उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांची भरती होणार – Professor Bharti 2023

Maharashtra Professor Bharti 2023 Details, Vacancy Details, Pay Scale

Maharashtra Professor Bharti 2023

As per the latest update about Assistant Professor Bharti is that – After Corona, the state government has started recruitment for various posts. Advertisement is being given for various posts under ‘MPSC’. Assistant Professors will be recruited for various departments under the Higher and Technical Education Department. Also, the demand letter for 94 posts has also been given. However, despite this, the advertisement has not come yet. Therefore, there is dissatisfaction among the aspirants. Many candidates have qualified NET, SET exam which is required for the post of Assistant Professor. However, they are unsettled as the advertisement is not coming. Candidates Read the complete details given below on this page regarding the Professor Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मागणीपत्र असूनही सहाय्यक प्राध्यापक पदाची जाहिरात नाही ‘एमपीएससी’चे दुर्लक्ष

राज्य सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) विविध पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मागणीपत्र मिळाल्यानंतरही जाहिरात आलेली नाही. करोनानंतर राज्य शासनाने विविध पदांची भरती सुरू केली आहे. ‘एमपीएससी’च्या कक्षेतील विविध पदांसाठी जाहिरात दिली जात आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांसाठी सहाय्यक प्राध्यापकांची भरती होणार आहे. तसेच ९४ पदांचे मागणीपत्रही देण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही अद्याप जाहिरात आली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी नेट, सेट परीक्षेची पात्रता अनेक उमेदवारांकडे आहे. मात्र, जाहिरात येत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.


Chief Minister Eknath Shinde taking the decision in Cabinet meeting regarding the professor bharti in various technical university in the state. The decision to create 105 posts of professors in the government engineering colleges & pharmaceutical degree and post-graduate colleges in the state as well as in Dr. Babasaheb Ambedkar Technical University  in Lonere will be taken in the Cabinet meeting.
Grade Pay These posts will be of Grade Pay Rs. – 7600/- or above. It will have various posts like Principal, Professor, Associate Professor, Head of Department, Vice-Chancellor, Director etc., Due to this, the recruitment of professors and other posts will be done soon. Colleges of Engineering and Pharmacy had been requirement for vacancies for many years. Also, many interested letter holders had given a statement to the government for recruitment. After that, the government will create the post and soon the recruitment will be done. Candidates Read the complete details given below on this page regarding the Professor Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती, पात्रताधारकांसाठी आनंदवार्ता

 • राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 • बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील पदभरतीला गती येणार आहे. यामुळे हजारो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
 • ग्रेड वेतन ७६०० किंवा त्यापेक्षा जास्त ग्रेड वेतनाची ही पदे असतील. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक अशी विविध पदे असतील. यासाठी २३ कोटी ५२ लाख खर्चास मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच प्राध्यापक आणि अन्य पदांची भरती होणार आहे.
 • अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण महाविद्यालयात अनेक वर्षांपासून रिक्त पदांची ओरड होती. तसेच अनेक इच्छुक पत्रधारकांनी सरकारला पदभरतीसाठी निवेदन दिले होते. त्यानंतर आता शासनाने पदनिर्मिती करून लवकरच पदभरती होणार आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

Professor Bharti in various universities in Maharashtra updates is here. At present, the procedure is that no one can remove a candidate till he joins the job or retires (60 years). But, as per the new National Education Policy, the appointment of professors in higher colleges and universities will be for five years for the first time. After that, they will get further promotion, gradation only after taking the account of their work in five years. Those with good performance can also be replaced after five years.

सध्या एखादा उमेदवार नोकरीला लागला की सेवानिवृत्त (६० वर्षे) होईपर्यंत, त्याला कोणीच हटवू शकत नाही, अशी कार्यपद्धत आहे. पण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च महाविद्यालयांसह विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती पहिल्यांदा पाच वर्षांसाठीच असणार आहे. त्यानंतर पाच वर्षांतील त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेऊनच त्यांना पुढे प्रमोशन, ग्रेडेशन मिळणार आहे. सुमार कामगिरी असलेल्यांना पाच वर्षानंतर बदलता देखील येणार आहे.

केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या वर्षीपासून महाराष्ट्रातील १३ अकृषिक विद्यापीठांसह संलग्नित तीन हजार ३४१ उच्च महाविद्यालयांमध्ये लागू केले जाणार आहे. त्यानुसार तीन वर्षांची पदवी आणि दोन वर्षांची पदव्युत्तर पदवीची प्रचलित पद्धत बंद करण्यात आली आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता सुरवातीला चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असेल.

तत्पूर्वी, पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यास दुसऱ्या शाखेतील काही विषय देखील घेण्याची मुभा आहे. तसेच चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर थेट पीएच.डी करता येणार आहे. दरम्यान, आता प्राध्यापकाची भरती नेट-सेटवरून होणार आहे. यापुढील प्राध्यापक नियुक्ती सेवानिवृत्तीच्या ६० वर्षांपर्यंत नसणार आहे. प्रत्येक पाच-पाच वर्षांच्या टप्प्यावर त्यांचे मूल्यमापन होईल. त्यानुसार त्यांची नियुक्ती पुढील काळासाठी असणार की नाही, हे ठरणार आहे.

नेट-सेट झालेल्यांनाही प्राध्यापकाची संधी

सध्याच्या प्रचलित निकषांनुसार महाविद्यालयांवर नियमित सहायक प्राध्यापक होण्यासाठी नेट, सेट होऊनही ‘पीएच.डी’ आवश्यकच आहे. पण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च महाविद्यालय किंवा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या अध्यापनासाठी नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्यांनाही प्राध्यापक होण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर पुढील पदोन्नतीसाठी तो उमेदवार पीएच.डी करू शकणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता प्राध्यापकांची नेमणूक पाच वर्षांसाठीच असेल. त्यानंतर उत्पादन आधारित (प्रॉडक्ट बेस्‌ड) पदोन्नती मिळेल. तत्पूर्वी, पाच वर्षांतील त्यांचे संशोधन, अध्यापन, वर्गाचा निकाल, नोकरी व व्यवसायातील मुलांचे यश, अशा बाबींचा विचार होईल. त्यावरून त्यांचे प्रमोशन की डिमोशन ठरणार आहे. – डॉ. शिवकुमार गणपूर, संचालक, परिक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

अकृषिक विद्यापीठांची स्थिती

 1. १३ – अकृषिक विद्यापीठे
 2. ३,३४१ – उच्च महाविद्यालये
 3. २५,६०० – एकूण प्राध्यापक
 4. १५,५०० – अंदाजे रिक्त पदे

Professor Bharti 2023- A big decision has been taken by the state government. Therefore, the professors working on hourly basis in the state will get a big relief. The salary of teachers working on hourly basis has been increased. Meanwhile, CHB professors have welcomed the decision to increase the remuneration from Rs 600 to Rs 1,000/-. Taking into account the adverse effect on the academic interest of the students and the administrative affairs of the college, the finance department has approved the filling of the posts of assistant professor, principal, director of physical education, librarian and the information that these posts will be filled, Minister for Higher and Technical Education Chandrakant Patil informed the Assembly through a statement. Minister Chandrakant Patil said, the finance department has approved the recruitment of 2,088 Assistant Professor posts by relaxing the restrictions. Accordingly this recruitment process has been started.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Professor Salary :

 •  उच्च शिक्षण संचालनालय : 
  •  कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.६२५ वरुन रु.१ हजार प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.७५० वरुन रु. १ हजार प्रति तास.
  • शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. ७५० वरुन रु.१ हजार प्रति तास.
 •  तंत्र शिक्षण संचालनालय : 
  •  उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. १ हजार वरुन रु. १ हजार ५०० प्रति तास
  • पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. ६०० वरुन रु. १ हजार प्रति तास
  • पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. ५०० वरुन रु.८०० प्रति तास.
 •  कला संचालनालय : 
  •  उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. ७५० वरुन रु.१ हजार ५०० प्रति तास.
  • कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. ६२५ वरुन रु.१ हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

महाविद्यालयांमधील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. दरम्यान, 600 रुपयांवरून 1 हजार रुपये मानधनवाढीच्या निर्णयाचे सीएचबी प्राध्यापकांनी स्वागत केले आहे. दहा वर्षांपासून नियमित प्राध्यापक भरती झालेली नाही. महाविद्यालयांत तासिका व कंत्राटी प्राध्यापक तुटपुंज्या मानधनावर काम करीत असून, यामध्ये वाढ करावी, अशी त्यांची मागणी होती. काही दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेतून कंत्राटी प्राध्यापकाने आत्महत्या केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.


Maharashtra Professor Bharti 2023– Professor recruitment process will be completed soon. The government has approved the recruitment of 2 thousand 88 professor posts in the first phase in the state and out of these nearly 1100 posts have been given no objection certificate by the Higher and Technical Education Department. This recruitment process will be completed before the end of the current academic year, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil told the Assembly.

 राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

 • विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागावर चर्चा झाली. यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिली.
 • उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. राज्यातील 148 महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांना शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे राज्याचे भविष्य आहेत. यांना समान वागणूक मिळाली पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. विज्ञान नगरी प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत शासन सकारात्मक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे.
 • मंत्री श्री. महाजन म्हणाले, क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्या देशाच्या, राज्याच्या प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. त्यामुळे खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा पुरस्कार रकमेत जवळपास पाच पट वाढ केली आहे.
 • आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यात येणार असून यासाठी निधीची उपलब्धता केली आहे.
 • मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. आशा सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

Professor Bharti 2023 : As per the news source the 822 posts of professors are vacant in Maharashtra various educational institute. More than 60% of the posts of professors in Maharashtra are vacant, and the education system in the colleges has completely collapsed. The serious matter is that as many as 822 subsidized professorships in Pune, Nagar and Nashik districts affiliated to Savitribai Phule Pune University are vacant, and the number of vacant posts of all types is in a few thousand, according to education experts.

The state government announced the recruitment, but there is a discrepancy in the actual action. Senior administrative officer while giving information said, “The number of vacant posts of all kinds of professors in all the three districts is more than 10,000. The number of non-teaching staff is also decreasing rapidly.” Inadequate manpower to implement the provisions of the four-year degree, interdisciplinary education system and the new education policy will surely prove fatal.

महाराष्ट्रात प्राध्यापकांची ८२२ पदे रिक्त

महाराष्ट्रातील प्राध्यापकांची ६० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असून, महाविद्यालयांतील शैक्षणिक डोलारा पूर्णतः कोसळला आहे. गंभीर बाब म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील तब्बल ८२२ अनुदानित प्राध्यापकांची पदे रिक्त असून, सर्वच प्रकारच्या रिक्त पदांची संख्या काही हजारांत असल्याची माहिती शिक्षण तज्ज्ञांनी दिली आहे.

Professor Recruitment 2023 in Maharashtra

विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. संदीप पालवे यांनी यासंबंधीचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना विद्यापीठाने ही आकडेवारी घोषित केली आहे. मागील १२ वर्षांपासून प्राध्यापकांची भरती प्रक्रिया खंडित झाली असून, रिक्‍त पदांमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबतीत महाविद्यालयांची प्रचंड ओढाताण होत आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेला तिलांजली दिली जात आहे. राज्य सरकारने भरतीची घोषणा केली मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीत तफावत दिसत आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी माहिती देताना म्हणाले, ”तीनही जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या प्राध्यापकांची रिक्त पदांची संख्या १० हजारांपेक्षाही जास्त आहे. त्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे.” चार वर्षांची पदवी, आंतरविद्याशाखीय शिक्षा प्रणाली आणि नवीन शैक्षणिक धोरणांच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अपुरे मनुष्यबळ निश्चितच घातक ठरणार आहे.

 • परिणाम काय?
  – अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया पूर्णतः कोलमडली
  – प्राध्यापकांवर प्रशासकीय कामे करण्याची वेळ
  – तात्पुरत्या स्वरूपात आणि अत्यंत कमी पगारात प्राध्यापकांची नेमणूक
  – अध्यापनाबरोबरच संशोधन प्रक्रियाही खंडित
  – शिक्षणाचा दर्जा ढासळला, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले
  – प्राध्यापकांना विविध ताणतणावाचा सामना करावा लागत आहे
  – नवीन शैक्षणिक धोरण राबविणार कसे, हा मोठा प्रश्न

Pune University Professor Bharti 2023

विद्यापीठातही भीषण स्थिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ४२ विभागांमध्ये तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. यासंबंधी डॉ. योगेश भोळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठाचा प्रशासन शिक्षक विभाग म्हणतो, ”सर्व विभागांमध्ये आवश्यक असणारी कायम स्वरूपाच्या जागा पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. पदभरतीसाठी सरकारी मान्यता प्राप्त झाली असून, भरती प्रक्रियेची कार्यवाही चालू आहे.”

Vacancy Details in Pune University Bharti 2023

विद्यापीठ विभागांतील रिक्त पदे
पदे ः                      एकूण पदे ः रिक्त पदे
प्राध्यापक ः              ७०       ः  ५६
सहयोगी प्राध्यापक ः ११७     ः ८२
सहायक प्राध्यापक ः १९६      ः ७६
एकूण ः                   ३८३      ः २१४

 • नवीन शैक्षणिक धोरणाचे सोडा, साधे नियमित अध्ययन आणि अध्यापनही रिक्त पदांमुळे प्रभावित झाले आहे. महाविद्यालयांत अभ्यासक्रमही नीट शिकविता येत नाही. हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, सरकारकडून सातत्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रभावी शिक्षकांची नवी पिढीच यामुळे तयार होत नाही. – प्रा. डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
 • सरकारने २०२१ मध्ये निर्गमित केलेल्या अध्यादेशानुसार २०२२-२३ पर्यंत ही पदे भरणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही ही पदे रिक्त आहे. शिक्षकेतर कर्मचारीही कमी झाले असून, प्राध्यापकांना सर्वच प्रकारचा ताण सहन करावा लागत आहे. शैक्षणिक कामगिरीवर याचे विपरीत परिणाम होत असून, तातडीने प्राध्यापक भरती करणे आवश्यक आहे. – डॉ. संदीप पालवे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Maharashtra Professor Bharti 2023: Latest updates regarding Professor Bharti 2023 is that Open the way for recruitment of assistant professors; Approval of Finance Department for recruitment of 40% Assistant Professors out of vacant posts. Higher and Technical Education Minister Chandrakant Patil informed that the process of issuing the No Objection Certificate required for the post recruitment is also underway.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वित्त विभागाने रिक्त पदांपैकी ४० टक्के सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) भरतीसाठी मान्यता दिली आहे. पद भरतीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाहीही सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

२०८८ सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथील केले असून ही भरतीही लवकरच केली जाईल. यामध्ये सेट, नेट, पीएचडी, एम फील झालेल्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक पदांना मान्यता घेऊन पुढील महिन्यात ही पदभरती केली जाणार आहे. महादेव जानकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. सहायक प्राध्यापकांच्या ३५८० पदांना उच्चस्तरीय समितीने स्थगिती उठवून मंजुरी दिलेली आहे. यातील १९४९२ पदे भरण्यात आलेली आहेत. शिवाय २१९ पदांच्या भरतीस शासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

Professor Bharti 2022- Latest updates regarding Maharashtra Professor Bharti 2022 is that There are more than 11,000 vacancies for professors in central universities, Indian Institutes of Technology (IITs) and Indian Institutes of Management (IIMs) across the country, according to the Ministry of Education data.

देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये (आयआयएम) प्राध्यापकांच्या ११ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीत समोर आली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या १८,९५६ मंजूर पदांपैकी एकूण ६,१८० पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आयआयटीमध्ये ११,१७० मंजूर पदांपैकी एकूण ४,५०२ पदे रिक्त आहेत, तर आयआयएममध्ये एकूण १,५६६ प्राध्यापकांपैकी ४९३ पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी उत्तरात म्हटले आहे.

रिक्त पदे निर्माण होणे व त्यांची भरती करणे ही एक निरंतर व सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. केंद्रीय विद्यापीठे या स्वायत्त संस्था असून केंद्रीय कायद्यांच्या अंतर्गत त्यांची स्थापना झाली आहे. या कायद्यांच्या आधारेच त्यांच्या भरती प्रक्रियेचे स्वरूप आखण्यात आले आहे. यासाठी अन्य नियम व विद्यापीठ अनुदान आयोगाचेही काही नियम आहेत. या सर्व गोष्टींच्या आधारे ही भरती केली जाते, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना ‘मिशन मोड’मध्ये रिक्त पदे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या भरतीसाठी मंत्रालयाने मासिक देखरेख यंत्रणा स्थापन केली आहे, असेही ते म्हणाले. द सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स (रिझर्व्हेशन इन टीचर्स केडर) अॅक्ट, २०१९ हा कायदा ९ जुलै २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला. या कायद्यानुसार सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना आरक्षण लागू आहे. परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेल्या संस्थांचा यास अपवाद आहे, असेही प्रधान म्हणाले. शिक्षकांच्या श्रेणीतील सर्व पदांच्या थेट भरतीमध्ये या कायद्यानुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे आणि एकदा आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर या कायद्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

९६१ पदे एससी प्रवर्गासाठी

केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयएममधील रिक्त पदांपैकी ९६१ पदे एससी प्रवर्गासाठी, ५७८ एसटी प्रवर्गासाठी, १,६५७ ओबीसी पदे राखीव आहेत. आर्थिक मागास वर्गासाठी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीसाठी राखीव रिक्त पदे अनुक्रमे ६४३ आणि ३०१ पदे राखीव आहेत. देशात २३ आयआयटी आहेत तर ‘आयआयएम’ची संख्या २० आहे.


Professor Bharti 2022- Latest updates regarding Professor Bharti 2022 is that In the state, 25 percent of professors i.e. 2 thousand 88 posts out of total eight thousand posts have been approved. Soon 2 thousand 88 posts will be recruited in the state.

