on Sunday, March 21, 2021.

MPSC Exam: MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परीक्षा येत्या रविवारी २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे.

आयोगाने परीक्षेच्या वेळी पालन करावयाच्या सूचना पुढीलप्रमाणे –

  • परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांनी किमान तीन पदरी कापडी मास्क वापरणे अनिवार्य.
  • – परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले किट प्रत्येक उमेदवाराला देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्रांकरिता करायचा आहे.
  • – परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातारवण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक.
  • – कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे (ताप, सर्दी, खोकला इ.) दिसून येत असल्यास संबंधित परीक्षआ उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी / कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप आदी गोष्टी असलेलं पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.
  • – सोशल डिस्टन्सिंगसाठी परीक्षा उपकेंद्रावरील योग्य माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
  •  परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे.
  • – वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर पाऊच आदी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत.
  • – कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

Check Guidelines Here


 UPSC Exams From January 8 To 17! MPSC Exam In February?

UPSC and MPSC Exam: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has given a deadline of January 15 for candidates in the ‘SEBC’ category to opt for the open or central government’s ‘EWS’ option as the reservation for the Maratha community remains in abeyance. On the other hand, the UPSC  examination will be held from January 8 to 17. After that, the Maharashtra Public Service Commission examination will be held after February 15, senior sources in the general administration department have said.

 युपीएससी’ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! ‘एमपीएससी’ची परीक्षा फेब्रुवारीत

 मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे 8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा;15 फेब्रुवारीनंतर ;होईल, अशी शक्‍यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.

खुशखबर !… MPSC च्या परीक्षा जाहीर; आता तयारीला लागा

 आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या ‘एसईबीसी’ आरक्षणास स्थगिती दिली. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.

 राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यभर लॉकडाउन करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आणि परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने आयोगाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनासंबंधीचे निर्बंध व नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्याचे आयोगाने निश्‍चित केले आणि विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत केले. मात्र, मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाल्याने पुन्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आयोगाच्या प्रश्‍नपत्रिका अद्यापही जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातच पडून आहेत. दुसरीकडे हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु केल्याचेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, आयोगाने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे अधिकाधिक सहा संधी तर अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी असेल, असा निर्णय घेतला. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी देण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील काळात कार्यवाही केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!