Arogya Vibhag Bharti: आरोग्य विभागात ९७३ पदे रिक्त
Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti – In District Health Department there is 973 vacancies are vacant. The recruitment process has not been completed despite the approval of the government, which has created a shortage of manpower in the health department. Read More details regarding Arogya Vibhag Bharti 2022 are given below.
आरोग्य विभागात ९७३ पदे रिक्त
ठाणे जिल्ह्यातून विभक्त होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्याला ९ वर्षे उलटूनही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्या नाहीत. जिल्हा आरोग्य विभागात अद्यापही कायमस्वरूपी आणि कंत्राटी पदे मिळून ९७३ पदे रिक्त आहेत. शासनाकडून मंजुरी मिळूनही भरती प्रक्रिया पार पडली नसल्याने आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला आहे.
राज्यात आरोग्य कर्मचार्यांची 7 हजार पदे…
⇒Gadchiroli या जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व रुग्णालयातील रिक्त पदांची भरती लवकरच
- जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम, रुग्णालये, दवाखाने आणि इतर आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत. पण मनुष्यबळाचा अभाव असल्याने अनेक यंत्रणा राबविणे कठीण होत आहे. यामुळे नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.
- जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अ आणि ब वर्गातील ४७ पदे रिक्त आहेत. यात २४ ठिकाणी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर जिल्हा परिषद सेस निधीतून १५ ब गटातील वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर क आणि ड वर्गातील ९१८ पदे रिक्त आहेत.
- यात ३ कुष्ठरोग तंत्रज्ञ भरती केले असून जिल्हा परिषद सेस निधीतून २० कंत्राटी आरोग्यसेविका, १० औषध निर्माण अधिकारी यांची भरती केली आहे. तर सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने २२७ पदांची मंजुरी असताना केवळ २१९ पदे भरली असून अजूनही ८ पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर याचा परिणाम होत आहे.
- आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश पदांना शासनाने मंजुरी दिली आहे. सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया घेण्यासाठी तयारीसुद्धा करण्यात आली होती. पण काही तांत्रिक कारणे आणि करोना काळामुळे ही भरती प्रक्रिया रखडल्याचे सांगितले जात असले तरी आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने ही भरती प्रक्रिया रखडली असल्याचे समजते.
तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता
महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाची संख्या ही सर्वाधिक म्हणजे ९०५ एवढी पोहोचली झाली आहे. पालिकेच्या स्थायी आस्थापनेतील कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या वैद्यकीय विभागात नाही. यातील १६६ पदे रिक्त असून ६ अधिकारी पदे रिक्त आहेत. पालिकेने जी ५९१ पदे ठेका पद्धतीने भरली आहेत. यातील २६४ पदे कोणतीही शासकीय मंजुरी न घेता, आकृतिबंधपेक्षा अधिक भरली आहेत. पालिका सध्या एमबीबीएस डॉक्टरांना ७५ हजार, बीएएमएस डॉक्टरांना ५० हजार आणि बीएचएमएस डॉक्टरांना ४० हजार एवढे मासिक वेतन देते. त्यामुळे पालिकेकडे इतर तज्ज्ञ डॉक्टर येत नाहीत. सीटी स्कॅन आणि एमआरआयसाठी देखील रेडिओलॉजिस्ट पालिकेकडे फिरकत नाही.
शासनाकडून सर्व स्तरातील पदांना मंजुरी मिळाली आहे. सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया सुरू केली होती, पण तांत्रिक अडचणीमुळे ही प्रकिया पार पडली नाही. परंतु त्यालाच मुदतवाढ देऊन हीच प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल
Arogya Vibhag Bharti 2022 updates regarding the 4000 posts for group C and group D. Read the below given details and click on the link for the further update :
⇒Maharashtra Arogya Vibhag Bharti 2022 – आरोग्य विभाग गट क आणि ड – ४ हजार पदे भरतीचा अपडेट
आरोग्य विभागातील 50 टक्के जागा लवकरच भरणार
Arogya Vibhag Bharti 2022: As per the latest news, Health Minister Rajesh Tope said that 50 per cent of the posts in the state health department will be filled soon. Now the new system of exams will be taken soon. Read More details as given below.