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त आठ हजार पदांपैकी २ हजार ८८ जागा भरण्यास मान्यता दिली आहे. या भरतीनंतर आढावा घेऊन उर्वरित जागा भरतीस मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Professor Bharti 2022

मराठवाडा विद्यापीठास शुक्रवारी (ता. नऊ) चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे आदींची उपस्थिती होती. श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणीपासून छात्रवृत्ती देणे, उच्चशिक्षणाचा नवीन आकृतिबंध मातृभाषेतून शिक्षण यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.


As per the information received from news source the thousands of posts of Assistant Professors are vacant in the state. The Senior Official in the Education Sector said the approved posts of professors in colleges have started to be filled and the work is going on to speed it up. Also, Senate elections are going on in the state universities. Therefore, the vacancies in the university will be filled in the next 6 months There were 8 thousand 949 vacant posts of assistant professors in the colleges of the state as per the pattern of 2017. According to the government decision in the year 2018, permission was given to fill 3 thousand 580 posts. 1492 of them were filled in the before Corona period. Remaining 2 thousand 88 posts are being filled. Also, according to the pattern of 2019, 1 thousand 166 posts are vacant in non-agricultural universities of the state, and permission has been given to fill 659 posts in 2019. Read the more details below and keep visit us for the further updates.

 1. राज्यात एकीकडे सहायक प्राध्यापकांची हजाराे पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे पात्रता मिळवलेले हजाराे युवक अत्यंत तुटपुंज्या पगारात कंत्राटी, तासिका तत्त्वावर राबत आहेत. या कंत्राटी प्राध्यापकांच्या जिवावर शिक्षण क्षेत्राचा गाडा ओढला जात आहे.
  राज्यातील महाविद्यालय आणि अकृषी विद्यापीठात साडेआठ हजार सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिक्षणातून देशाची नवी पिढी घडविण्याचे काम करणारे उच्चशिक्षित प्राध्यापकच शाेषणाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत, नव्या पिढीचे भविष्य घडवणार कसं, अशी व्यथा तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी मांडली.
 2. पदे भरण्यास दिरंगाई – राज्यातील महाविद्यालयात २०१७ च्या आकृतिबंधानुसार सहायक प्राध्यापकांच्या ८ हजार ९४९ जागा रिक्त हाेत्या. सन २०१८ मधील शासन निर्णयानुसार ३ हजार ५८० पदे भरायला परवानगी मिळाली. त्यातील १४९२ पदे काेराेनापूर्व काळात भरण्यात आली. उर्वरित २ हजार ८८ पदे भरण्यात येत आहेत. तसेच राज्यातील अकृषी विद्यापीठात २०१९ च्या आकृतिबंधानुसार १ हजार १६६ पदे रिक्त असून, २०१९ मध्ये ६५९ जागा भरावयास परवानगी मिळाली आहे. त्यातील एकही जागा अद्याप भरलेली नाही. शासनाने चार वर्षांपूर्वी मंजूर केलेली पदे भरण्यास दिरंगाई हाेत असल्याने असंख्य पात्रताधारक उच्चशिक्षित मिळेल त्या पगारात वर्षानुवर्षे राबत आहेत.
 3. सहा महिन्यांत भरती – महाविद्यालयातील मंजूर पदे भरण्यास सुरुवात झाली असून, त्याला गती देण्याचे काम सुरू आहे. तसेच राज्यातील विद्यापीठात सिनेटच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे विद्यापीठातील रिक्त जागा पुढील सहा महिन्यांत भरल्या जातील, अशी माहिती शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Professor Bharti 2022- Along with Savitribai Phule Pune University, 14 art universities in the state and government approved universities will get assistant professors. The state government has approved the recruitment of 80 percent of the vacant professorships i.e. 659 posts in these universities and these posts will be filled soon.

राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील मंजूर असलेल्या शिक्षक आणि शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदे भरती करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विविध विद्यापीठांमधील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला असला तरीही प्रत्यक्षात एकूण एक हजार १६६ जागा रिक्त आहेत. त्यातील ६५९ जागा भरण्यासाठी मान्यता मिळाली असून उर्वरित ५०७ जागा रिक्त राहणार आहेत.

घटनाक्रम –

 • – राज्य सरकारने २५ मे २०१७ च्या निर्णयानुसार सर्व विभागांतील पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर होईपर्यंत बंदी घातली होती.
 • – त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली अकृषी विद्यापीठातील शिक्षकीय पदांचा आकृतीबंध सुधारित करण्याची कार्यवाही सुरू झाली
 • – या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव विद्यापीठांमधील अनेक पदे रिक्त झाली.
 • – शासनाने नेमलेल्या उपसमितीच्या १६ जुलै २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत १५ अकृषी आणि अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर पदांच्या ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता मिळाली.
 • – उपसमितीने दिलेल्या मंजुरीनुसार ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यात सरकारने मान्यता दिली
 • – त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत वित्त विभागाने पदभरतीवर निर्बंध आणले

त्यामुळे ही पदे मान्य होऊनही भरता आली नाहीत.

 • – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुन्हा वित्त विभागास सादर करण्यात आला
 • – त्याअनुषंगाने वित्त विभागाने स्थापन केलेल्या उपसमितीच्या १८ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला
 • – बैठकीत उपसमितीने ६५९ पदे भरण्यास मंजुरी दिली.
 • – आता राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे आणि सरकार मान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या शिक्षक व शिक्षक समकक्ष अशा एकूण ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिल्याचा अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला आहे.

मान्यता मिळालेल्या पदांची संख्या –

विद्यापीठाचे नाव : मंजूर पदे : रिक्त पदे : भरतीस मान्यता मिळालेली पदे

 • मुंबई विद्यापीठ : ३७८ : २११ : १३६
 • एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई : २५८ : १२९ : ७८
 • कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक : ४३ : २१ : १२
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : ३३९ : १६० : ९२
 • गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : ४३ : २० : ११
 • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : ४६ : १६ : ०७
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : २६२ : १२४ : ७२
 • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ४०० : १९१ : १११
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद : २७२ :१२८ : ७३
 • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : १११ : २८ : ०६
 • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : १६७ : ५४: २१
 • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : १२१ : ३७ : १३
 • डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे : ५३ : २५ : १४
 • गोखले अभिमत विद्यापीठ, पुणे : २४ : १३ : ०८
 • टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, पुणे : १७ : ०९ :०५

Professor Bharti 2022: : Latest updates regarding Maharashtra Professor Bharti 2022 is that There are 1297 vacant posts of Assistant Professor in Kolhapur Division and only 463 posts are approved by the government. According to the government decision dated 3rd November 2018, only 463 posts of professors in Kolhapur division will be filled. Read More details are given below.

प्राध्यापकांच्या ४६३ जागा भरण्यास मंजुरी 

कोल्हापूर:  प्राध्यापक भरतीच्या अनुषंगाने उच्चशिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालकांना आदेश दिल्याने प्राध्यापक भरतीस आता गती मिळाली आहे. परंतु, कोल्हापूर विभागात साहाय्यक प्राध्यापक पदाच्या 1297 जागा रिक्त असून फक्त 463 जागा भरण्यास शासन मान्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या अडचणीत भर पडणार आहे.
 • राज्यभरातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या सुमारे 15 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक पदांची भरती झाली नसल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. दुसरीकडे सीएचबी प्राध्यापकांवरील ताण वाढत चालला आहे.
 • प्राध्यापकांची रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली, तरीही दोन वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडली आहे. प्राध्यापकांच्या रिक्त व पदभरतीच्या मंजूर जागा यांचा ताळमेळ नाही. मागील काही वर्षांत महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक निवृत्त झाले आहेत. या जागादेखील सरकारने अद्याप भरलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत सापडले आहे.
 • दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 2017 च्या पटसंख्येनुसार प्राध्यापकांच्या 2 हजार 88 जागा भरण्यास मंजुरी दिली आहे. 3 नोव्हेंबर 2108 च्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर विभागातील केवळ 463 प्राध्यापकांची पदे भरण्यात येणार आहेत.
 • महाविद्यालयांकडून 31 ऑक्टोबरपर्यंत आवश्यक सर्व कागदपत्रांसह पदभरती ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव मागवून घेऊन त्यावर कार्यवाही करावी, असे आदेश उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी नुकतेच सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.
 • कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे महाविद्यालयांचे येणारे प्रस्ताव तपासून पुणे कार्यालयामार्फत राज्य शासनास पाठविले जात आहेत.

