ZP Beed Bharti -जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात लवकरच ४०० जागांची भरती
ZP Beed Bharti 2023
Beed ZP Bharti 2023- Latest updates regarding Zilha Parishad Beed Bharti 2023 is that 400 posts will be recruited soon in the health department of Beed Zilla Parishad. This recruitment process will be for the posts of Drug Manufacturing Officer, Health Supervisor and Arogya Sevak Male and Arogya Sevak Female in the Zilla Parishad Health Department.
मागच्या अनेक वर्षांत जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची भरती झाली नाही. केवळ अनुकंपाधारक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. मात्र, आता तब्बल चारशे पदांची भरती होणार आहे. मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचार संहिता संपताच भरतीची प्रक्रीया सुरु होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य पर्यवेक्ष व आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेवक खो या पदांची ही भरती प्रक्रीया असेल. साडेचार चार वर्षापूर्वी तत्कालीन महायुती साधारण ७० हजार पदांची महाभरती सरकारने राज्यभरात जाहीर केली. मात्र, रिक्त पदे व भरती योग्य पदांची जिल्हानिहाय माहिती गोळा करण्यातच सरकारची मुदत संपली. त्यापूर्वीही काही वर्षे आणि अलीकडच्या तीन वर्षांत देखील भरती झाली नव्हती. मधल्या काळात आरोग्य विभागाची राज्य पातळीवरून दोन वेळा भरती झाली. मात्र, एक भरती प्रक्रीया घोटाळ्यात अडकली आहे. जिल्हा परिषदेतील विविध अस्थापनांची भरती अलीकडे झालेलीच नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या साधारण साडेसहाशेंच्या आसपास जागा रिक्त आहेत.