Arogya Vibhag Bharti- जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

Arogya vibhag Bharti 2021

Maharashtra Arogya Vibhag Medical Officer Bharti 2021 latest updates is published on official website. Medical Officer vacant seat details are given in below attached pdf file. Candidates see the district wise vacant seats details of Medical officer in this pdf file. Keep visit on our website for the further updates.

Arogya Vibhag- लिपिकवर्गीय उर्वरित 50 टक्के भरतीला मान्यता

Maharashtra Arogya Vibhag Mega Bharti 2021 latest updates : Approval has been given to fill the vacancies related to the health department in all the Zilla Parishad in the state. Approval has been given to fill the five vacancies in the Health Department in all the Zilla Parishad in the five categories of Health Supervisor, Pharmacist, Laboratory Technician, Health Worker and Health Worker.

ZP Arogya Vibhag Bharti Exam Dates :-

ZP Arogya Vibhag Bharti 2021

New GR Released ZP Bharti 2021

जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

Maharashtra Arogya Vibhag Mega Bharti 2021

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी या संदर्भात जारी केलेल्या शासन आदेशात भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती.त्यानंतर लगेचच लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तसेच राज्यातील सत्तांतरानंतर महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आले, त्यामुळे अद्यापर्यंत ही मेगाभरती होऊ शकली नाही. गेल्या वर्षांपासून करोना साथरोगाचा निकराचा सामना कराव्या लागलेल्या राज्य सरकारला आर्थिक अडचणीमुळे नोकरभरतीवर र्निबध घालावे लागले. त्यातून आरोग्याशी संबंधित रिक्त जागा भरण्यास परवानगी देण्यात आली होती.

या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. २३ ऑगस्टपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग आरक्षण कायदा  रद्द केला आहे. त्यामुळे २०१९ च्या जाहिरातीत एसईबीसीसाठी राखीव पदे ठेवली असतील तर ती अराखीव पदांमध्ये रुपांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag bharti updates – while resuming the stalled process in the Arogya Vibhag of the Zilla Parishad in the Maharashtra state, it has been decided to fill the posts in the SEBC category for the Maratha community either in the open or EWS category. The Rural Development Department issued an order in this regard. Read the more details given below: 

Arogya Vibhag Bharti – SEBC ची पदे खुल्या किंवा EWS प्रवर्गातून भरणार

राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रखडलेली प्रक्रिया पुन्हा सुरु करताना मराठा समाजासाठी SEBC प्रवर्गातील पदे हि खुल्या वा EWS प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचा आदेश काढला.

Arogya Vibhag Bharti 2021

या आदेशानुसार, ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी पात्र असतील. SEBC आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून त्यांना संधी दिली जाईल.


arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2021 latest updates : The Maharashtra state  will recruit 2226 different posts in Arogya Vibhag. The advertisement, issued by the state’s public health department, has created posts for health officers, nurses, health assistants, pharmaceutical officers, female and male operators, clerks, room servants, soldiers, drivers, cleaners and more.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागच्या महिन्यात राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसारच आता 2 हजार 226 पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1 हजार 184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2 हजार 226 पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या जाहिरातीत आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचालक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार आदी पदांसाठी निर्मिती करण्यात आली आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या आदेशात असं सांगण्यात आलं आहे की, या 2 हजार 226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. आता केवळ पदनिर्मितीचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच्या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.


आरोग्य विभागात जम्बो भरती, अनुकंपाधारकांना नोकरीची आशा

Arogya Vibhag Bharti 2021 latest updates : The Maharashtra state  will recruit 16,000 different posts in Arogya Vibhag. This includes about 4,000 posts in Class A and B and 12,000 posts in Class III and IV. The health minister has already announced that 50 per cent of the posts related to patient services will be filled and now 100 per cent vacancies will be filled.  With the health department filling up a jumbo of 16,000 posts, (Annukampa) compassionate job hopes have been revived.   The long-awaited waiting list of sympathizers (Annukampa) has increased as many government departments in the state are not recruiting regularly. As a solution to this, by issuing a government decision on September 11, 2019, it has been said that 20% of the total posts in the quota of direct service should be given to these sympathizers (Annukampa). This limit is only 3 years (2019 to 2021) so it is valid till December 21.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस आपले पाळेमुळे घट्ट करत आहे. तिसरी लाट येऊ घातली आहे व त्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. हा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाला रिक्त पदावरील कर्मचाऱ्यांची चणचण भासत आहे, तर दुसरीकडे याच विभागात सेवा देताना मृत कर्मचाऱ्याच्या नातलगांना (अनुकंपाधारक) प्रतीक्षा आहे ती नोकरीची. आरोग्य विभाग 16 हजार पदांची जम्बोभरती करणार असल्याने अनुकंपाधारकांच्या नोकरीची आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत.

कोरोना आजार ठराविक कालावधीनंतर विविध रूपं साकार करत असून जनसामान्यांमध्ये भीतीचे व नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी शहरात थैमान घालणारा हा आजार आता ग्रामीण भागात साम्राज्य प्रस्थापित करत आहे. गत अनेक वर्षापासून नियमित पदभरती बंद असल्याने रिक्त पदांचा भार वाढलेला आहे. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासन तब्बल 16 हजार विविध पदांची भरती करणार आहे. यामध्ये अ वर्ग व ब वर्गातील सुमारे चार हजार पदे तर तृतीय व चतुर्थ श्रेणीतील 12 हजार पदांचा समावेश आहे. रुग्ण्सेवेशी निगडित 50 टक्के पदे पदभरती मान्यता यापूर्वीच मान्यता दिली असून आता 100 टक्के रिक्त पदे भरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये रुग्ण सेवेतील तज्ञ डॉक्‍टरांसमवेत, अधिपरिचारिका, लिपिक, रासायनिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहायक, औषध निर्माण अधिकारी, तंत्रज्ञ, आहारतज्ञ, वार्डन पासून शिपाई पदांचा समावेश आहे.