Professor Bharti 2022– Latest updates regarding Professor Bharti 2022 is that Two thousand professors will be recruited. Candidates Read the complete details given below on this page regarding the Professor Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

प्राचार्यांच्या शंभर टक्के पदांना मंजुरी; दोन हजार प्राध्यापकांची भरती करणार

राज्यात २०१७मध्ये झालेल्या प्राध्यापक भरतीच्या आढाव्यानुसार प्राध्यापकांच्या आठ हजार जागा रिक्त होत्या. त्यापैकी २,०८८ पदांना पुन्हा आढावा न घेताच मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा भरतीचा आढावा घेऊन आणखी दोन हजार पदे भरली जातील,’ असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘पुणे सुपरफास्ट’ या उपक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर पाटील यांनी पुण्यातील नामांकित शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधला. ‘प्राध्यापक भरतीसंदर्भात राज्य सरकार कोणतेही वेळकाढूपणाचे धोरण राबवत नसून, सर्व महाविद्यालये, विद्यापीठांना गरजेप्रमाणे प्राध्यापक दिले जात आहेत; शिवाय राज्यातील एकही महाविद्यालय प्राचार्यांशिवाय असू नये, असे स्पष्ट करण्यात आले असून, प्राचार्यांच्या शंभर टक्के पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात प्राध्यापक भरतीचा आढावा झाल्यानंतर आणखी प्राध्यापकांची भरती केली जाईल आणि त्यासाठी निधीची तरतूदही होईल,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

खासगी महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीसंदर्भातही त्यांनी शिक्षण तज्ज्ञांना उद्देशून काही मुद्दे मांडले. ‘खासगी महाविद्यालयांत शिकणाऱ्या आरक्षित प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांचे ८० टक्के शुल्क राज्य सरकार देते. यामुळे या महाविद्यालयांनी चांगल्या प्राध्यापकांची भरती करण्यास काहीच अडचण नाही. त्यांनी आपल्या स्तरावर प्राध्यापकांची भरती करून ही समस्या सोडवावी,’ असे आवाहन पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे निवेदन ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहसंपादक सिद्धार्थ केळकर यांनी केले. वृत्त संपादक श्रीपाद ब्रह्मे यांनी आभार मानले.

‘शिष्यवृत्तीच्या शुल्काचा प्रश्न मार्गी लावणार’

‘खासगी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ८० टक्के शुल्क राज्य सरकारकडून मिळते. हे शुल्क काहीसे उशिराने मिळते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, याबाबत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, शिष्यवृत्तीची सरकारकडून दिली जाणारी रक्कम लवकरात लवकर महाविद्यालयांपर्यंत पोहोचवली जाईल,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


Professor Bharti 2022: Latest updates regarding Maharashtra Professor Bharti 2022 is that Approval has been given to fill up the vacant posts in the cadre of Principal and Assistant Professor in non-government aided colleges. Vacancies in this cadre will be filled soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Professor Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

प्राचार्य व सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता- GR जाहीर

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय क्र आढावा१५१३/प्र.क्र.१२५(भाग-८)/म.शि.५ दि. १२.११.२०२१ अन्वये अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील प्राचार्य व सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत संचालनालयाच्या संदीय पत्रान्वये वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत.

Professor Bharti 2022

तरी याबाबत पुनश्च: कळविण्यात येते की, दिनांक ३१.१०.२०२२ पर्यंत आवश्यक सर्व कागदपत्रांसह पदभरती ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव विहीत पध्दतीने निश्चितपणे प्राप्त होतील यास्तव कार्यवाही करावी अन्यथा संबधित महाविद्यालय पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागणीकरीता इच्छूक नसल्याचे ग्राहय धरण्यात येऊन संबधित महाविद्यालयास पदभरतीसाठी अनुज्ञेय करण्यात आलेली पदे, पदभरतीसाठी मागणी केलेल्या अन्य महाविद्यालये/ संस्थांना वर्ग करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात येईल. ही बाब सर्व सबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.


Professor Bharti 2022:  Latest updated regarding Professor Bharti is that 16 thousand posts of assistant professor posts are vacant in senior colleges and also 400 vacancies for Assistant Professor posts in Aurangabad. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Professor Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 • राज्यात वरिष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक ‎पदांच्या तब्बल १६ हजार, तर औरंगाबादेत ४०० जागा रिक्त‎ आहेत. शासनाकडून भरती केली जात‎ नसल्याने या जागांवर सध्या २० ते २४‎ हजार सहायक प्राध्यापकांवर तासिका‎ तत्त्वावर (सीएचबी) अध्यापन करण्याची‎ वेळ आली आहे.
 • उच्च शिक्षण घेऊनही‎ अनेक प्राध्यापकांची आर्थिक परिस्थिती‎ बिकट झाली आहे. २०१९ नंतर प्राध्यापक‎ भरती न झाल्याने नेट-सेट, पीएचडी‎धारक संघर्ष समिती पुन्हा आक्रमक झाली‎ आहे.‎ १०० टक्के भरती प्रक्रिया करावी,‎ सीएचबी म्हणजेच तासिका तत्त्वाचे धोरण‎‎ कायमस्वरूपी बंद करून समान काम,‎ समान वेतन मिळण्यासाठी समितीने‎ न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केली‎ आहे.
 • याप्रकरणी लवकरच औरंगाबाद‎ खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समितीने दिली‎. अनेक प्राध्यापकांचे वय ४५ ते ५०‎ च्या दरम्यान झाले. तरीदेखील प्राध्यापक‎ होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.‎ संपूर्ण आयुष्य तासिका तत्त्वावर जाणार‎ की काय, याची चिंता आता‎ प्राध्यापकांना लागली आहे.‎
 • प्राध्यापकांच्या या सर्व अवस्थेला‎ सरकारी निर्णय जबाबदार असल्याचे‎‎ संघटनांचे म्हणणे आहे.‎ एका बाजूला प्राध्यापक भरती बंद आणि एका वर्षात नेट-सेटच्या दोनदा परीक्षा‎ घेतल्यामुळे बेरोजगारीचे प्रश्न वाढले आहेत.‎ नोव्हेंबर २०२१ मध्ये तत्कालीन उच्च व‎ तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी‎ राज्यात प्राचार्यांसह प्राध्यापकांची २ हजार ८८ पदे भरण्यास मान्यता दिली हाेती.

माने समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष‎

उच्च शिक्षण‎ संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू डॉ.‎ अरुण अडसूळ, प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांसह इतर‎ सदस्यांचा समावेश असलेल्या माने समितीची स्थापना केली. तासिका तत्त्व धोरणाबाबत तयार केलेला‎ माने समितीचा अहवाल अद्यापही शासनदरबारी पडून‎ आहे. त्यावर निर्णय घेतला‎ नाही. तसेच १९ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या मंत्रालयीन बैठकीमध्ये‎ अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती व ३ नोव्हेंबर २०१८ च्या‎ निर्णयानुसार ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची‎ १००% भरतीचा निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरही कार्यवाही नाही.

फक्त इमारती उरतील

 • एकीकडे दर्जेदार शिक्षण मिळावे, असा आग्रह केला जातो. मात्र, दुसरीकडे गेल्या आठ-दहा वर्षांपासून शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडली आहे.
 • विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना काही पदे मंजूर केली. परंतु, ती भरली नाहीत.
 • आजही अनेक जागा रिक्त आहेत.
 • त्यामुळे गुणवत्तेवर आणि पात्रताधारक प्राध्यापकांवर याचा परिणाम होत आहे.
 • रिक्त पदे भरली नाही तर आगामी काळात खूप मोठे नुकसान होईल.
 • त्यानंतर विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या केवळ इमारतीच राहतील. -डॉ. तुकाराम सराफ, भारतीय विद्यार्थी सेना विद्यापीठ प्रमुख

Professor Bharti 2022-  : Latest updated regarding Professor Bharti is that 517 vacancies of Professor in IIT Mumbai and 4596 vacancies across the country are vacant. due to vacant posts Vacancies are affecting the education of students. Candidates Read the complete details given below on this page regarding the Professor Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 आयआयटी मुंबई अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था ही जगात आणि आशिया खंडात नावाजलेली उच्च शिक्षण संस्था IIT Mumbai आहे. या संस्थेमधून हजारो विद्यार्थी घडले. देशात विदेशात आपल्या ज्ञानाने योगदान देत आहेत. तसेच अनेक प्राध्यापक देखील या ठिकाणी शिकले आणि पुढील पिढीला ज्ञान देण्याचे काम अनुसरीत आहे. मात्र आता याच भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था अर्थात आयआयटी बॉम्बे येथे 517 प्राध्यापकांच्या जागा (517 vacancies of professors in IIT) तर देशात ४,५९६ जागा (4596 vacancies of professors across the country) अद्यापही रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणावर परिणाम होत आहे. ही बाब संसदेच्या एका अहवालामधून समोर आली आहे. देशाचे शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी दिलेल्या माहितीमध्ये ही बाब उघड झालेली आहे.

विश्वगुरु बनण्याची अट देखील अपूर्ण –

 देशामध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या संदर्भात 23 तंत्रज्ञान संस्था आहे. आयआयटी या संस्था 1961 च्या अधिनियमानुसार कार्यरत आहेत. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भारताची दैदिप्यमान सुरुवात केली. त्यामुळे तंत्रज्ञानाची जी प्रगती देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये झाली आहे. त्याची पायाभरणी देशातील आयआयटीमुळे निश्चित झाली. मात्र, आता त्याच भारतीय तंत्रज्ञान संस्थांना घरघर लागली आहे, असं म्हणण्याची पाळी आलेली आहे.

