Mumbai Arogya Vibhag-ऑक्युपेशनल तज्ज्ञांची रिक्त पदे भरणार; पदे भरण्यास आयुक्तांची मंजुरी
Public Health Dept Mumbai recruitment 2023
Mumbai Arogya Vibhag Bharti 2023
Mumbai Arogya Vibhag Bharti 2023 : The posts of Junior Occupational Therapist and Occupational Therapist in the Department Office and Suburban Hospital under the Public Health Account of the Municipal Corporation were vacant for the past several years. Therefore, the health department decided to fill 13 of these posts immediately. The application submission period is from 28th December to 17th January from 10 am to 5 pm Monday to Friday excluding public holidays. Read More details are giveen below.
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची संधी भरपूर पगार- लगेच अर्ज करा
मुंबई महापालिकेच्या सर्व उपनगरीय रुग्णालयात कनिष्ठ व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल) तज्ञ व व्यवसायोपचार तज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत १३ पदे भरण्यात येणार असून यात ६ पदे खुल्या वर्गासाठी असून सरळसेवेते ही भरती केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
Arogya Vibhag Mumbai Recruitment 2023
- महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विभाग कार्यालयातील व उपनगरी रुग्णालयातील कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ज्ञ व व्यवसायोपचार तज्ज्ञ ही पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त होती. त्यामुळे आरोग्य विभागाने यातील १३ पदे भरण्याचा तातडीने निर्णय घेतला.
- यात आरक्षणांतर्गत सात पदे भरण्यात येणार आहेत. यात भटकी जमात ब, क, ड तीन पदे, इतर मागासवर्गीय दोन पदे, आर्थिक दुर्बल घटक दोन पदे आदींचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेत दिव्यांग उमेदवारांकरिता एक पद आरक्षित होत असून ही पदे अंध व अल्पदृष्टी या प्रकारातून भरण्यात येणार आहेत. १३ पदांपैकी महिलांसाठी ३० टक्के आरक्षण असल्यामुळे चार पदे महिला आरक्षणातून भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
अर्ज सादर करण्याचा कालावधी २८ डिसेंबर ते १७ जानेवारी सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून सोमवार ते शुक्रवार ठेवण्यात आला आहे. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय भाभा महापालिका सर्वसाधारण हॉस्पिटल, बांद्रा पश्चिम सात मजला येथे अर्ज सादर करण्यात यावा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी १६ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११ ते ०४ वाजेपर्यंत या कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात, शैक्षणिक अर्हता, निवडीचे निकष, अटी सविस्तर भरती संदर्भातील माहिती https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
[email protected]
Anil