अनुकंपाधारकांना न्यायाची प्रतीक्षा – राज्यातील अनेक शासकीय विभाग नियमित पदभरती करत नसल्यामुळे अनुकंपाधारकांची दीर्घकाळ प्रलंबित प्रतीक्षा सूचीमध्ये वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून 11 सप्टेंबर 2019 शासन निर्णय निर्गमित करून ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध नाही अश्‍या सरळसेवेतील कोट्यातील एकूण जागांच्या 20 टक्‍के जागा या अनुकंपाधारकांना नियुक्ती द्यावी असे म्हटले आहे. ही मर्यादा केवळ 3 वर्ष (2019 ते 2021 ) असल्याने डिसेंबर 21 पर्यंत त्याची मुदत आहे.

आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता ! 100% recruitment of health department approved; Rajesh Tope’s big announcement!  State Health Minister Rajesh Tope said that 16,000 posts would be filled in the state health department immediately. A total of 4,000 posts will be filled in Class A and B, 2,000 each, and 12,000 Class C and D staff will be recruited.

घाटी रूग्णालयांमधील वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश

आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार

Updated 06.05.2021– राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आहे, रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील अशी माहिती आहे.

या आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. पण राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आरोग्य विभागातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2021: Ten thousand 127 health workers will be recruited under the Zilla Parishad on the backdrop of Corona. The recruitment will be for five categories of technicians, pharmacists, health workers, health workers and health supervisors.

विविध जिल्ह्याच्या आरोग्य विभागामध्ये भरती खाली दिली आहे:


जिल्हा परिषदेकडून पुण्यात 901 आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती

आरोग्य भरतीतील या पदासाठीची परीक्षा पुन्हा होणार

आरोग्य विभागाच्या भरतीतील 51 संवर्गातील पदांचे निकाल लवकरच!

आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदांची भरती होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.

कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. राज्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.

राज्यात कोरोना करोना च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सरकारतर्फे त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त मंत्रालयाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10, 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.


Arogya Vibhag Bharti 2021

There are 18 thousand 397 vacancies in A, B, C and D sections of Public Health Department. All the posts in the ‘D’ category of the health department will be filled through direct recruitment and 50 per cent of the posts in the ‘C’ category will be filled.

आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे येत्या दोन महिन्यात भरणार

Aarogya Vibhag Bharti 2021 Details – सार्वजनिक आरोग्य विभागातील अ, ब, क आणि ड विभागातील १८ हजार ३९७ पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, असे सांगताना राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदे येत्या २ महिन्यात भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले.

आरोग्य विभागातील ‘ड’ संवर्गातील सर्वच्या सर्व पदे थेट भरतीच्या माध्यमातून भरली जाणार असून ‘क’ संवर्गातील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.तर मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर उर्वरित पदे भरली जाणार असल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या संदर्भातील पुढील अपडेट लवकरच प्रकाशित करू.

Arogya Vibhag Bharti 2021 May Be Canceled

Applications for the vacant Group C posts were filled two years ago. On Sunday (28th) 14 cadres were examined in the morning session and 40 cadres were examined in the afternoon session. The exams held on Sunday have caused confusion in many districts across the state due to mass copying, paper rupture, late receipt of papers for half to one and a half hours and other reasons Therefore, the candidates have demanded that this examination should be canceled and a new examination should be conducted by the Maharashtra State Public Service Commission (MPSC).

आरोग्य विभागात रिक्त असलेली गट क च्या पदांची सरळसेवा भरतीसाठी दोन वर्षापूर्वी अर्ज भरून घेण्यात आले होते. रविवारी (ता.२८) एकाच दिवशी सकाळच्या सत्रात १४ संवर्गाची, तर दुपारच्या सत्रात ४० संवर्गाची परीक्षा घेण्यात आली.

 रविवारी झालेली ही आरोग्य विभागाची भरती खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेतली. रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये सामूहिक कॉपी, पेपर फुटणे, अर्धा ते दीड तास पेपर उशिरा मिळणे यासह अन्य कारणांनी गोंधळ झाला आहे.

औरंगाबाद, नागपूर येथे परीक्षेपूर्वीच पेपर फुटेल, इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करून परीक्षेत उत्तरे लिहिण्यात आली. मागील दोन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) परीक्षा घ्या, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.


आरोग्य विभाग परीक्षा २०२१ प्रवेशपत्र डाउनलोड

Arogya Vibhag Bharti 2021

आरोग्य विभागातील पहिल्या टप्प्यातील भरती मार्चमध्ये

Arogya Vibhag Bharti 2021: In Health Department Examination for 28000 posts on 28th February. Public Health Minister Rajesh Tope said in Aurangabad that there are 17,000 vacancies in the health department in the state and 50 per cent of the posts, ie 8,500 posts, will be cleared this month.

Arogya vibhag bharti 2021 – आरोग्य विभागातील आणि गावातील आरोग्याशी निगडित ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीची परीक्षा २८ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. राज्यात आरोग्य विभागाची १७ हजार पदे रिक्त असून त्यातील ५० टक्के पदे म्हणजे साडेआठ हजार पदांच्या बढतीस मुभा देण्यात आल्यानंतर पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात पूर्ण होतील आणि मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात पदस्थापनेचे आदेश दिले जातील, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे सांगितले.

जिल्हा वार्षिक आढाव्याच्या बैठकीसाठी ते औरंगाबाद येथे आले होते.