- राज्याच्या आरोग्य विभागातील (Department of Health) रीक्त जागांमुळे आरोग्य विभागाची स्थिती दयनीय होती. मात्र मोठ्या मेहनतीने 50 टक्के जागा भरल्यामुळे आता आरोग्य विभागात चांगली सेवा मिळू लागली आहे. मात्र आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे राहिलेल्या 50 टक्के जागा गडबड होणार नाही अशी परीक्षा पद्धत वापरून लवकरच त्या जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.
- आज जालन्यातील मत्स्योदरी महाविद्यालयाच्या सभागृहात आज महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राज्यातील उत्कृष्ट कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आधीची परीक्षा पद्धत चुकीची असल्यानं हा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान घडला.
- मात्र आता नवीन पध्दतीने परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
MPSC मार्फत आरोग्य विभागात एकूण २८९ पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध
Arogya Vibhag Recruitment 2022- In the Health Department 370 posts of District Surgeon and District Health Officer will be filled. The recruitment process for the vacancies in the Public Health Department is underway. The state government has given permission to fill 100% of the vacancies. 462 posts of District Surgeon and District Health Officer have been filled by promotion. A demand letter has been sent to Maharashtra State Public Service Commission for the recruitment of 370 posts. Read More details as given below.
Public Health Department Bharti 2022- राज्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती, नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
काँग्रेसचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना टोपे बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. रिक्त जागांची १०० टक्के भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ज्ञांच्या आठ हजार ३३५ जागांपैकी सात हजार ९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. तीन हजार ३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी दोन हजार ६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र् राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.
गेल्या २४ जानेवारी २०१८च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी सार्वजनिक भागिदारी तत्त्वावर चालवण्याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. नवीन शासकीय रुग्णालय मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सामंजस्य करार करण्यात येत आहेत, असे टोपे यांनी उत्तरात नमूद केले आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विकास कामांसाठी आशिया विकास बँकेकडून पाच हजार १७७ कोटी रुपये, तर हुडकोकडून तीन हजार ९९४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. यातून श्रेणीवर्धन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे खरेदी, मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.
Arogya Vibhag Bharti 2021 Group C Answer Key
Arogya Vibhag Bharti 2021 Provisional Answer Keys of Group C is available for Statistical Investigator, Lab Assistant, Staff Nurse, Pharmacy Officer, Junior Clerk, Dental Mechanics, Electrician, Junior Technical Assistant, Non-Medical Assistant, Steno-Typist etc., posts.. Candidates check their answers for below-given link for Arogya Vibhag Group C.
Provisional Answer Keys of Group C Re-Examination / गट क पुनर्परीक्षेची तात्पुरती उत्तरे
- 05 STATISTICAL INVISTIGATOR (Provisional)
- 09 LAB SCI OFFICER-LAB ASSTT (Provisional)
- 16 PHARMACY OFFICER (Provisional)
- 15 STAFF NURSE (Provisional)
- 23 A JUNIOR CLERK-WARDEN 40 (Provisional)
- 23 B JUNIOR CLERK-100 (Provisional)
- 25 DENTAL MECHANICS (Provisional)
- 27 ELECTRICIAN (Provisional)
- 28 SKILLED ARTIZEN-JR TECH ASSISTANT (Provisional)
- 35 NON MEDICAL ASSISTANT(LEPROSY) (Provisional)
- 38 HK -SLK-TO-OTA (Provisional)
- 39 HG STENO-LG STENO-STENO TYPIST (Provisional)
Arogya Vibhag Bharti 2021 Group C Re-Exam
Arogya Vibhag Hall Ticket २८ नोव्हेंबरच्या आरोग्य विभाग ग्रुप क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध 
Arogya Vibhag Published the Reexamine Date for Group C Posts and also the lists of 589 Candidates who needs to reexamine. Arogya Vibhag Bharti 2021 Group C Re-Examine will be held on 28th November 2021. The incorrect Question Paper Candidates list will be attend the examine on this Sunday i.e. 28th November 2021. Read the attach instruction and see the below given list for candiates.
Arogya Vibhag Bharti 2021 examine updates : The Health Recruitment Exam is not about getting rid of clutter. That is why the candidates who got the wrong question papers in 11 categories of group ‘C’ of the health department will now be decided to re-examined. The list has been released by Arogya Vibhag. An appeal has also been made to contact if anyone else has a complaint in this regard. The Group C & Group D Arogya Vibhag Bharti Examine Results is also postponed. Candidates see the given details below :
- आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड परीक्षेचा निकाल लांबणीवर
- चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या 572 उमेदवारांची यादी येथे पहा
Updated on 22.11.2021 आरोग्य भरती परीक्षेतला गोंधळ निस्तारायचे नाव घेत नाही आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या गट ‘क’ च्या 11 संवर्गातील चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमदेवारांची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या बाबतीत आणखी कोणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य भरती परीक्षेतील तक्रारींचे निराकरण झाल्यानंतरच नियुक्त्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली. न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्या ‘क’ वर्गाच्या 2739 जागांसाठी, तर ‘ड’ वर्गांच्या 3462 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वीच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी उमेदवारांना हॉलतिकीट मिळाले नाहीत.
