Apprentice Jobs खुशखबर! पुढील पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार

Apprentice Jobs

Maharashtra Apprenticeship Promotion Scheme

New Maharashtra Apprentice Promotion Scheme is being implemented to provide employment and self-employment opportunities and experience to the youth who have passed at least 10th standard in the state. Under this scheme, 5 lakh well-educated unemployed youth will be trained in five years by encouraging establishments for recruitment of apprentice candidates. They will also get employment and self-employment opportunities.

PM Scholarship Scheme 2021

डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये रोजगार

खुशखबर! पुढील पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार

Apprentice Scheme 2021

Apprentice Scheme: करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme – MAPS) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत चालू वर्षात राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यामध्ये १ लाख युवकांना अप्रेंटीसशीपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन मिळेल,, अशी माहितीही त्यांनी दिली.

Flipkart मध्ये मेगा भरती; 70 हजार लोकांना उपलब्ध होणार रोजगार

राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहित करुन पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!