आरोग्य विभागातील ही परीक्षा ओएमआर पद्धतीने घेतली जाणार असून त्याच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभागाने नेमलेल्या कंपनीकडून केले जात आहे. आरोग्यसेवक आणि सेविका या पदांचाही यात समावेश आहे. साधारणत: पाच हजार पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. पोलीस, ग्रामविकास मंत्रालय तसेच आरोग्य विभागातील पदांची भरती होणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti Exam Date: The date of Health Department Recruitment Examination has been announced and on 28th February 2021, the examination will be held on the same day all over Maharashtra.

गट क भरती प्रक्रिया संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न व संभाव्य उत्तरे

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी ५० % पदभातीस मान्यता दिलेली आहे. पदभरतीचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आरोग्य विभाग भरती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून, 28 फेब्रुवारी 2021 ला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येईल.

आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्य सेविका पदे भरणार!

MLA Keram demanded to Chief Minister Uddhav Thackeray to recruit GNM, ANM health workers and give priority to health workers serving in Corona period as a special matter in view of providing essential facilities in tribal-dominated, remote, hilly areas, primary health centers and sub-centers in Mahur taluka. Was. Milind Kulkarni, Under Secretary, Public Health Department, informed the Commissioner, Director of Health Services and Mission, National Health Mission, Mumbai about the demand. MLA Bhimrao Keram has informed that the notification of this recruitment process will be issued soon.

आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्य सेविका पदे भरणार!

 नांदेड जिल्ह्यातील आदिवासीबहुल, अतिदुर्गम, डोंगराळ किनवट, माहूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून जीएनएम, एएनएम आरोग्य सेविकांची भरती करण्याची व त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना अवगत केले आहे. लवकरच या भरती प्रक्रियेची अधिसूचना निघणार असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिले आहे.

 माहूर आणि किनवट प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका कर्मचारी यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्या कारणाने आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात सर्वसाान्य रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले असून यावर आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून जीएनएम,एएनएम या आरोग्य सेवकांची कंत्राटी पद्धतीने पद भरती प्रक्रिया राबऊन त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना आमदार केराम यांच्या मागणी वजा पत्राचा संदर्भ घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे

तशा स्वरुपाचे पत्र आमदार भीमराव केराम यांना प्राप्त झाले आहे. आमदार केराम यांच्या पत्राची दखल घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी पद भरती करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून लवकरच ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे संकेत आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे. यावरुन जीएनएम, एएनएमचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणींना आमदार भीमराव केराम यांनी रोजगाराची संधी निर्माण करुन दिली असून कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना देखील प्राधान्यक्रम देण्याची मागणी असल्याने त्यांनी कोरोना काळात बजावलेल्या सेवेचा लाभ त्यांना मिळणार आहे.


Updated 23.01.2021: Arogya Vibhag Bharti Exam Date: The date of Health Department Recruitment Examination has been announced and on 28th February 2021, the examination will be held on the same day all over Maharashtra.

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी ५० % पदभातीस मान्यता दिलेली आहे. पदभरतीचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आरोग्य विभाग भरती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून, 28 फेब्रुवारी 2021 ला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येईल.


Arogya Vibhag Bharti 2021: शासनाच्या संदर्भादिन पत्रान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021

गुड न्यूज.. आरोग्य विभागात 8 हजार 500 पदांची भरती उद्यापासून

As per the latest news Health Ministry Rajesh Tope Said that official notification of 8500 post filled17,000 posts will be filled in the Maharashtra Arogya Vibhag out of these 8,500 posts will be filled now. Therefore, this recruitment will be processed in 2 phases. The results will be available by February 15 and the results in two to three days, the health minister said. Candidates read the complete details given here and keep visit us..

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोरोना संकट कमी झाल्याने नोकारीतून काढून टाकले होते. त्यामुळे या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळला आहे.

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

झिंझर नावाच्या आयटी कंपनीला नोकर भरती प्रक्रिया राबविण्याचे काम देण्यात आले आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदे भरली जातील. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, कलर्क आणि टेक्निशियनसह क आणि ड वर्गातील पदांचा समावेश आहे. या नोकर भरतीवेळी कोरोना काळात कंत्राटी काम केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही. मात्र कोरोना संकट काळात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने काम केले. त्यांना नियमित नोकरीवर घेणे शक्य नसल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयाप्रमाणे तसे करणे नियमबाह्य ठरणार आहे. तरीही त्यांना वेगवेगळ्या भरती तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) मधील पदांची भरती करताना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी निवड प्रक्रियेतील नियमात आवश्यक ते बदल केले जातील, असे टोपे यांनी सांगितले.

पोलीस खात्यातही भरती

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र पोलीस खात्यात 12538 जागांच्या भरतीची घोषणा केली होती.  पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.


Arogya Vibhag Bharti 2021: The government has taken steps to improve the Home Department, health and medical care system. For this, the government has sanctioned recruitment for 50% of the total vacancies

आराेग्य, वैद्यकीय विभागातील 50% भरती लवकरच होणार सुरू

 काेराेना विषाणूचा मुकाबला करताना वैद्यकीय आराेग्य यंत्रणा, आराेग्य विभाग व गृहविभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आल्याची परिस्थिती आहे. संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी या विभागाने केलेल्या उपाययाेजना व धावपळ लक्षात घेता उपराेक्त विभागातील एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के रिक्त पदभरतीसाठी शासनाने हिरवी झेंडी देताच विभागीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.