देशभरातील या 23 उच्च तंत्रज्ञानातील एकूण ४५९६ प्राध्यापकांच्या जागा अद्यापही भरलेल्या नाहीत. यामध्ये आयआयटी बॉम्बे दुसऱ्या स्थानावर आहे. येथे 517 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. तर आयआयटी खरगपूर सर्वोच्च स्थानावर म्हणजे 798 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर आयटी मद्रासचा क्रमांक लागतो, येथेही 482 तर कानपूर येथील आयआयटीमध्ये 382 तर आयटी रुरकी या ठिकाणी 419 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. इतर उच्चतंत्रज्ञान संस्थांमध्ये देखील या खालोखाल प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. एकूण अश्या २३ तंत्रज्ञान संस्थांमध्ये देशभरात 4,596 प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाचे काय ? हा मोठा मूलभूत प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने आव्हान म्हणून उभा ठाकला आहे.

मागासवर्गीय पदे बहुतांशी रिक्त –

 आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये अनुसूचित जातीसाठी 15 टक्के, अनुसूचित जमातीसाठी सात टक्के आणि ओबीसीसाठी 27 टक्के मानक प्रमाण ठरलेले आहे. मात्र या पदांपेक्षाही अत्यंत कमी मागासवर्गीय प्राध्यापकांची पदे भरली गेलेली आहेत. त्यावरून लक्षात यावे की, मागासवर्गीयांच्या संदर्भात आरक्षण रोस्टर पालन होत (vacancies of professors across the country) नाही.

ईटीव्ही भारतवतीने अखिल भारत शिक्षा अधिकार मंचाचे सचिव प्रा.डॉ. विकास गुप्ता (दिल्ली विद्यापीठ) यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, देशामध्ये उच्च तंत्रज्ञान संस्थांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी भटके विमुक्त या प्रवर्गातील पदांची भरती सहसा केली जात नाही. दोन वर्षापूर्वी देशामध्ये अनुसूचित जातीचे केवळ 119 तर अनुसूचित जमातीचे फक्त 21 एवढेच प्राध्यापक होते. त्यामुळे या रिक्त हजारो पदांमध्ये बहुसंख्य पद याच प्रवर्गातील असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही कृती म्हणजे समान संधी राज्यघटनेतील मूल्यांचे उल्लंघन ठरते.

प्रयोगशाळा व पायाभूत सुविधा असणे आवश्यक – 

यासंदर्भात, आयआयटी मुंबईचे संचालक सुभाषिस चौधरी यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्यांनी या संदर्भात भूमिका मांडली की, जर संशोधन विद्याशाखेबद्दल आपण म्हणत असाल तर 517 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच प्रत्येक विद्या शाखेसाठी आमच्याकडे 35 वर्षाच्या उत्पादनक्षम कारकिर्दला समर्थन देण्यासाठी अनेक सोयी सुविधा असायला हव्यात. त्यासाठी प्रयोगशाळा व पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या सोबत प्राध्यापकांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने सुद्धा गुंतवणूक जरुरी आहे. आयआयटीमध्ये सतत देशाच्या संदर्भात संशोधन आणि अध्यापन ही बाब उद्योजकतेच्या बाबतीत आयटीला पुढे नेत असते. आम्ही आमच्या मर्यादानुसार दरवर्षी 30 ते 50 प्राध्यापकांची भरती निश्चित करू शकतो, असं त्यांनी अधोरेखित (vacancies of professors in IIT Mumbai) केलं.


Professor Bharti 2022: Latest updated regarding Professor Bharti is that 2 thousand 72 professorships will be filled soon in Maharashtra according to higher and technical education. The recruitment of professors was stopped for many years. Now due to this new recruitment the eligible candidates will get a big relief. Read More details about Professor Bharti 2022 are give below.

राज्यात लवकरच 2 हजार 72 प्राध्यापकांच्या जागांसाठी मेगाभरती

Professor Bharti 2022

Maharashtra Professor Recruitment 2022

राज्यात लवकरच 2 हजार 72 प्राध्यापकांच्या जागा  भरल्या जाणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे ज्ञानदानाचं काम करण्यासाठी इच्छूक तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातल्या प्राचार्यांच्या रिक्त जागा आणि 8 हजारांपैकी 2 हजार 72 प्राध्यापकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौऱ्यावर असताना ही माहिती दिलीय. बऱ्याच वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडली होती. आता या नव्या भरतीमुळे पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अपात्र शिक्षकांची कोर्टात धाव

टीईटी घोटाळ्यात कारवाई झालेल्या अपात्र शिक्षकांनी कोर्टात धाव घेतलीय. राज्यातील 7 हजार 880 शिक्षकांवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. घोटाळ्यात आरोप झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबवल्याने हिंगोलीतील तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलीय. संबंधित याचिकेवर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आलीय. त्यामुळे या सुनावणीत काय निर्णय घेण्यात येणार, याकडे अपात्र शिक्षकांचं लक्ष असणार आहे.


Professor Bharti 2022: Latest updates about Maharashtra Professor Bharti 2022 is that There are thousands of vacant posts of private funded assistant professors and other teaching and non-teaching staff in Maharashtra. There are 9,511 teaching and 8,798 non-teaching posts vacant in the aided colleges. Read More details are given below.

सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त

महाराष्ट्रात खासगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२०पासून पदभरतीवर निर्बंध आहेत. तथापि, पदभरती सुरू करण्यासाठी वित्त विभागासोबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराच्या माध्यमातून दिली आहे. १ ऑक्टोबर २००१पूर्वी मान्यता दिलेल्या महाविद्यालयात नवीन तुकडी, विद्याशाखा, संगणक शाखा यांना अनुदान पात्र करण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Professor Bharti 2022

 • बिगर कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या खासगी अनुदानित महाविद्यालयांतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांच्या भरतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे अमरनाथ राजूरकर, राजेश राठोड, डॉ. वजाहत मिर्झा आदी सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न सभागृहात पुकारण्यात आला नाही. तथापि, मंत्र्यांनी लेखी उत्तरात वरील माहिती स्पष्ट केली.

राज्यातील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदे आणि प्राचार्य पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त होणारी पदे भरण्यासाठी तसेच सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली २,०८८ पदे भरण्यास काही अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली आहे. तथापि, या पदभरतीस मान्यता देताना एक ऑक्टोंबर २०१७रोजीच्या विद्यार्थी संख्येचा आधार प्रमाण मानण्यात आला आहे.

Maharashtra Professor Recruitment 2022

 • त्याशिवाय एक ऑक्टोबर २०१७च्या वर्कलोडनुसार खासगी अनुदानित महाविद्यालयातील ९,५११ शिक्षकीय आणि ८,७९८ शिक्षकेतर पदे रिक्त आहेत. तसेच २०१७च्या आकृतीबंधानुसार मार्च २०२२अखेर राज्यातील बिगर कृषी विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये १,३३८ शिक्षकीय आणि २,५७२ शिक्षकेतर पदे रिक्त आहेत.
 • करोना साथरोग काळात आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी वित्त विभागाने चार एप्रिल २०२०रोजी पद भरतीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार शारिरीक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदाच्या भरतीवरही निर्बंध आहे.
 • या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नोकर भरतीच्या निर्बंधातून सवलत देण्यात यावी यासाठी राज्याच्या वित्त विभागासोबत विचारविनिमय सुरू आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
 • महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक यांच्यासह अन्य शिक्षकीय पदे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक आहे.
 • करोना संसर्ग संपुष्टात येत असून, राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर येत आहे. वित्त विभागाचा कार्यभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर उच्च व तंत्र शिक्षण खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे.
 • दोन्ही मंत्री हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे या प्रश्नात व्यवहार्य मार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जाते.

Professor Bharti 2022-In  Sir J. J. School of Art Mumbai there is a total 80% Post of Professor are vacant.  In Sir J. J. School of Art there is  49 posts have been sanctioned in Arts College. Out of which 29 posts are vacant. Out of the working professors, only 8 are full time professors. There are 5 professors working on seasonal basis. Read More details regarding Professor Recruitment 2022

Pune University Bharti -पुणे विद्यापीठ मध्ये तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त

Shikshak Bharti- या जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्त

मुंबई : सर ज. जी. कला महाविद्यालयासह उपयोजित कला महाविद्यालय, वास्तुकला महाविद्यालयाला अनन्य स्वायत्ततेसह (डी नोव्हो) अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळत असताना त्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याऐवजी राज्य शासनाच्या अखत्यारितील विद्यापीठ करण्याच घाट घालण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत शासनानेच दुर्लक्ष केल्यामुळे तीनही महाविद्यालयांची जर्जरावस्था ठळक दिसत आहे. उपयोजित कला, कला महाविद्यालयातील प्राध्यापकांची तब्बल ८० टक्के पदे रिक्त आहेत. 

Shikshak Bharti बच्चू कडू – शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

प्राध्यापकांची स्थिती..

ज. जि. कला महाविद्यालयात साधारण ४९ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यातील २९ पदे रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या प्राध्यापकांपैकी अवघे ८ पूर्णवेळ प्राध्यापक आहेत. हंगामी तत्वावर काम करणारे ५ प्राध्यापक आहेत. मात्र, त्यांना अनेकदा उशिरा वेतन मिळते

पदे रिक्त का?