अनेकांना केंद्र दुसरेच मिळाले, अशा तक्रारी होत्या. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या शंकांचे एक पत्रकार परिषदे घेऊन नाशिकमध्ये निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन परीक्षेदिवशीही प्रचंड गडबडी झाल्या.
चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या
आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशी राज्यभरातील अनेक केंद्रांवर गोंधळ उडालेला दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत आरोप केले. विरोधी पक्षानेही सरकारला धारेवर धरले. एकट्या नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. न्यासाने परीक्षेसाठी समन्वय नियुक्त केले. त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. मात्र, ऐन पेपरच्या दिवशी या समन्वयकांचे फोनच लागले नाहीत. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी काही सुटल्याच नाहीत. काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाले, तर कुठे तब्बल दोन-दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. त्यात गट ‘क’ च्या 11 संवर्गातील 572 उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. आता या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे.
As per the news regarding the Arogya Vibhag Examine 2021 for Group C & Group D is that- Health Department Group ‘C’ and Group ‘D’ Recruitment 2021 Exam will be held again !! There are 10 categories of children who were given wrong question papers, they are being re-examined. Result of the other cadres boards except the 10 cadres in which the re-examination will be conducted. The answer sheets will be published according to the final. Further proceedings regarding Group D Cadre Examination have been adjourned.
Arogya Vibhag Bharti Latest Update आरोग्य विभागातील गट क मधील १४ नेमणूक अधिकारी यांचे अंतर्गतच्या ५२ संवर्गांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे.
- दि. २४.१०.२०२१ रोजी घेतलेल्या गट क परीक्षेच्या सर्व संवर्गाच्या तात्पुरत्या उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आल्या असून या संदर्भात परीक्षार्थींनी केलेल्या सूचनांची छाननी करण्यात येत आहे.
- तसेच ज्या मुलांना चुकीची प्रश्न पत्रिका देण्यात आली असे १० संवर्ग आहेत, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
- ज्या १० संवर्गामधील उमेदवारांच्या फेर परीक्षा घेण्यात येणार आहेत ते संवर्ग / मंडळ सोडून इतर संवर्गाचे / मंडळांचे निकाल
- जश्या उत्तर तालिका अंतिम होतील त्यानुसार प्रसिद्ध करण्यात येतील.
- उर्वरित संवर्गांचे / मंडळाचे बाबत चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांची फेर परीक्षा झाल्यानंतर निकाल
- ज्य स्तरीय संवर्गाचे बाबत (उदा. सहसंचालक कुष्ठरोग अंतर्गत अवैद्यकीय सहायक संवर्ग) या पदांचा निकाल फेर परीक्षा झाल्यानंतरच प्रसिद्ध करण्यात येईल.
- मंडळ स्तरावरील संवार्गांचे बाबत (उदा. दूरध्वनी चालक) हा संवर्ग मंडळ स्तरीय असल्यामुळे अश्या पदांसाठी ज्या मंडळामध्ये चुकीची प्रश्न पत्रिका देण्याची घटना घडली.
- ती मंडळे सोडून इतर मंडळाचे अंतिम निकाल जाहीर करण्यात येतील व समुपदेशन प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
- फेर परीक्षा घेण्यात यावयाचे नेमणूक अधिकारी नुसार संवर्ग आणि फेर परीक्षेची तारीख पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल व तसे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल.
- गट ड संवर्ग परीक्षेबाबत पुढील कार्यवाही स्थगित ठेवण्यात आली आहे.
- पोलीस विभागाकडून अहवाल प्रास झाल्यानंतर अहवालातील माहितीनुसार गट ड संवर्ग भरतीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
Arogya Vibhag Bharti Latest Update सूचना डाउनलोड करा : येथे क्लिक करा
Sir 2019 chi zila parishad chi aarogya vibhag jahirat dya
Lab technician 2nd year job asel tar mobile number
9834703449