देशासह राज्यात काेराेनाचा सामना करण्यासाठी गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणा एकदिलाने सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणेने आटाेकाट प्रयत्न केल्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले; परंतु अद्यापही ही साथ कायम असून, संभाव्य साथीचा मुकाबला करण्याच्या निमित्ताने का हाेईना, शासनाने गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणेत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदांसाठी भरती राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय नाेकऱ्यांमधील मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देत उपराेक्त पदांसाठी बिंदुनामावलीनुसार मंजूर पदांसाठी पदभरती करण्याचे निर्देश जारी केले आहेत

 लहान संवर्गातील पदभरतीला प्राधान्य 

 गृह, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य विभागातील वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा संवर्ग वगळता लहान संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदभरतीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. शासनाच्या निर्णयामुळे सुशिक्षित बेराेजगार तरुणांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे

सोर्स:लोकमत


Arogya Vibhag Bharti 2021: In the next few months, more than 8,000 employees will be recruited in the health and rural development department, said Health Minister Rajesh Tope.The Covid crisis will lead to the necessary recruitment in the health sector. Health Minister Rajesh Tope also said that the recruitment process will start in the next two months

राज्यात डीएचओ संवर्गातील 144 रिक्त पदे

गुड न्यूज… नव्या वर्षात आरोग्य विभागात 8 हजार पदांची भरती

आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही  राजेश टोपेंनी सांगितलं. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामस्वामी, संचालक , उपसंचालक आदी उपस्थित होते

Public Health Department Recruitment 2021

राजेशे टोपेंनी राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्यानंतर संबंधितांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. यावेळी सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले. आरोग्य यंत्रणेचे संनियंत्रण महत्वाचे असून महत्वाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. सार्वजनिक आरोग्य सेवेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

 आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी टीव्ही 9 शी बोलताना दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असेही टोपेंनी सांगितले.


आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

Health Department recruitment is now by examination only

Health Department recruitment is now by examination only: Health Minister Rajesh Tope has informed that the examination will be held within a month. The decision has come as a relief to thousands of students preparing for competitive exams. Corona had a lockdown situation so the idea was to take the post on merit. However, now that all the areas in the state are open, fifty percent of the total recruitment will be filled within a month. It will take eight to fifteen days to prepare the roster. After that, the recruitment process will start immediately, ‘informed Tope.

Arogya Vibhag Buldhana Bharti 2020

राज्यातीलआरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच होणार आहे. पुढील महिनाभरात परीक्षा होणार आहे…

आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

राज्याच्या आरोग्य विभागातील पदभरती महिन्याच्या आत परीक्षा घेऊन होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पदभरती ही दहावी, बारावीच्या गुणांवर होणार होती. त्याविरोधात शेकडो विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

राज्य सरकारने आरोग्य विभागातील १७ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार (दहावी, बारावी, पदवीच्या गुणांवर); तसेच मुलाखतीद्वारे राबविल्यास राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना संधीच मिळणार नसल्याचे समोर आले होते. दहावीच्या ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ निकालामुळे आणि बारावीच्या वाढलेल्या गुणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मागे पडणार आहेत. त्यामुळे या भरतीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध झाला होता. ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, या पदांसाठी विद्यार्थी तीन ते पाच वर्षांपासून तयारी करीत आहे, भरती प्रक्रियेत दहावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केल्यास खूप कमी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. त्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने संपूर्ण प्रकाराबाबत वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी टोपे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचवल्या. त्यासोबतच निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. अखेर विधिमंडळ अधिवेशनात टोपे यांनी या भरतीबाबत सभागृहाला माहिती दिली. ‘करोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती असल्याने पदभरती मेरिटनुसार घेण्याचा विचार होता. मात्र, आता राज्यात सर्व क्षेत्र खुले होत असल्याने, एकूण पदभरतीच्या पन्नास टक्के जागा एका महिन्याच्या आत परीक्षा घेऊन भरणार आहे. रोस्टर तयार करण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी जाईल. त्यानंतर पदभरती प्रक्रियेला त्वरित सुरुवात होईल,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.

राज्यात दहावीची परीक्षा मार्च २०१०पूर्वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेतील पूर्ण सहा विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येतात. त्यानंतरच्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’नुसार म्हणजेच एकूण विषयांपैकी पाच विषयांमध्ये मिळालेल्या चांगल्या गुणांच्या आधारे एकूण गुण जाहीर होतात. त्यामुळे नोकरीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते. या तफावतीत सर्वाधिक नुकसान २०१०पूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केल्याने अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे सरळसेवा पदभरतीत किंवा आरोग्य विभागाच्या पदभरतीत दहावीच्या गुणांचा विचार केल्यावर, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जुने विद्यार्थी मागे पडून त्यांचा दहावी व बारावीच्या गुणांचा टिकाव लागणार नाही. त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नाही.

सोर्स: म.टा


Health department to start 50% of recruitment!

Updated on 16.12.2020: There are a large number of vacancies in the health department in the state. Out of this, 50 percent recruitment process will be started immediately, announced Health Minister Rajesh Tope in the Assembly.

NHM – महाराष्ट्र राज्यस्तरीय भरती 2020

१६ डिसेंबर २०२० अपडेट – राज्यात आरोग्य विभागाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.  

राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे. देशपातळीवर ज्या १४ राज्यांची चर्चा होत आहे, त्यात महाराष्ट्र नाही, असे सांगून टोपे म्हणाले, डेथ ऑडिट कमिटी जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. कोरोनामुळे झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी करण्यासाठी ही कमिटी गेले काही महिने काम करीत आहे. केंद्र सरकारने कोरोना तपासणीचे दर ४५०० रुपये ठेवले होते, ते उद्यापासून ७८० रुपये करण्यात येतील, अशी घोषणाही टोपे यांनी केली. बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल. त्यासाठीचे ट्रेनिंग सुरू आहे. कोल्ड चेनची व्यवस्था पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Order To Fill The Vacancies Of Senior Nurses Immediately

Arogya Vibhag Bharti 2020

परिचारिकांची वरिष्ठ पदावरील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश

परिचारिका संवर्गातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ नवीन रूपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या. तसेच मोफत रक्त देण्याबाबत धोरण तयार केले जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्या वतीने वेबिनार घेण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. करोना कालावधीत साथी संस्थेने करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले. त्याबाबत या वेबिनारमध्ये सादरीकरण करण्यात आले.

साथी संस्थेने नर्सेसच्या अनुभवावर आधारित जे सर्वेक्षण केले आहे ते शासनापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. नर्सेस कॅडरमधील समन्वय करणारी जी वरिष्ठ पदे आहेत ती तातडीने भरण्यात यावी. ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ आवश्यक असून त्याबाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. हिवाळी अधिवेशनानंतर यासंदर्भात बैठक घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी केली.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, नर्सेसच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील. सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिली. शासकीय रुग्णालयाची सेवा, स्वच्छता, भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे. तोही लवकरच मंजूर होईल, असेही त्यांनी सांगितले.

५०० नवीन रुग्णवाहिका..

सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढावा, तसेच ही सेवा परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार असावी यासाठी प्रयत्न सुरू असून राज्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवडय़ात ५०० नवीन रुग्णवाहिका दाखल होतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सोर्स: लोकसत्ता


29,000 Vacancies in Health Departments

आरोग्य विभागात २९ हजार पदे रिक्तच

राज्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांसह २९ हजारांहून पदे रिकामी आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे करोनाकाळासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’अंतर्गत १९,७५२ पदे तात्काळ भरण्याचा निर्णय झाला मात्र करोनाला पाच महिने उलटल्यानंतरही यातील १२,५७४ पदे भरलेली नाहीत. याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे.

राज्यात दोन लाख ८० हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. यातील मोठय़ा संख्येने रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले असून अतिदक्षता विभागात खाटा मिळणे हे आमच्यासाठीही एक आव्हान बनल्याचे विविध पक्षांच्या आमदारांचे म्हणणे आहे.

पुण्यातील सर्व रुग्णालयात मिळून ५५७३ करोना खाटा आहेत तर २८७८ खाटा अतिदक्षता विभागात आहेत. यामुळे पुण्यात करोना रुग्णांना त्रास होत असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर येथे रुग्ण वाढत असल्याने रुग्ण आणि रुग्णालयातील खाटांची संख्या याचे प्रमाण व्यस्त बनत असतानाच डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची हजारो पदे भरलीच जात नाहीत.  विशेष प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांची आवश्यकता असून त्याबाबत ओरड असल्याचे आरोग्य विभागाच्याच ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

याशिवाय करोनाकाळात विशेष बाब म्हणून आरोग्य विभागाअंतर्गत ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ (एनएचएम) खाली १९,७५२ पदे तातडीने मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी १२,५७४ पदे करोनाला पाच महिने उलटूनही भरण्यात आलेली नाहीत. यात पुणे जिल्ह्यातील पुणे, सोलापूर व सातारासाठी २४७९ मंजूर पदे आहेत पैकी ९११ रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १७९३ मंजूर पदे असून ९२३ पदे भरलेली नाहीत. ठाणे जिल्ह्यासाठी १८८९ पदे मंजूर असून १४९४ पदे भरली नाहीत. औरंगाबाद २४३६ पदांपैकी १४६१ रिक्त पदे तर नाशिक जिल्ह्यासाठी २३३० मंजूर पदे असताना ११६५ पदे आजही रिकामी आहेत. याबाबत आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की अनेक ठिकाणी डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ मिळत नाही हे खरे असले तरी संबंधित पालकमंत्र्यांनी त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

* आरोग्य विभागात २९ हजारांहून जास्त पदे रिक्त आहेत.

* आरोग्य विभागाच्या अखत्यारीत ५६,५६० नियमित मंजूर पदे आहेत त्यापैकी १७,३३७ पदे गेल्या अनेक वर्षांत भरण्यात आलेली नाहीत. ’यात सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक, साहाय्यक संचालक यांची ८५० पदे रिक्त आहेत. वर्ग ‘अ’ व ‘ब’चे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ अशी हजारो पदे आहेत.

सोर्स: लोकसत्ता


आरोग्य विभाग खासगीकरणाकडे, चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटदाराकडून पदभरती

Updated on 05/10/2020: नागपूर : केंद्र सरकारकडून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत असताना आता राज्य सरकारकडूनही तोच कित्ता गिरविला जात आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी खासगी व्यक्तीच्या हातात देण्यात येणार आहे. या कंत्राटदाराच्या माध्यमातून डॉक्टर वगळता इतर सर्वच पदे भरण्यात येणार आहेत.

 नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत सध्या ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), ३१६ उपकेंद्र, २९ आयुर्वेदिक दवाखाने व ३३ अ‌ॅलोपॅथिक डिस्पेन्सरी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या विचार केल्यास ही आरोग्य सुविधा फार तोकडी आहे. जिल्ह्यात चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कामठी तालुक्यातील भूगाव, मौद्यातील धानला, नरखेडमधील भिष्णूर व नागपूर ग्रामीणमधील सालई गोधनी या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. २ वर्षांपासून या चारही आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून, याच्या इमारती तयार आहेत. परंतु, अद्यापही हे आरोग्य केंद्र उद्घाटनापासून वंचित आहेत.

