अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे वेळापत्रक आज

 

11th Admission Pune, Mumbai, Nagpur, Amravati, Nashik, Aurangabad

The 11th admission schedule for Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Amravati and Aurangabad divisions of the state is likely to be announced today, Monday. Sources said that students who have registered and completed the first part can fill Part 2.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज, सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज, सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून पहिला भाग पूर्ण केला आहे अशा विद्यार्थ्यांना पार्ट २ भरता येईल असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई एमएमआर विभाग तसेच, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अकरावीचे ऑनलाइन प्रवेशाचे अर्ज भरले जात आहेत. राज्यभरात रविवारी सांयकाळपर्यंत या भागातून ४ लाख ३१ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग एक भरून नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई एमएमआर विभागात २ लाख १९ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. औरंगाबाद १८ हजार ४५५, अमरावती ११ हजार ७७८, नागपूर ३५ हजार १४९ आणि नाशिक २८ हजार ११३ आणि पुणे विभागात ९० हजार ४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी या विभागांतील एकूण १ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना भाग दोन भरायचा आहे. या संदर्भातील वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता आहे.


Students will be able to fill part 1 of the admission form for the 11th admission from today. 1 lakh 78 thousand 262 students have registered from the Mumbai division till 8 pm on Friday. In this, students have to fill in their information and lock the admission form. In addition, students will be able to check and verify the information filled in the application. Students will be able to enlist the help of parents or teachers to fill out the application. So now the first phase of the eleventh admission is going to start from today.

कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज भाग – १?

११ वी प्रवेश पहिला टप्पा आजपासून सुरु..

अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचा भाग १ आजपासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. शुक्रवारी रात्री ८ पर्यंत १ लाख ७८ हजार २६२ विद्यार्थ्यांनी मुंबई विभागातून नोंदणी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरून प्रवेश अर्ज लॉक करायचा आहे. शिवाय अर्जात भरलेली माहिती ही विद्यार्थ्यांना तपासून, प्रमाणित करून घेता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी पालकांची किंवा शिक्षकांची मदत घेऊ शकणार आहेत. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाचा पहिला टप्पा आजपासून सुरु होणार आहे.

अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन मोबाईलव्दारे प्रवेश अर्ज भरण्याची…

शिक्षण संचालनालयाकडून अर्जाचा पहिला भाग १ आॅगस्टपासून भरता येणार असल्याची माहिती नोंदणी सुरू करण्याच्या वेळेसच देण्यात आली. मात्र विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.

विद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू; येथे पहा संपूर्ण…

काय आहे मोबाइल अ‍ॅप?
विद्यार्थ्यांना अर्ज करणे सुलभ व्हावे या उद्देशाने अ‍ॅप सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावर १ आॅगस्टपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकायचा आहे.राज्य माध्यमिक मंडळाकडे असलेला सर्व तपशील येईल. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

11th Admission Pune, Mumbai, Nagpur, Amravati, Nashik, Aurangabad is now started from 1st July 2020. The Timetable of 11th Admission & round Details are given here. Just go through the given Schedule of 11th Admission 2020. The Registration process For Collges is now begin. For updates & Online Application Forms keep visiting us.

‘कोरोना’ मुळे इयत्ता १०वीचा निकाल उशीरा लागणार असल्याने यंदा केंद्रीय पद्धतीने ११वी प्रवेश करू नयेत, ऑफलाईन प्रवेशास मान्यता द्यावी अशी मागणी शिक्षण संस्थांनी लावून धरली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण विभागाने ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dydepune.com व इ .११वी ऑनलाईन प्रवेशाच्या https://pune.11thadmission.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सोर्स: लोकमत

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!💬