UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर

UPSC Civil Services Final Result 2019 Announced

PSC Civil Services Final Results 2019: The final result of the Civil Service Examination 2019 of the Central Public Service Commission has been announced. The main exams were held in September 2019, while the interviews were conducted in February and August 2020. The list of successful candidates has also been announced by the Central Public Service Commission.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर झाला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. यशस्वी उमेदवारांची यादीदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.

पुढील केंद्रीय सेवांमधील जागांसाठी या परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येईल –

१) भारतीय प्रशासकीय सेवा
२) भारतीय परराष्ट्र सेवा
३) भारतीय पोलीस सेवा
४) केंद्रीय सेवांमधील गट ‘अ’ आणि गट ‘ब’

प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण ८२९ उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-
सर्वसाधारण गट – ३०४
आर्थिक वंचित गट – ७८
इतर मागासवर्गीय – २५१
एससी – १२९
एसटी ६७

उमेदवारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे

यूपीएससी २०१९ निकाल

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!