 शासनाने या चारही आरोग्य केंद्रांसाठी ५ नियमित पदेही मंजूर केली आहेत. यामध्ये २ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक पुरुष, आरोग्य सहाय्यक महिला व आरोग्य सेविका यांचा समावेश आहे. कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुरुष, औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरायचे आहेत. जिल्हा परिषदेकडून डॉक्टर वगळता इतर पदे खासगी व्यक्तीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. एकीकडे सरकारी नोकरभरतीची भाषा होत असताना दुसरीकडे चोर पावलांनी खासगीकरण होत असल्याची टीका केली जात आहे.

 शासनाच्या निर्देशानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात सहा ते आठ निविदा आल्या. सर्वात कमीची निविदा सादर करणाऱ्यास काम देण्यात आले. डॉक्टर वगळता इतर पदे कंत्राटदाराच्या मार्फत भरण्यात येतील. शासनामार्फत निधी मिळणार असून कंत्राटदाराच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येणाऱ्यांना पगार मिळेल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.

 खासगीकरणासाठी थांबले उद्घाटन? 
दोन वर्षांपासून इमारतीचे बांधकाम तयार आहे. परंतु, सेवा सुरू झाली नाही. यासाठी कर्माचाऱ्यांचा अभाव सांगण्यात येत होता. पदे खासगीकरणातून भरण्यासाठीच नियुक्ती रखडल्याची चर्चा आहे.

सोर्स: सकाळ


आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची कीड; अधिकारी संवर्गासह १७ हजारांवर पदे रिक्त

 वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, वर्ग एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गासह इतर ग्रेड सी व डी अशी तब्बल १७ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशी महत्त्वाची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत .

 बीड राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. धोरणात्मक पदांवर प्रभारीराज असल्याने व्यवस्थापन विस्कळित आहे. मात्र, सरकारची मानसिकता आणि सोयीच्या खुर्च्यांवर बसलेल्या अधिकाऱ्यांची आडकाठी यामुळे पदोन्नत्याच होत नाहीत. परिणामी, राज्याच्या आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची कीड लागल्याचे चित्र आहे. 

वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, वर्ग एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गासह इतर ग्रेड सी व डी अशी तब्बल १७ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशी महत्त्वाची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत.

 वेळेत भरती न केल्याने वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पुढील संवर्गातील रिक्त पदांचा आजार अधिक दुर्धर होत आहे. आता कोरोना काळात तरी सरकार काही पावले उचलून यातून मार्ग काढेल, अशी अपेक्षा आहे. वास्तविक वैद्यकीय अधिकारी (वर्ग दोन) या उपलब्ध सव्वासहा हजार पदांमधून पुढच्या संवर्गातील अधिकारी मिळणार आहेत; पण त्यासाठी पदोन्नतीची प्रक्रिया गरजेची आहे. मात्र, पदोन्नत्या झाल्यानंतर मूळ पदाचा अधिकारी येऊन आपली सोयीची खुर्ची जाईल या भीतीमुळे या प्रभारींकडूच पदोन्नतीस आडकाठी होत आहे.

 काय आहेत रिक्त पदांची कारणे

 -वेळेवर भरती नसल्याने एमओ मिळत नाही
-भरती, पदोन्नतीचे टप्पे वेळेवर होत नाहीत
-एमओ टू स्पेशालिस्टची प्रमोशन प्रक्रिया वेळेवर नाही
-सीएस केडरची प्रमोशन प्रक्रियाही कायम रखडलेली
-अनेक अधिकाऱ्यांचे चार्ज घेऊन सोयीच्या जागांवर ठाण
-पदोन्नतीच्या पदांवरील अनेक अधिकारी प्रभारी
-पदोन्नत्यांत सरकारची उदासीनता, सोयीची जागा जाईल म्हणून प्रभारींचीही आडकाठी

 काय आहे पर्याय

 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया वेळेवर करणे
-उपलब्ध एमओंची ज्येष्ठता यादी काढून स्पेशालिस्टचे प्रमोशन
-याच सिनिॲरिटीतून वर्ग एक अधिकारी पदाचे वेळेत प्रमोशन

 प्रभारीराजमुळे काय आहेत अडचणी 

 -प्रभारींच्या सूचनांची फारशी दखल घेतली जात नाही
-पात्रता असूनही पदोन्नती मिळत नसल्याने मानसिकतेवर परिणाम
-प्रभारींमुळे खालील रिक्त पदेही भरली जात नाहीत
-प्रभारींमुळे यंत्रणा सक्षमपणे चालू शकत नाही

 सहा वर्षांपासून पदोन्नत्या करण्याचे कार्यालयीन सांगितले जात आहे. लोक उपलब्ध नाहीत हे चुकीचे आहे. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पदे रिक्त आहेत. परिणामी, वैद्यकीय अधिकाऱ्यांत असंतोष आहे. कोविडमध्ये कालबद्ध कार्यक्रम आखून शासनाने पदभरती, पदोन्नत्या कराव्यात.


आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा हां महत्त्वपुर्ण निर्णय

 मराठा समाजाच्या आरक्षण भरतीवर वाद झाला. हे भरती प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. परंतु, ही भरती प्रक्रिया यातून वगळावी ही आमची भूमिका असल्याचेही आरोग्यमंत्री टाेपे यांनी स्पष्ट केले.
 सातारा :  मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात दावा सुरु आहे. या दाव्यामुळे सर्व भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. परंतु, राज्यात सध्या कोरोनाने महाभयंकर परिस्थिती आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेला स्थगितीतून वगळण्यात यावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराड येथे स्पष्ट केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर भरती 2020

 आराेग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (रविवार) सातारा आणि काेल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील टाऊन हाॅले येथे बैठक झाली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री टाेपे यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेतील महत्तवपुर्ण बदलाबाबतची माहिती दिली.  