देशातील कला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या या संस्थेत १९८६ पर्यंत सर्व सुरळीत सुरू होते. त्यानंतर १९९६ मध्येही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पदे भरण्यात आली. मात्र, त्यानंतर प्राध्यापक निवृत्त झाले, काही सोडून गेले मात्र त्यांच्याऐवजी पूर्णविळ प्राध्यापकांची भरती राज्य शासनाने केली नाही. साधारण २००० नंतर संस्थेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहू लागली.


Professor Bharti 2022– Over the last few years, the recruitment of professors has been facing difficulties due to various reasons. Therefore, in many aided colleges, CHB professors are currently handling most of the work. However, the honorarium paid to them is very meager. The Mane Committee, set up to augment it, submitted its report to the Government. It is expected to be accepted and implemented. However, the government is wasting time and the rules for recruitment of professors have not been prepared yet. The government will start the process of recruitment of professors soon.

राज्यात शिक्षकांच्या पाच हजार जागा रिक्त; लवकरच होणार भरती

  राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे तासिका तत्त्वावरील  प्राध्यापकांच्या  मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, अजूनही या आदेशानुसार सीएचबी  प्राध्यापकांना  मानधन दिले जात नाही. तसेच सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत स्थापन केलेल्या माने समितीचा अहवाल राज्य शासनास सादर केला असला तरी त्याची अंमलबजावणी केली. नाही. त्याचप्रमाणे प्राध्यापक भरतीच्या सर्व अडचणी दूर झाल्या, तरीही भरती प्रक्रिया सुरू का केली जात नाही, असा सवाल प्राध्यापक संघटनेतर्फे उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्राध्यापक भरतीला विविध कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अनेक अनुदानित महाविद्यालयांमध्ये सध्या सीएचबी प्राध्यापकच बहुतांश सर्व कामकाज सांभाळत आहेत. मात्र, त्यांना देण्यात आलेले मानधन फारच तुटपुंजे आहे. त्यात वाढ करण्यासाठी स्थापन केलेल्या माने समितीने आपला अहवाल शासनास सादर केला. तो स्वीकारून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र, शासन वेळकाढूपणा करत असून, प्राध्यापक भरतीची नियमावली अद्याप तयार केलेली नाही.

प्राध्यापक भरतीसाठी अनेक आंदोलने केली. परंतु, शासनाने भरतीसंदर्भात केवळ अध्यादेश प्रसिद्ध केले. त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे शासनाने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करावी.


Professor Recruitment 2022: State government has approved to fill the posts of 2,088 professors in non-agricultural colleges, it has come to light that there are more than 1,500 vacancies in non-agricultural government universities. Even after a lapse of four and a half years, the recruitment process has not progressed and the number of vacancies has reached 17,000 as the government did not fully approve the October 1, 2017 format.

Professor Bharti 2022: राज्य सरकारने अनुदानित अकृषी महाविद्यालयांमध्ये दोन हजार ८८ प्राध्यापकांची पदे  भरण्यास मान्यता दिली असली, तरी अकृषी सरकारी विद्यापीठांमध्ये एक हजार ५०० पेक्षा अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त  असल्याचे समोर आले आहे. साडेचार वर्षांच्या कालावधी उलटून गेल्यानंतरही सरकारने एक ऑक्टोबर २०१७ च्या आकृतिबंधाला पूर्ण मान्यता न दिल्याने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पुढे सरकत नसून, रिक्त पदांची संख्या १७ हजारांपर्यंत पोहोचली आहे.

राज्यात प्राध्यापकांची १७ हजार पदे अद्याप रिक्तच

Shikshak Bharti -शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा!! जाणून घ्या

Shikshak Bharti- शिक्षक भरतीसाठी या महिन्यात सीईटी; 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

 • राज्यातील प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयासमोर राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी सलग ६० दिवस आंदोलन केले. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सरकारने ४० टक्के रिक्त जागा म्हणजे दोन हजार ८८ जागा भरण्याला मान्यता दिली.
 • त्याबाबतचे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या भरतीबाबत तातडीने कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, त्रासलेल्या पात्रताधारक उमेदवारांनी सोमवारी एक दिवसीय आंदोलन केले. त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेला तातडीने सुरुवात न केल्यास चार जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण संचालनालयाला दिला आहे.
 • राज्यात सध्याची प्राध्यापक भरती एक ऑक्टोबर २०१७ च्या आकृतिबंधानुसार होत आहे. मात्र, साडेचार वर्षांच्या कालावधी उलटून गेल्यानंतरही सरकारने अंतिम मान्यता दिलेली नाही. या कारणामुळे सरकारला अनुदानित महाविद्यालयांमध्ये एक ऑक्टोबर २०१७ नंतर सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरता येत नसल्याचे चित्र आहे. ‘
 • राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये एक हजार ५७२ प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. सरकारच्या निर्णयानुसार ४० टक्के रिक्त जागा म्हणजे ६२९ प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल,’ असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
 • गेल्या साडेचार वर्षांत विद्यापीठांमधील साधारण ५०० प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या जागांची भर रिक्त जागांमध्ये पडली आहे. या जागा भरण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापक नाहीत, अशी परिस्थिती आहे.

Professor Bharti 2022: Approval was given on 12 November 2021 to recruit 2,088 posts in about 1,171 subsidized colleges in the state as per the number of students as on October 1, 2017. On 28th December, 2021, both the Houses of the Legislative Assembly unanimously approved the Category wise Reservation Bill. But this has not been implemented. Read More details regarding Maharashtra Professor Bharti 2022 are give below.

प्राध्यापकांची 2088 पदे मंजूर, पदभरती कधी होणार!! जाणून घ्या

अकृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदभरती सुरू न होणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबतच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी न होणे, विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान देणे यांसह विविध मागण्यासाठी येत्या सोमवारी शिक्षण संचालक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर आणि सचिव डॉ. मारोती देशमुख यांनी दिला आहे.

राज्यातील सुमारे एक हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक पदभरतीला ४० टक्के नुसार दोन हजार ८८ जागांची भरती करण्यात १२ नोव्हेंबर २०२१मध्ये मान्यता देण्यात आली. पदभरतीतील आरक्षणासंदर्भात २८ डिसेंबर २०२१ रोजी संवर्गनिहाय आरक्षण विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. परंतु याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. तसेच पद भरतीला परवानगी देताना शिक्षण संचालक, ग्रंथपाल तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता न दिल्याने पात्रता धारकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राध्यापक भरतीसह अन्य मागण्यांबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या संदर्भातील मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

प्रमुख मागण्या :

 • अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदभरती त्वरित सुरू करावी.
 • ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधाला अंतिम मान्यता देऊन डिसेंबर २०२१पर्यतची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत.
 • तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या धोरणाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून अंमलबजावणी करावी.
 • विनाअनुदानित तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे.
 • २०१६ नंतरच्या सहाय्यक प्राध्यापकांना वेतनवाढ तत्काळ लागू करावी.

इन्फोबॉक्स :

‘‘तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या संदर्भात १४ नोव्हेंबर २०१८ आणि २२ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी न होणे, तसेच यामध्ये तासिका तत्त्वावरील अनुभव ग्राह्य धरावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबत धोरण निश्चितीसाठी डॉ. धनराज माने समितीने अहवाल देखील दिला आहे. तो शासन दफ्तरी धुळखात पडला आहे. अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.’’Professor Bharti 2022: As per the news, There are about 12000 vacancies for assistant professors in various aided colleges in the state. There are 40 or 50 %  vacancies for professors in various districts of the state. College administration is facing various difficulties due to non-recruitment of permanent professors. Read More details as given below.

राज्यात प्राध्यापकांच्या जवळपास १२ हजार जागा रिक्त

Professor Bharti 2022 मागील दहा वर्षांपासून राज्यातील विविध अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांच्या जवळपास १२ हजार जागा रिक्त रिक्त आहेत.  राज्यातील विविध जिल्ह्यात प्राध्यापकाची ४०, ५० टक्के जागा रिक्त आहेत. स्थायी प्राध्यापकांच्या पदांची भरती होत नसल्याने महाविद्यालय प्रशासनासमोर विविध अडचणी आहेत. विद्यापीठाशी निगडित कामकाज करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक अनेक महाविद्यालयात नाहीत. तर, महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणाया राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या तपासणीला सामोरे जाताना भौतिक सुविधा असल्या तरी रिक्त जागांमुळे परिपूर्ण तज्ज्ञ प्राध्यापकांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवतो. 

