Jobs in IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती

Jobs in IT Company

TCS, Infosys, Wipro and others will be hiring more than one lakh employees this financial year. Following the second wave of corona in the country, major IT companies are now considering hiring new employees. TCS, Infosys, Wipro and others will be hiring more than one lakh employees this financial year. Preference will be given to those who have just passed the recruitment process. These claims are being made after quarterly reviews from these companies.

Infosys कंपनी मध्ये मेगाभरती; 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती करणार

TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून या आर्थिक वर्षात एक लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत.  देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता प्रमुख आयटी कंपन्या नव्याने कर्मचारी भरती करण्याच्या विचारात आहेत. TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून या आर्थिक वर्षात एक लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत.

Quest Global कंपनी लवकरच करणार 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती

 या भरती प्रक्रियेत नुकतेच पास झालेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या कंपन्यांकडून तिमाही आढावा घेण्यात आल्यानंतर हे दावे करण्यात येत आहेत.

आय टी कंपनी मध्ये 30,000 कर्मचाऱ्यांची भरती

आर्थिक वर्ष २०२१ च्या सुरुवातीला विप्रोने १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली. इन्फोसिसने ८३०० कर्मचाऱ्यांची तर, टीसीएसने २० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली.

TCS Jobs 

  त्यामुळे टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखांवर पोहचली आहे. २०२१- २२ या वर्षात टाटा कन्सल्टेन्सीकडून देशात ४० हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती अपेक्षित आहे.  टीसीएसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही गतवर्षी भारतात ४० हजार नव्या उमेदवारांची भरती केली. यावर्षीही आम्ही ४० हजार नवी भरती करणार आहोत.

 Jobs in Infosys 

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले की, कंपनी जागतिक स्तरावर यंदा ३५ हजार पास आउट उमेदवार घेणार आहे. मार्चच्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची संख्या २.५९ लाख होती.

 जूनच्या तिमाहीपर्यंत ही संख्या २.६७ लाख झाली. विप्रोने एप्रिल- जूनच्या तिमाहीत १२ हजार नवे कर्मचारी घेतले आहेत. चालू आर्थिक वर्षात आणखी ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा विचार आहे. दरम्यान, TCS ने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत भरघोस नफा कमावला आहे. एप्रिल ते जून याकालावधीत कंपनीचा नफा २८.५ टक्क्यांनी वाढून तब्बल ९ हजार ००८ कोटी रुपये झाला आहे.  गतवर्षी याच कालावधीत कंपनीला ७ हजार ००८ कोटींचा नफा झाला होता. तर, चालू आर्थिक वर्षात कंपनीचे एकत्रित उत्पन्नही १८.५ टक्क्यांनी वाढून ४५,४११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


The top five IT companies will hire more than 96,000 employees in the current financial year. The IT sector has become the largest recruiter of skilled talent, according to Nasscom, a senior IT company.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र कुशल प्रतिभेची सर्वात मोठी भरती करणारे क्षेत्र बनले आहे असल्याचे आयटी कंपन्यांची वरिष्ठ संस्था नॅसकॉम म्हटले आहे. अलीकडेच बँक ऑफ अमेरिकेने एका अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की ऑटोमेशन वाढल्यामुळे 2022 पर्यंत सॉफ्टवेअर कंपन्या 30 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. यातील बहुतेक तंत्रज्ञान क्षेत्रातील असतील.

आयआयटींमध्ये ऑनलाइन प्लेसमेंटला सुरुवात; कोट्यवधींचे पॅकेज

नॅसकॉमने एका निवेदनात म्हटले आहे की, “तंत्रज्ञानाचा विकास आणि ऑटोमेशन वाढीमुळे पारंपारिक आयटी नोकऱ्या आणि भूमिकेचे स्वरूप सर्वांगीणदृष्ट्या विकसित होईल आणि त्यामुळे नवीन नोकर्‍या मिळतील. आयटी क्षेत्राने कुशल प्रतिभा क्षेत्रातील नोकरीसाठी सर्वात जास्त संख्या तयार केली आहे आणि वित्त वर्ष 2021 मधील 1,38,000 लोकांना नोकरी दिली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 96 हजाराहून अधिक जणांची आयटी कंपन्यांची भरती करण्याची जोरदार योजना तयार केली असल्याचे नॅसकॉमने यावर जोर दिला.


Cognizant will employ 28,000 freshers across the country in the coming year. The announcement was made by the company’s CEO Brian Humphries. Cognizant employs 17,000 freshers in India by 2020 Cognizant has a total of 2 lakh 96 thousand 500 employees in India.

 खूशखबर! ही आयटी कंपनी 28 हजार जणांना नोकरी देणार

आघाडीची आयटी कंपनी कॉग्निझंट (Cognizant) भारतातील 28 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फराईस यांनी ही घोषणा केली आहे. कॉग्निझंट कंपनीनं 2020 मध्ये भारतातील 17 हजार फ्रेशर्सना नोकरी दिली आहे. कॉग्निझंट कंपनीचे भारतात एकऊण 2 लाख 96 हजार 500 कर्मचारी आहेत.

28 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार

कॉग्निझंट या कंपनीनं येत्या वर्षभरात देशातील 28 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. फ्रेशर्सची निवड वेगवान होण्यासाठी आम्ही अतिरिक्त मनुष्यबळ वापरणार आहोत, असं ब्रायन हम्फराईस यांनी सांगितलं आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार

कॉग्निझंट कंपनीच्यावतीनं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध मार्ग अंवलंबले जाणार आहेत. अधिक लोकांना नोकरी देण्यासोबतच त्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यक्रम होती घेण्यात येणार आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना प्रमोशन आणि पगारामध्ये वाढ देण्यात येईल, असं कॉग्निझंटच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.