ते म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रारंभ केला आहे. या जागांसाठी मुलाखत नसेल; पण गुणवत्तेच्या आधारावर भरती करणार आहाेत. सातारा आणि काेल्हापूर प्राथमिक आराेग्य केंद्रात भरती केले जाईल. या भरतीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. येथे एमबीबीएस डाॅक्टर्स आहेत. त्यांना सेवेची संधी उपलब्ध आहे.

 दरम्यान मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात दावा सुरु आहे. या दाव्यामुळे सर्व भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. परंतु, राज्यात सध्या कोरोनाने महाभयंकर परिस्थिती आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेला स्थगितीतून वगळण्यात यावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.


आरोग्य सेवकांच्या अर्ध्या जागा रिक्त

ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात. आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर हे कीटकजन्य आजार व मधूमेह, कॅन्सर आदी असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांचा शोध घेतात. प्रत्येक घरी भेट देऊन विचारणा करणे हे आरोग्य सेवकाचे ठरलेले काम आहे.

Health Department Bharti 2020

गडचिरोली : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा दूत मानल्या जाणाऱ्या आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांच्या जिल्ह्यात अर्ध्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा डोलारा कमजोर झाला असून आरोग्य सेवेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

जिल्ह्यात एकूण ४७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३७६ उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेची नेमणूक राहते. पुरूष आरोग्य सेवकांच्या एकूण २९८ जागा मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १९० जागा भरण्यात आल्या आहेत. १०८ रिक्त आहेत. महिला आरोग्य सेवकांच्या ५५३ जागा ांजूर आहेत. त्यापैकी ३४१ जागा भरल्या असून २१२ रिक्त आहेत.

ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात. आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर हे कीटकजन्य आजार व मधूमेह, कॅन्सर आदी असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांचा शोध घेतात. प्रत्येक घरी भेट देऊन विचारणा करणे हे आरोग्य सेवकाचे ठरलेले काम आहे. त्यासाठीच घराच्या भिंतीवर आरोग्य सेवकाच्या सहीचा आराखडा तयार केला राहते. या आराखड्यामध्ये किती तारखेला त्या घरी भेट दिली, याची नोंद करण्यासाठी संबंधित आरोग्य सेवक तारखेसह सही करतात.

आरोग्य सेविकेकडे प्रामुख्याने माता व बाल संगोपनाशी संबंधित काम राहतात. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे आरोग्य सेविकांचेही विशेष महत्त्व आहे. जवळपास निम्मी पदे रिक्त असल्याने एका आरोग्य सेवकाकडे दोन ते तीन आरोग्य केंद्रांमध्ये येणाºया गावांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. दोन आरोग्य केंद्रांतर्गत पाच ते सहा गावे येतात. एवढ्या गावांमधील प्रत्येक घराला भेट देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक रोगांचे निदान होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही पदे भरणे आवश्यक आहेत

शेवटच्या घटकाला सेवा देणे झाले कठीण

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी फारशी जनजागृती नाही. त्यामुळे एखादा आजार झाल्यानंतर जोपर्यंत त्या आजाराचा त्रास वाढत नाही, तोपर्यंत ते डॉक्टरांकडे जात नाही किंवा आरोग्य सेवकालाही कळवत नाही. त्यामुळे गंभीर स्वरूपातच रूग्णालयात भरती होते. काही रूग्ण तर शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले राहतात. अशा रूग्णांना वाचविणे कठिण होते. त्यामुळे आरोग्य सेवकाचे पद महत्त्वाचे आहे. आरोग्य सेविका गरोदर माता व बाल संगोपनाचे काम करते. जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या लक्षात घेतली तर आरोग्य सेविकेचे महत्त्व अधोरेखित होते.


खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार, राजेश टोपे यांची माहिती

Arogya Vibhag Bharti 2020

Arogya Vibhag Bharti 2020: Health sector infrastructure needs to be enabled while fighting corona. For this, 17,000 vacancies in Public Health Department and Medical Education Department will be filled soon. Health Minister Rajesh Tope informed that instructions have been given to the department to fill all the posts from doctors as soon as possible.

Health Department Bharti 2020

मुंबई : कोरोनासोबत लढताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागातील १७ हजार रिक्त पदे लवकरच भरली जातील. यात डॉक्टरांपासून सर्व वर्गातील पदे जलदगतीने भरण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. मुंबई वगळता राज्यात कुठेच बेडची कमतरता नाही. मुंबईतही साठ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून महिनाभरात ही संख्या एक लाखावर नेण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. आता मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच अन्य पावसाळी साथ रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर आहे. नियुक्त्या आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समित्या बनवाव्यात, मुलाखतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

कोरोनाबाधितांबाबत सहानुभूती हवी

कोरोना विरूद्धच्या या लढ्यात शिक्षित व्हा, सजग व्हा पण माणुसकी घालवू नका. अनेक ठिकाणी संशयित रुग्ण किंवा अलगीकरणात असलेल्या व्यक्ती, परिवारांसोबत चुकीच्या वर्तनाची माहिती येत आहे. ही बाब चुकीची आहे. कोरोनाबाबत शिक्षित, सजग व्हा पण माणुसकी हरवू नका, असे आवाहन राजेश टोपेयांनी केले.

मुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाच्या ५ तुकड्या

राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,३२८ वर गेली असून १२ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अखेर, पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या राज्यभरात दाखल होत असून यापैकी मुंबईत ५ तुकड्या तैनात असतील. राज्य पोलीस दलात पावणे दोन लाखांच्या जवळपास पोलीस कार्यरत आहेत. लॉकडाउनच्या काळात विविध नियमांची अंमलबजावणी, बंदोबस्तासह विविध जबाबादारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे.

