Kolhapur Arogya Vibhag Bharti -कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागात ११९ पदे रिक्त
Arogya Vibhag Kolhapur Bharti 2023
Kolhapur Arogya Vibhag Bharti 2023– A total of 119 posts are vacant in health department in Shahuwadi taluka of Kolhapur district. The taluka health department consists of medical officers, drug manufacturing officers, health nurses, attendants and other posts in government employees. Read More details about Kolhapur Arogya Vibhag Recruitment 2023 are given below.
शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य विभागात मंजूर असलेल्या पदांपैकी तब्बल ११९ पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी कार्यरत कर्मचाऱ्यांतून होत आहे.
नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासकीय स्तरावरून विविध योजना कार्यरत केल्या आहेत. परंतु, योजनांच्या अंमलबजावणीसाठी शाहूवाडी तालुक्यात पुरेसा कर्मचारीवर्ग कार्यरत नाही. या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेचा कार्यभार ‘रामभरोसे’ झाला आहे.
तालुका आरोग्य विभागात शासकीय कर्मचारी वर्गातील वैद्यकीय अधिकारी २४ पैकी ६ रिक्त, औषध निर्माण अधिकारी ११ पैकी ३ रिक्त, कनिष्ठ सहाय्यक १० पैकी २ रिक्त, आरोग्य सहाय्यक २० पैकी ३ रिक्त, आरोग्य सहायिका १२ पैकी ४ रिक्त, आरोग्यसेविका ५० पैकी २७ रिक्त, आरोग्यसेवक ३९ पैकी २ रिक्त, परिचर ४५ पैकी २६ रिक्त, तसेच कंत्राटी कर्मचारी वर्गातील आरोग्यसहायिका ९ पैकी ५ रिक्त आरोग्यसेविका ३८ पैकी ३३ रिक्त, अशी ३२२ पैकी ११९ पदे तालुक्यात रिक्त आहेत.
तालुक्यात मलकापूर एकच ग्रामीण रुग्णालय आहे, तर आंबा, बांबवडे, करंजफेण, माण, मांजरे, परळे निनाई, सरूड, भेडसगाव, शित्तूर वारूण अशी एकूण ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तीन आरोग्य उपकेंद्र जागेअभावी इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत, तर ६ उपकेंद्रांना इमारतच नाही.