जालना : गत अनेक वर्षांपासून महाविद्यालयांत प्राध्यापकांची भरती झाली नाही. भरती प्रक्रिया रखडल्याने बहुतांश महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, केवळ तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर ही महाविद्यालये चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लातूर :  जिल्ह्यात अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या ३६ ते ४० च्या घरात असून, गेल्या आठ वर्षांपासून प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती नसल्यामुळे तासिका तत्त्वावर काम भागविले जात आहे.जागा रिक्त असून, नोकरी मिळेना आणि तासिका तत्त्वावर पोट भरेना, अशी अवस्था तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची आहे. रिक्त जागांच्या ४० टक्के जागा भरण्यास २०१८ मध्ये शासनाने मंजुरी दिली. यानुसार जिल्ह्यातील ३६ महाविद्यालयांमध्ये १७७ पेक्षा अधिक जागा भरण्यास पात्र आहेत. मात्र, त्या जागांवर भरती झालेली नाही

वर्धा : गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. अशातच कोरोनाकाळामुळे या नियुक्त्यांना ब्रेक लागला आहे. जिल्ह्यामधील महाविद्यालयात प्राध्यापकांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांचीही मोठी फौज आहे; परंतु शासनाकडून पदभरतीला परवानगी नसल्याने तासिका तत्वावरच काम भागविले जात आहे. म्हणूनच सध्या अनेक जागा रिक्त; तरी नोकरी मिळेना अन् तासिका तत्त्वावर पोट भरेना!’ अशी अवस्था महाविद्यालयीन अंशकालीन प्राध्यापकांची झाली आहे.

महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी सुरुवातीला सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली जाते. त्याकरिता संबंधित विषयामध्ये स्नातकोत्तर पदवी, नेट-सेट किंवा पीएचडी असणे अनिवार्य आहे. हे सर्व शिक्षण करण्यातच मोठा कालावधी जातो. सहायक प्राध्यापकांकरिता पात्र ठरण्यासाठी तप करावा लागत असून, पात्रता मिळविल्यानंतरही कायमस्वरूपी नोकरीकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे

सांगली : महाविद्यालयांमधील प्राचार्य आणि ४30 सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्याबाबतचे पुढील पाऊल अद्याप शासनाकडून पडलेले नाही. – सध्या सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत सहाय्यक प्राध्यापकांच्या ४० टक्क्यांहून जास्त जागा रिक्त आहेत. तरीही नोकरी मिळेना अन् तासिकेवर पोट भरेना, अशी अवस्था तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची झाली आहे. शासकीय आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. यामुळे प्राध्यपकांना नियुक्ती कधी मिळणार अशी विचारणा केली जात आहे. सध्या उच्च शिक्षित असुनही सहाय्यक प्राध्यापकांना योग्य वेतन नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात याबाबत ठोस निर्णय होणे गरजेचे बनले आहे

अकोला : जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५० टक्क्यांवर जागा रिक्त आहेत. यामुळे प्राध्यापकांना नोकरी मिळत नाही आणि घड्याळी तासिकांवर पोटही भरत नसल्याची विदारक परिस्थिती आहे. जिल्ह्यातील पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये ७०० च्या जवळपास प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर शासन भरतीही घेत नाही आणि घड्याळी तासिकांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वेतनहीं देत नाही. त्यामुळे या प्राध्यापकांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह, आईवडिलांचे आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने प्राध्यापकांची तातडीने पदभरती करावी अशी तासिकेवर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी केली आहे.

हिंगोली : मागील अनेक वर्षांपासून अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यात येत नसल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत जवळपास १२५ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यातील ८५० जागा रिक्त आहेत. रिक्त जागांवर तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापकांची मानधनावर नेमणूक केली जात असली तरी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात वेळेवर मानधन मिळत नसल्याने प्राध्यापकांना अनेक संकटांना सामोर जावे लागत आहे. दरम्यान, शासन तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची भरती करूनरिक्त जागा भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी प्राध्यापकांतून होत आ

परभणी: राज्य शासनाने २००१ पासून प्राध्यापकांची भरती बंद केल्याने याअनुषंगाने पात्रता धारण केलेल्या प्राध्यापकांवर तुटपुंज्या मानधनावर तासिका तत्त्वावर काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्राध्यापकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

राज्य शासनाने २००९ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांची भरती बंद केली आहे. अशातच या महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जवळपास ५० टक्के जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर संबंधित शैक्षणिक पात्रताधारण केलेले प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना एका तासासाठी ५०० रुपये मानधन देण्यात येते. आठवड्यातून या प्राध्यापकांना ४ तासिका देण्यात येतात. त्यामुळे महिनाभरात जवळपास त्यांना ८ हजार रुपये मिळतात. आजच्या महागाईच्या काळात हे मानधन परडणारे नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण वाढली आहे.

जळगाव : महाविद्यालयांमधील सुमारे ५० टक्क्याहून अधिक कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. राज्यशासन प्राध्यापक भरतीकडे दुर्लक्ष करीत असून, लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे, त्यामुळे प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ८३ अनुदानित महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ८२९ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.

सातारा : उच्च शिक्षणाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या राज्यातील प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडून अजूनही ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांना अजूनही तुटपुंज्या मानधनाने त्यांचे पोट भरेना आणि रिक्त जागांवर भरती न काढल्याने नोकरी मिळेना अशी अवस्था प्राध्यापकांची झाली आहे.

बुलडाणा : राज्यभरात १२ हजारांच्या वर प्राध्यापकांच्या जागा रिक्त असताना शासनाकडून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या भरतीला मंजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे,पात्रता धारक उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नेट, सेट, पीएचडी धारकांच्या विविध संघटनांनी आंदोलन केल्यानंतर शासनाने प्राध्यापक भरतीची घोषणा केली. २ हजार जागा भरण्याविषयी शासन आदेश काढून मंजुरीही दिली. मात्र, संवर्गनिहाय आरक्षणाविषयी शासन वेगवेगळे आदेश काढत आहे.

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित एकूण २१२ महाविद्यालये आहेत. शिवाय विद्यापीठाचे कॅम्पस आहेत. या सर्व ठिकाणी प्राध्यापकांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत. शासनाकडून पदभरतीवर ब्रेक असल्यामुळे पात्र उमेदवारांना नोकरी मिळाली नाही. दुसरीकडे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना अल्प मानधन असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

चंद्रपूर : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित एकूण २१२ महाविद्यालये आहेत. शिवाय विद्यापीठाचे कॅम्पस आहेत. या सर्व ठिकाणी प्राध्यापकांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत. शासनाकडून पदभरतीवर ब्रेक असल्यामुळे पात्र उमेदवारांना नोकरी मिळाली नाही. दुसरीकडे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना अल्प मानधन असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित दोन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालये तसेच कॅम्पसमध्ये मिळून प्राध्यापकांच्या जवळपास १ हजार १२० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली असून अध्यापनाची प्रक्रिया सुरू आहे

औरंगाबाद : अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती तब्बल ८ वर्षांपासून बंद आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने भरतीवर घातलेली बंदी निवडणुकीच्या धामधुमीत मागे घेत रिक्त जागांच्या ४० टक्के जागा भरण्यास ३ नोव्हेंबर २०१८ रोजी मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त २७९ पैकी ९७ पदे भरण्यात येणार होती. मात्र त्यातील केवळ २० पदेच भरली.

बीड जिल्ह्यात जवळपास एक हजारपेक्षा जास्त प्राध्यापक तासिका तत्त्वावर महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत, तर ५५०पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्यामुळे पन्नास टक्के जागा रिक्त; तरी नोकरी मिळेना अन तासिकेवर पोट भरेना,अशी स्थिती सध्या आहे. नेट, सेट, पीएच. डी. अशी गुणवत्ता असताना नोकरीच्या प्रतीक्षेत त्यांचे वय निघून जात आहे. चांगल्या प्रकारची गुणवत्ता असतानाही केवळ भरतीअभावी तासिका तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. यातच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची बिले उशिरा निघत असल्याने ते तळमळीने कसे शिकवतील, हा प्रश्न आहे.

Professor Bharti 2022


Professor Bharti 2022: As per the news, There are about 12000 vacancies for assistant professors in various aided colleges in the state and 850 vacancies in 125 aided colleges in four districts under Swami Ramanand Tirtha Marathwada University. Read More details as given below.

मागील दहा वर्षांपासून राज्यातील विविध अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांच्या जवळपास १२ हजार जागा रिक्त असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत असलेल्या चार जिल्ह्यातील १२५ अनुदानित महाविद्यालयात ८५० जागा रिक्त आहेत. मात्र या जागा भरण्यात येत नसल्याने सीएचबी प्राध्यापकांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शासन तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची भरती करून रिक्त जागा भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील धोरणाला सीएचबी प्राध्यापकांनी विरोध दर्शविला आहे. यूजीसीच्या निर्देशानुसार १०० टक्के प्राध्यापकांची भरती करण्यात यावी,अशी मागणी सीएचबी प्राध्यापकांनी केली आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व सहायक प्राध्यापकांची घटती संख्या ही विसंगती आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले . 


Professor Bharti 2022- Many professors have retired while there are already vacancies in universities and aided colleges in the state. As a result, the backlog of vacancies has increased significantly. The state government has given permission to fill two thousand vacancies of professors. However, due to non-preparation of point list, the government has not been able to find the time for recruitment of professors.