सोर्स:लोकमत


आरोग्य खात्यात २५ हजार पदे रिक्त!

Arogya Vibhag Bharti 2020

Health Department Recruitment 2020 : As per the latest news now there will be 25000 vacant seats will be filled soon in Maharashtra Arogya Vibhag. Due to the Corona Virus various posts shortage will be found so that the Maharashtra Government decided to recruitment 25000 posts very soon in Arogya Vibhag Maharashtra. This Vacant posts will be filled through the direct walk in interview. All other important details are given below. Candidates read the complete instruction carefully and keep visit us.

आरोग्य विभागात लवकरच 25 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती

राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्ष आरोग्य विभागाची पंद रिक्त आहेत. त्यातच आता राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात लवकरच मोठी भरती होणार आहे. जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

कोरोनाने राज्यासह जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे आणि त्याचा सामना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे ही पदं लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या वृत्ताला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. “आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

तसंच “या भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल,” असंही त्यांनी सांगतिलं.

जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर भरती 2020– 49 PostsNew Update

सार्वजनिक आरोग्य विभाग पालघर भरती 2020New Update

NHM वाशीम भरती 2020– 79 PostsNew Update

आरोग्य विभाग हिंगोली भरती 2020New Update

सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा भरती 2020New Update

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2020

आरोग्य विभाग हिंगोली भरती 2020

सार्वजनिक आरोग्य विभाग नांदेड भरती 2020- 201जागा New Update

NHM गडचिरोली भरती 2020– 210 जागा New Update

आरोग्य विभाग कोल्हापूर भरती 2020

आरोग्य विभाग गडचिरोली भरती 2020

औरंगाबाद आरोग्य विभाग मध्ये 280 पदांची मेगाभरती

आरोग्य विभाग परभणी भरती 2020

Arogya Vibhag Jalna Bharti 2020 – 342 Vacancies 

NHM Beed Bharti 2020

Thane Mahanagarpalika Bharti 2020


आरोग्य खात्यात १७ हजार पदे रिक्त!

Arogya Vibhag Bharti 2020

17 Thousand Vacancies in Arogy Vibhag: Although the entire health department is struggling to cope with coroners in the state, the manpower shortage with doctors is huge. The health department, additional directors, co-directors, sub-directors, along with the doctors in the health department, are vacant at around 17,005 posts.

It does not include 2522 posts from Health Director to Medical Officer. In addition, there are 893 vacant posts of specialists. The assurance that these posts will be filled soon will be given by the health ministers during the convention, but in reality no concrete steps have been taken for this.

राज्यात करोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटत असली तरी या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा तुटवडा मोठा आहे. आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत.

Argoya Vibhag Doctors Bharti 2020

यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत २५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय विशेषज्ञांची तब्बल ४९३ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येतील अशी आश्वासने वर्षांनुवर्षे अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस पावले आजपर्यंत उचलण्यात आलेली नाहीत.

डॉक्टरांची तसेच विशेषज्ञांची हंगामी पदे भरण्यासाठी वेळोवेळी जाहिरात देऊनही डॉक्टर मिळत नाहीत

Mega Recruitment in Argogya Vibhag

राज्याच्या आरोग्य विभागाचा पसारा मोठा असून आरोग्य खात्याची ५०८ रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी १८२८ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर १०,६६८ उपकेंद्रे आहेत. यात आरोग्य संचालकांच्या दोन पदांपैकी एक पद रिक्त आहे. अतिरिक्त संचालकांच्या तीन पदांपैकी २ पदे रिक्त आहेत तर सहसंचालकांच्या १० पदांपैकी ८ पदे भरण्यात आलेली नाहीत. गंभीर बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सहसंचालक साथरोग हे पद रद्द करून त्याऐवजी सहसंचालक खरेदी असे पद निर्माण करण्यात आल्याचा मोठा फटका आज करोनाच्या पार्श्वभूमीवर बसत आहे. पुणे येथील हंगामी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनाच आज संचालक, अतिरिक्त संचालक व सहसंचालकांची भूमिका बजवावी लागत आहे.

गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरतीNew Update

डॉक्टरांची तसेच विशेषज्ञांची हंगामी पदे भरण्यासाठी वेळोवेळी जाहिरात देऊनही डॉक्टर मिळत नाहीत. यामागे ग्रामीण वा दुर्गम भागात डॉक्टरांना पुरेसे मानधन मिळत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या २८१ मंजूर पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत तर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ६४३ पदांपैकी ३६८ पदे भरण्यातच आलेली नाहीत. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थीरोग आदी विशेषज्ञांची ६२७ पदे मंजूर असली तरी त्यातील ४९३ पदे आजघडीला रिक्त आहेत. परिचारिकांची ३० टक्के तसेच आरोग्य सेविका व साहाय्यकांची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune Mahanagarpalika Doctors Bharti SoonNew Update

आरोग्य विभागातील विशेषज्ञांची सर्व पदे येत्या तीन महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत भरण्यात येतील. १७ हजार पदे रिक्त असून यापूर्वी पदे का भरण्यात आली नाही याची मला कल्पना नाही. सर्व पदे आरोग्य खात्यामधूनच भरण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवा करू. आरोग्य खात्याला अधिक निधी मिळाला पाहिजे व सध्याची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात आरोग्याला चांगला निधी मिळवून देईन.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Source: Loksatta

12 Comments
  1. Anil says

    Sir 2019 chi zila parishad chi aarogya vibhag jahirat dya

  2. Abhishek chavan says

    Lab technician 2nd year job asel tar mobile number
    9834703449

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!