There has been a lot of recruitment in the IT sector. This trend will continue and the country’s largest IT companies are gearing up to create more than 1 lakh jobs this year. Fresher students will have more opportunities in it.

 खूशखबर! आयटी कंपन्यांमध्ये 1 लाखाहून अधिक फ्रेशर्सना संधी

कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर संकट आले. मात्र, 2021 वर्षात चांगली रोजगार निर्मिती झाली आहे. विशेषतः ‘आयटी’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती झाली आहे. हाच ट्रेंड कायम राहणार असून देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या यावर्षी 1 लाखाहून अधिक रोजगार मिळवून देण्यासाठी तयारी करीत आहेत. फ्रेशर विद्यार्थ्यांना त्यात अधिक संधी मिळतील.

भारतातील TCS आणि Infosys या दोन कंपनी मध्ये मेगाभरती

गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी ४५ टक्के अधिक नोकरी भरती केली आहे. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल या कंपन्या यात आघाडीवर आहेत.


 खूशखबर! आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी; 70 लाखांपर्यंत मिळणार पॅकेज

job opportunities : आयटी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सुमारे 1 लाख लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगार मिळाला,  अशी माहिती हॉट टेक जॉब्स आणि हॉट स्किल्स Indian Unicorns & Soonicorns च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसमुळे देशातील प्रत्येक वर्किंग सेक्टरमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली होती. त्यामुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. मात्र, आता आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरलेल्या टेक कंपन्यांनी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

 स्टाफिंग फर्म एक्सफेनो (Xpheno) च्या रिपोर्टनुसार, आयटी कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त लोकांची भरती झाली होती. आयटी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सुमारे 1 लाख लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगार मिळाला,;अशी माहिती हॉट टेक जॉब्स आणि हॉट स्किल्स Indian Unicorns  Soonicorns च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

 मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे भरती

आयटी क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ, गेल्या ऑक्टोबरमध्ये एक्सेंचर कंपनीत 3000 जागा होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन 7000 एवढी संख्या झाली आहे. IBM मध्ये ज्युनिअर लेव्हलच्या पोस्टसाठी 1725 जागा उपलब्ध आहेत. विप्रो कंपन्यांमध्ये 800 जागा उपलब्ध आहेत. एक्सफेनोच्या रिपोर्टनुसार कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहेत ते जाणून घेऊया..

 फुल स्टॅक डेव्हलपर

फुल स्टॅक डेव्हलपर पदासाठी प्रोग्रामिंगच्या भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच React.JS [Redux]आणि Angular.JS फ्रंट एंड आणि बॅक एंड सारख्या Node.JS ची माहिती असणे आवश्यक आहे.  या पदांवर काम करणाऱ्या फ्रेशर्सना वर्षाला 4-6 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं तर 12 वर्षांच्या अनुभवी व्यक्तींना 40-80 लाख रुपयांपर्यंत कमवण्याची संधी आहे. 

 डेटा इंजिनिअर्स

Hadoop सारख्या डेटा फ्रेमवर्कवर काम करण्यासाठी इंजिनिअर्सना पायथॉन आणि आरसारख्या प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये काम करणाऱ्या फ्रेशरला वर्षभरात 4 -6 लाख कमवण्याची संधी आहे. तर 3 वर्षांपर्यंत अनुभव असणारी व्यक्ती वर्षाला 14 ते 15 लाखांच्या घरात पैसे कमवू शकते. तर 12 वर्षांचा अनुभव असणाऱ्या डेटा इंजिनिअर्सना 70 लाखांपर्यंत कमवण्याची संधी आहे

 क्लाऊड कॉम्प्युटरिंग

कोरोना संकट काळात क्लाऊड कॉम्प्युरिंग मार्केटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. क्लाउड आणि नवीन एज टेक्नॉलॉजीमुळे येणाऱ्या काळात फर्मच्या विकासात वाढ होईल, असे विप्रोचे सीईओ डेलपॉर्टे यांनी म्हटले आहे. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, अझर आणि गुगल क्लाऊड सारखे प्लॅटफॉर्म सध्या बंपर भरती सुरु आहे. क्लाउड प्रोफेसर दर वर्षी 4 लाख ते 35 लाख रुपयांपर्यंत कमावू शकतात.

 सायबर सिक्युरिटी प्रोफेसनल

कोरोना संकट काळात वर्क फ्रॉम होम करताना सायबर सुरक्षेची आवश्यकताही वाढली असून यासह या क्षेत्रातील प्रोफेसनल्स गरज वाढली आहे. या क्षेत्रात ट्विटर आणि पे यू सारख्या कंपन्यांमध्येही भरती झाली आहे. सायबर सिक्युरिटी प्रोफेसनल हे अनुभवाच्या जोरावर 4 लाख ते 4 कोटी रुपये मिळवू शकतात.

सोर्स:लोकमत

8 Comments
 1. Priya Subhash sawant says

  Yes… I wana job in Infosys company

 2. Mukul says

  Mukul dipak gawand
  9373943040 it job असेल तर सांगा Bsc completed

 3. Nilam Govind Pagare says

  Me bhi mahangar palikame kam karna chahti hu 10th pass hu plz rply bhej dena

 4. Nilam Govind Pagare says

  Mai bhi job karna chahti hu plz rply bhej dena

 5. Sneha Dongre says

  I am interested

 6. Anand Bhimashankar kumbhar says

  Please Reply back 8856836411

 7. Anand Bhimashankar kumbhar says

  Gravitational complete

 8. Anand Bhimashankar kumbhar says

  Please Reply your back 8856836411

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!