राज्यात प्राध्यापकांच्या दोन हजार जागा रिक्त – भरती कधी? जाणून घ्या

राज्य शासनाने प्राध्यापकांच्या रिक्त दोन हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी शासन आदेशही जाही झाला आहे. मात्र प्राध्यापक भरतीचा अजूनही मुहूर्त शासनाला सापडत नसून, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील हजारो नेट, सेट, पीएच. डी धारक आर्थिक संकटात सापडले आहेत.

राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये आधीच पदे रिक्त असताना अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. राज्य शासनाने प्राध्यापकांच्या रिक्त पदांपैकी दोन हजार पदे भरण्याची परवानगी दिली आहे.  मात्र, बिंदुनामावली तयार नसल्याने प्राध्यापक भरतीचा मुहूर्त शासनाला सापडलेला नाही.


Professor Bharti 2022: Various posts of professors are vacant in the state. The recruitment situation of professors in higher education institutions in the state is very serious. It is unfortunate that the process of recruitment of professors on Tasika principle, which was started as a temporary facility, is becoming a norm. In most of the colleges, the number of professors on Tasika principle is more than the number of permanent professors. For quality higher education, the government should immediately fill the vacancies in the state, said Dr. Maharashtra State Professors Association President. Presented by Shyamrao Lawande.

Professor Bharti 2022

राज्यात प्राध्यापकांची विविध पदे रिक्त

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक भरतीची स्थिती अतिशय गंभीर आहे. तात्पुरती सोय म्हणून सुरु करण्यात आलेली तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची भरती ही प्रक्रिया रूढ होत आहे ही दुर्दैवी बाब आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राध्यापकांपेक्षा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची संख्याच जास्त आहे. दर्जेदार उच्च शिक्षणासाठी शासनाने राज्यामधील रिक्त प्राध्यापकांची भरती तातडीने केली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्यामराव लवांडे यांनी मांडली.

येथील प्राध्यापकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. के. एल. गिरमकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. हनुमंत अवताडे, शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. के. चव्हाण, सोलापूर विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नेताजी कोकाटे, स्पूक्टोचे सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे-देशमुख, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. धनंजय भोसले उपस्थित होते. यावेळी डॉ. लवांडे यांची महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापकांच्या व प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. राजाराम गावडे यांची स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक डॉ. राजेंद्र साळुंखे यांनी सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे व डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. तर आभार प्रा. उत्तम माने यांनी मानले. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मेळाव्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर कार्यक्षेत्रातील १५० प्राध्यापक मेळाव्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व इंदापूरमधील प्राध्यापकांनी केले.

Shikshak Bharti 2022– According to the number of students in 1 thousand 171 non-government colleges in the state as of October 1, 2017, and till now the vacancies of retired professors have been filled and about 17 thousand professors are vacant. There are at least 12,000 vacancies for non-teaching staff. In the academic department of non-agricultural universities, there are at least fifteen hundred vacancies for assistant professors and professors, and at least one thousand vacancies for non-teaching staff.

राज्यात १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

राज्य सरकारने (State Government) संवर्गनिहाय आरक्षण (Reservation) कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच त्यानुसार राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदभरतीचा (Professor Recruitment) अध्यादेश काढावा आणि ही भरती प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने केली आहे.

Shikshak Bharti- या ग्रामीण भागात ५५१ शिक्षकांची पदे रिक्त !

राज्यातील एक हजार १७१ अशासकीय महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७ च्या विद्यार्थी संख्येनुसार आणि आतापर्यंत सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा पकडून जवळपास १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या किमान १२ हजार जागा रिक्त आहेत. अकृषी विद्यापीठांमधील शैक्षणिक विभागात किमान पंधराशे सहायक प्राध्यापक, प्राध्यापक यांच्या जागा रिक्त असून, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या किमान एक हजार जागा रिक्त आहेत.

राज्यात एकूण ३१ हजार ५०० इतकी प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील नेट-सेट, पीएच.डी. पात्रताधारकांमध्ये नैराश्य आले आहे. परंतु त्यानंतर सरकारने प्राध्यापक पदभरतीला १२ नोव्हेंबर २०२१ रोजी दोन हजार ८८ पदांसाठी परवानगी दिली. सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी प्रक्रिया महाविद्यालय व संस्था स्तरावर सुरू झाली होती. परंतु राज्यातील सर्व प्रवर्गांना न्याय मिळावा, या हेतूने राज्य सरकारने २९ डिसेंबर २०२१ रोजी संवर्गनिहाय आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केले. हे विधेयक मंजूर होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरीही विधेयकाचे अजून कायद्यात रूपांतर झालेले नाही. परिणामी सहायक प्राध्यापक पदभरतीसंबंधी पुढील कार्यवाही महाविद्यालय व संस्था स्तरावर होत नसल्याचे दिसून येते, असे नवप्राध्यापक संघटनेचे म्हणणे आहे.

‘‘महाविद्यालय किंवा एखाद्या संस्थेत आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, पदभरतीत कुठले आरक्षण असावे, यासंदर्भात संवर्गनिहाय आरक्षण विधेयक मंजूर झाले. परंतु शासन निर्णय होत नाही तोपर्यंत रोस्टर तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. सर्व शिक्षणसंस्थांना नव्याने रोस्टर तयार करून पदभरतीची प्रक्रिया करावी लागणार आहे. परंतु सद्यःस्थितीत पदभरतीला मान्यता असूनही रोस्टरच्या लालफितीत प्राध्यापक पदभरती अडकली आहे. एकीकडे प्राध्यापक पदभरतीला शासनाने परवानगी द्यायची आणि दुसरीकडे आरक्षण पद्धतीच्या धोरणात प्राध्यापक पदभरती लांबवायची ही पात्रताधारकांची फसवणूक आहे.’’


राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील – तब्बल २ हजार ८८ पदे भरणार

Maha Shikshak Bharti 2022 – As many as 2,088 vacant posts of professors of various subjects in the senior colleges of the state and also the posts of principals will be filled soon. Higher and Technical Education Minister Uday Samant had announced the appointment of professors in the state a few months back. In it, he had clarified that 15,000 posts of assistant professors in senior colleges would be filled. Read More details as given below.

 1. CTET परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड
 2. Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ८० टक्के पदे रिक्त
 3. Maha TAIT Exam 2022- राज्यात शिक्षक भरतीसाठी दुसरी अभियोग्यता चाचणी परीक्षा लवकरच
 4. Shikshak Bharti- रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा-1,298 जागांसाठी भरती
 5. Shikshak Bharti- पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार
 6. Shikshak Bharti- शिक्षक भरती लवकरच ; जाणून घ्या नविन नियम

राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील – तब्बल २ हजार ८८ पदे भरणार

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये (colleges) रिक्त असलेली विविध विषयांची प्राध्यापकांची तब्बल २ हजार ८८ पदे (professor vacant post) आणि त्यासोबतच प्राचार्यांची पदेही (principal post) लवकरच भरली जाणार आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) , व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या बैठकीत या पदांना मान्यता देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी राज्यातील प्राध्यापकांची पदे भरण्याची घोषणा मागील काही महिन्यांपूर्वी केली होती.

त्यात त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची १५ हजार पदे भरली जाणार असे स्पष्ट केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार ८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्यांची पदे भरण्याला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सामंत यांनी एक ट्वीट करून दिली आहे. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयाती रिक्त पदे भरण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटनांसोबतच युवा सेना, महाराष्ट्र प्राध्यापक सेना आदी संघटनांनीही मागणी लावून धरली होती.

तर यासाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य व महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे अध्यक्ष डॉ. धनराज कोहचाडे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच सामंत यांची भेट घेऊन प्राध्यापक पदांची भरती लवकर करण्याची मागणी केली होती. राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विषयाची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानेही वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रियाही लांबणीवर पडली होती.

Professors Recruitment 2022

There is double good news for professors in the state. Higher and Technical Education Minister Uday Samant has assured that the recruitment process, which has been closed in the state since 2013, will start soon. This will bring relief to the candidates across the state who are deprived of jobs. There are currently over fifteen thousand vacancies for professors in various colleges in the state 

शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रखडलेली प्राध्यापक भरती पुन्हा सुरु करण्याचे आणि तासिका प्राध्यापकांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. गोंदियात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात सध्या विविध कॉलेजमधील पंधरा हजारावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. या देखील भरण्यात येणार आहेत. तसेच तासिका प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली जाणार असल्याचे आश्वासनंही उदय सामंत यांनी दिले आहे.

२०१३ पासून ही भरती बंद आहे. या पदावर भरती व्हावी म्हणून राज्यातील पन्नास हजारावर नेटसेटधारक आणि पीएच.डी पदवी मिळवलेल्यांनी प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर पाच वर्षापूर्वी युती सरकारने चाळीस टक्के भरतीला मान्यता दिली होती. यामुळे भरतीची आशा निर्माण झाली होती, पण सरकारने प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही. उलट पुन्हा नवीन आदेश काढून भरतीला बंदी घालण्यात आली होती.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Professor Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!